सणवार असेल तर आपण घरात हार, फुलं, तोरण, फुलांच्या माळा थोड्या जास्तीच्या आणूनच ठेवतो. देवाची पूजा किंवा घरात सजावट करताना आपण ताजी फुले आणि हार वापरतो. घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले ( best way to store flowers for a month) असल्याने आपण बाप्पाच्या पूजेसाठी (how to keep flowers fresh for a month) शक्यतो ताजी फुले आणि हार आणतो. परंतु काहीवेळा ही फुले आणि हार लवकर सुकतात, कोमेजतात आणि त्यांचा सुगंधही निघून जातो. अशा परिस्थितीत, विकत आणलेली महागामोलाची फुले व हार किमान पुढचे २ ते ३ दिवस कशी ताजी व टवटवीत ठेवता येतील असा प्रश्न पडतो( tricks to keep flowers fresh naturally).
देवाच्या पूजाविधी आणि सजावटी आणलेली फुले कोमेजून जायला लागली की, पूजेतील फुलांचा गोडवा कमी होतो. याचबरोबर, कोमेजलेली किंवा सुकलेली फुले, हार आपण देवाला वाहू शकत नाही. एरवी फुले, हार विकत आणून ठेवल्यावर पुढील २ ते ३ दिवस ताजी, फ्रेश राहावीत यासाठी आपण ती फ्रिजमध्ये ठेवतो, परंतु अनेकदा कितीही काळजी घेऊन (tips to make flowers last longer) देखील ही फुले कोमेजतात किंवा सुकून जातात. अशा परिस्थितीत, आपण काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून विकत आणलेली महागामोलाची फुले किमान पुढचे ३ ते ४ दिवस ताजी, टवटवीत ठेवू शकतो. फुले व हार फ्रिजशिवाय देखील ३ ते ४ दिवस ताजी ठेवण्यासाठी खास टिप्स...
फुले व हार फ्रिजशिवाय देखील ताजी ठेवण्यासाठी खास टिप्स...
१. पाण्याचा वापर :- फुले आणि हार एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात बुडवा. विशेषतः फुलांच्या देठाचा भाग पूर्णपणे पाण्यात बुडलेला असावा. असे केल्याने फुले जास्त वेळ टवटवीत राहतात.
२. उष्णतेपासून दूर ठेवा :- फुले थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्ण जागेवर ठेवू नका. उष्णतेमुळे फुले लवकर कोमेजतात. त्यांना थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.
३. देठांना तिरका कट द्या :- फुलांचे देठ थोडेसे तिरके कापा. त्यामुळे फुले पाणी आणि पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषून घेतात आणि जास्त काळ ताजीतवानी राहतात.
४. पाण्यात साखर आणि लिंबाचा रस :- फुलदाणीतील पाण्यात एक चमचा साखर आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळा. साखर फुलांना पोषण देते, तर लिंबाचा रस बॅक्टेरियाची वाढ थांबवतो. यामुळे फुले बरेच दिवस ताजी व चांगली टिकून राहतात.
५. पाण्याचा स्प्रे करा :- हलक्या हाताने फुलांवर पाण्याचा स्प्रे केल्याने ती जास्त काळ टवटवीत राहतात.
६. ओल्या कापडात गुंडाळा :- हार किंवा फुलांचे देठ हलक्या ओल्या कापडात गुंडाळून ठेवल्यास त्यातील ओलावा टिकून राहतो.
७. कापसाचा वापर :- हाराच्या टोकाशी ओला कापूस बांधल्यास हाराला पाणी मिळत राहते आणि तो पटकन कोमेजत नाही.
८. डब्यात ठेवा :- स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यांत स्वच्छ सुती कापड अंथरुन त्यावर हार, फुले ठेवावीत मग त्यात चमचाभर तांदुळाचे दाणे घालावेत. रुमाल व्यवस्थित गुंडाळून डब्याचे झाकण लावून तो फ्रिजमध्ये ठेवावा. तांदूळ फुलांमधील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो त्यामुळे अधिक पाण्यामुळे फुले खराब होऊन सडत नाहीत तर ती चांगली टिकून राहतात.