उन्हाळ्यात डासांचे प्रमाण सगळ्यात जास्त वाढते. जसजशी गरमी वाढत जाते डासांचा त्रास वाढत जातो. कारण उन्हाळ्यातील गरम वातावरण त्यांच्या वाढीसाठी (One Simple Way To Get Rid of Mosquitoes) पोषक वातावरण असतं. या दिवसात डास खूप जास्त हैराण करतात आणि त्यामुळे झोपेचं खोबरं होतं. आपल्या घराच्या आसपास जर का अशाप्रकारे डासांचा प्रमाण (Best Home Remedies for Mosquitoes You Must Try) वाढत गेलं तर त्याचा आपल्याला त्रासच होतो. हे डास (Natural Way to Keep Mosquitoes Away) घरात येताना आपल्यासोबत अनेक प्रकारची आजारपण घेऊन येतात. सोबतच अनेक आजारांचा धोकाही वाढतो. एवढंच नव्हे तर हे डास आपल्याला दिवस रात्र कडाकड चावतात. अशा परिस्थितीत, हे डास आपल्याला अगदी भंडावून सोडतात(One Simple Way To Get Rid of Mosquitoes).
डासांना पळवून लावण्यासाठी अनेकदा कॉईल, लिक्विडचा वापर केला जातो. पण याने फारसा फरक बघायला मिळत नाही. याचबरोबर, या कॉईल, लिक्विडमध्ये हानिकारक केमिकल्स आणि रासायनिक घटक असतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर देखील कमी - अधिक प्रमाणात वाईट परिणाम होतोच. यासाठीच कडाकड चावणाऱ्या डासांना पळवून लावण्यासाठी कधीही घरगुती उपाय करणे उत्तम पर्याय आहे. आपल्या रोजच्याच वापरातील घरातील उपलब्ध पदार्थांचा वापर करुन डासांना घराबाहेर पळवून लावण्याचा घरगुती उपाय...
साहित्य :-
१. कांदा - १ मोठा कांदा
२. कापूस - वात करता येईल इतका घ्यावा.
३. कडुलिंबाची सुकी पानं - ४ ते ५ पानं
४. कपूर - १ ते २ वड्या
५. मोहरीचे / कडुलिंबाचे तेल - २ टेबलस्पून
घरभर झुरळं फिरतात? ‘हा’ खास उपाय करा, एक झुरळ घरात दिसणार नाही-कायमचा बंदोबस्त...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एक कांदा घेऊन त्याच्या पृष्ठभागाशी असणारा देट गोलाकार आकारात कापून घ्यावा.
२. त्यानंतर कांद्याच्या आतील गर हळूहळू चमच्याच्या मदतीने काढून घ्यावा. मग कांद्यातील गर काढल्यावर कांद्याला खोलगट दिव्यासारखा आकार आला असेल.
३. सर्वात आधी फुलवात तयार करता येईल इतका कापूस घ्यावा. आता हा कापूस एका सपाट पृष्ठभागावर व्यवस्थित पसरवून त्यात सुकलेल्या कडुलिंबाची पाने चुरा करून घालावीत सोबतच कापूर वडीची पावडर करून देखील घालावी. आता कापून गुंडाळून त्याला हाताने वळून वातीचा आकार द्यावा.
४. आता कांद्याच्या खोलगट भागात मोहरीचे किंवा कडुलिंबाचे तेल ओतावे. कापसाची वात संपूर्णपणे त्या तेलात भिजेल असे ठेवून द्यावे.
५. सगळ्यांत शेवटी ज्या ठिकाणी डास जास्त आहेत त्या ठिकाणी हा कांद्याचा दिवा ठेवून, माचिसच्या मदतीने दिवा लावावा.
दिवा जळताना यातून येणारा कडुलिंबाच्या तेलाचा वास, कापूर, कडुलिंबाची पाने यामुळे डास अगदी आसपास फिरकत देखील नाहीत.