पावसाळा सुरु झाला की त्यासोबत अनेक समस्याही घरात डोकावू लागतात. पावसाळा सुरु झाला की वारंवार सर्दी, खोकला, शिंका येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. यासोबतच फंगल इंफेक्शन्सचा धोका देखील संभवतो. याचबरोबर घरात सतत कुबट वास येणे, कपडे वेळेवर न सुकणे, घरात डास, माश्या सतत घोंघावणे, घराचे लिकेज होणे, फरशी कितीही वेळा स्वच्छ केली तरीही कुबट वास येणे, अशा असंख्य समस्यांचा सामना पावसाळ्यात करावा लागतो.
पावसाळयात बरेचदा फरशी ही वातावरणातील आर्द्रतेमुळे ओलसर झाल्यासारखी जाणवते. अशी फरशी कितीही वेळा पुसली तरीही त्यावरचा ओलसरपणा काही जात नाही. हा ओलसरपणा फरशीवर कायमचा टिकून राहतो. या ओलसरपणामुळे फरशी सतत ओली चिंब, भिजलेली असल्याकारणाने अशा फरशीवर सतत माश्या घोंगावताना दिसतात. पावसाळयात घरात सतत येणाऱ्या अशा डास, माशांमुळे तसेच किड्यांमुळे जीव नकोसा होतो. अशावेळी घराची कितीही साफसफाई करुन स्वच्छता ठेवली तरीही फरशीचा ओलावा व डास, माश्या येण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. परंतु पावसाळ्यात फरशी पुसताना पाण्यांत काही गोष्टी मिसळल्या तर फरशीही स्वच्छ राहते व घरातील डास, माश्या येण्याचे प्रमाण देखील कमी होते(Best Hacks and Tips to Getting Rid of Mosquitos at Home in this monsoon).
पावसाळयात फरशी स्वच्छ करताना पाण्यांत नेमकं काय मिसळावे ?
१. व्हिनेगर :- पावसाळ्याच्या दिवसांत फरशी पुसताना पाण्यांत व्हिनेगर मिसळा. व्हिनेगर पाण्यांत मिसळल्यामुळे फरशी स्वच्छ होण्यास मदत तर होतेच परंतु घरात येणाऱ्या डास, माशांचे प्रमाण देखील कमी होताना दिसते. पाण्यात टाकलेल्या व्हिनेगरचा वास घरभर पसरेल आणि कीटक व माशांही घरामध्ये येणार नाहीत.
पावसाळ्यांत कपड्यांवर पडलेले बुरशीचे काळे- हिरवे-पिवळे डाग काढण्यासाठी ६ सोपे उपाय...
२. फिनाईल :- फरशी पुसताना पाण्यांत फिनाईलचे काही थेंब घालावेत. या फिनाईलच्या पाण्याने घरांतील प्रत्येक कोपरा पुसून घ्यावा. फिनाईलच्या वासाने घरातील घरातील डास, कीटक, माश्या नाहीशा होण्यास मदत मिळते. तसेच फिनाईलमुळे फरशी देखील स्वच्छ होऊन फरशीवर ओलावा जास्तकाळ टिकून राहत नाही.
सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...
३. मीठ, बेकिंग सोड्याने साफसफाई करा :- पावसाळ्यात जर आपल्याला घरापासून कीटक दूर ठेवायचे असतील, तर आपण मॉपिंग करताना घरगुती क्लिनिंग सोल्यूशन तयार करू शकता. यासाठी आपल्याला बेकिंग सोडा, मीठ आणि व्हिनेगर लागेल. सर्वप्रथम, एका बादलीत पाणी भरा आणि त्यात २ ते ३ चमचे बेकिंग सोडा, २ चमचे मीठ आणि २ ते ३ चमचे व्हिनेगर घाला. या सर्व गोष्टी मिसळा आणि नंतर स्वयंपाकघरसह सर्व ठिकाणे पुसून घ्यावीत. यामुळे पावसाळी किडे, माशा घरात येणार नाहीत.
पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
४. तुळशीची पाने :- तुळशीच्या पानांचा सुगंध आल्याने माशा घरात येत नाहीत. प्रत्येकाच्या घरात तुळस असतेच. अशा स्थितीत तुळशीच्या पानांचा वापर करून घरगुती स्प्रे बनवू शकता. यामुळे माशा पळून जातील. तुळशीचा स्प्रे बनवण्यासाठी सुमारे १५ ते २० पाने गरम पाण्यात भिजवा आणि थोड्या वेळाने हे मिश्रण पाण्यांत मिसळा. आता या पाण्याने फारशी स्वच्छ पुसून घ्यावी. याचबरोबर तुळशीच्या पानांचे बनवलेले द्रावण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. जिथे आपल्याला माशी दिसेल तिथे या स्प्रेची फवारणी करू शकता.
५. एसेन्शियल ऑइल :- लवंग तेल, पेपरमिंट ऑइल, ओव्याचं तेल, लेमनग्रास ऑइल किंवा दालचिनीचं तेल या सारखे एसेन्शियल ऑइल देखील माशा पळवून लावण्यासाठी वापरता येऊ शकतात. २ कप पाणी २ कप व्हिनेगर आणि १० ते १५ थेंब कोणतही एसेन्शियल ऑइल वापरून स्प्रे तयार करा. स्प्रे बॉटलमध्ये भरून माशा येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा. याचबरोबर फरशी पुसताना या एसेन्शियल ऑइलचे काही थेंब पाण्यांत घालून या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. यामुळे फारशी तर स्वच्छ होतेच शिवाय घरात डास, माशा येण्याचे प्रमाण कमी होते.