दिवाळी संपली की वातावरणात गारवा पसरु लागतो. दिवसभर वातावरण गरम असलं तरी रात्रीच्या वेळी आपल्याला थंड वाटू लागत.(How to wash sweaters) हे उबदार कपडे आपण हिवाळ्याच्या दिवसात वापरत असल्यामुळे एकदा वॉश करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.(Winter clothes care) जर लोकरीचे कपडे, जॅकेट धुवायला बाहेर काढले असतील तर धुताना काही गोष्टींची काळजी घ्यायला विसरु नका.(Sweater washing tips) कारण स्वटेर-जॅकेट धुताना त्याची फिटिंग बिघडते किंवा धागे निघतात. ज्यामुळ ते सैलसर होतात. (Prevent sweater damage)
हिवाळ्यात आपण कपाटातील ऊबदार स्वटेर, शॉल, जॅकेट बाहेर काढण्याचा काळ सर्वांना आवडतो.(Winter wear care guide) पण या कपड्यांची योग्य काळजी देखील घ्यायला हवी.(Woolen clothes washing) या ५ टीप्स लक्षात ठेवून कपडे धुतल्यास ते नव्यासारखे राहतील.
नव्या नवरीसाठी डायमंड मंगळसूत्राच्या सुंदर नाजूक डिझाइन्स! कमी वजनाचे डेलिकेट पॅटर्न- स्टायलिश लूक
1. हिवाळ्यात जॅकेट आणि स्वेटर घालायला खूप मजा येते पण धुताना आपल्याला अधिक त्रास होतो. मशीनने धुतल्यास कपडे आकुंचन पावतात. हाताने धुताना खूप मेहनत घ्यावी लागते. पण तरीही त्यातील घाण निघत नाही. जर आपल्याला स्वेटर, जॅकेट सहज धुवून हवे असतील या काही टिप्स लक्षात ठेवा.
2. सगळ्यात आधी बादलीत थंड पाणी भरा. त्यात दोन कप व्हिनेगर घाला. जॅकेट किंवा स्वटेर ३० मिनिटे भिजवा. ज्यामुले कपड्यांमधील घाण बाहेर निघेल. नंतर हलक्या हाताने घासा. स्वच्छ पाण्याने धुवा. दुर्गंधी देखील निघून जाईल.
3. जर आपल्या स्वटेर- जॅकेटवर डाग पडले असतील तर त्या भागावर बेकिंग सोडा शिंपडा. नंतर त्यावर थोडासा लिंबाचा रस घाला. १५ मिनिटे तसेच राहू द्या. ब्रशने घासून नंतर थंड पाण्याने धुवा. ज्यामुळे हट्टी डाग सहज निघतील.
4. आपल्याला स्वेटर किंवा जॅकेटचा मऊपणा टिकवायचा असेल तर कोमट पाण्यात बेबी शाम्पू मिसळा. त्यात स्वेटर बुडवा. १० मिनिटांनी धुवा, यामुळे धागे खराब होणार नाही.
5. हिवाळ्यात स्वेटर-जॅकेटवरील रंग फिकट होण्यापासून रोखण्यासाठी मीठ उपयुक्त ठरु शकते. धुण्यापूर्वी पाण्यात मूठभर मीठ घाला. नंतर त्यात जॅकेट भिजवा. मीठ रंग टिकवून ठेवेल आणि चमक देखील तशीच राहिल. कपडे धुतल्यानंतर ते पिळू नका. तसेच सावलीत सुकवा. यामुळे कपड्याची घडी आणि रंग देखील तसाच राहतो.
