आपल्या स्वयंपाकघरात कढई आणि तव्याचा रोज वापर होतो.(Clean kadhai at Home) ज्यामुळे ते तेलकट आणि चिकट होते.(How to clean greasy pan) कितीही महागडा डिशवॉश वापरला तरी तेलाचे डाग काही जात नाही.(Remove sticky oil from tawa) अनेकदा स्पंज किंवा काथा देखील आपण बदलतो पण तेलाचे-चिकट थर कायम राहतात. त्यामुळे भांडी वापरताना त्रास तर होतोच पण त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. भांडी क्लिन करण्यासाठी महागडे केमिकल्स वापरले जातात.(Kitchen cleaning tips) पण त्याने कढईचा नैसर्गिक रंग निघून जातो आणि सतत घासल्याने कढई- तवा लवकर जुना होतो. (Home hacks for cleaning utensils)
पण महागड्या उत्पादनापेक्षा आपल्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या काही सोप्या पदार्थांनी कढई- तव्यावर साचलेले तेलकट थर सहज काढू शकतो.(How to make pan shine) या घरगुती उपायांमुळे फक्त डागच नाहीसे होत नाहीत तर भांड्यांना नवा चमकदार लूक मिळेल. शिवाय खूप घासण्याचे कष्ट देखील वाचतील. कढई-तव्यावरील डाग काढण्यासाठी काय करायला हवं पाहूया.
कितीही घासलं तरी टॉयलेट काळकुट्ट- पिवळे दिसते? सोपी ट्रिक- टॉयलेट होईल स्वच्छ - दुर्गंधीही गायब
1. बेकिंग पावडर हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. यामुळे भांड्यावर जमा झालेली सर्व घाण सहज निघून जाते. गरम पाण्यात २ चमचे बेकिंग पावडर आणि मीठ मिसळा. हे मिश्रण उकळू द्या. हे पाणी बादलीत काढून त्यात तवा किंवा कढई भिजवा. काहीवेळाने ब्रशने घासून घ्या, यामुळे तेलाचे- चिकट थर निघून जाण्यास मदत होईल.
2. तव्यावरील ग्रीस काढण्यासाठी आपल्याला मीठ आणि लिंबाचा सोपा उपाय करुन पाहावा लागेल. यासाठी पॅन स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर गॅस ऑन करा. पाण्यात २ चमचे डिटर्जंट, १ चमचा मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण सुमारे ५ मिनिटे उकळू घ्या. या मिश्रणात असलेले सगळे घटक तव्याचा काळेपणा आणि ग्रीस काढून टाकण्यास मदत होईल.
इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली
3. जर आपल्याला कढई किंवा तव्यावरील घाण, ग्रीस आणि काळेपणा काढून भांडी नव्यासारखी चमकवायची असेल तर व्हाइट व्हिनेगर देखील वापरु शकतो. लिंबाचा रस आणि व्हाइट व्हिनेगर पाण्यात मिसळा. आता आपल्याला कढई किंवा तव्याला या पाण्यात काही वेळ भिजवा. यानंतर स्क्रबरने भांडी स्वच्छ घासा.