Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमानं कुणासाठी गिफ्ट घेता पण त्यांना त्याचं कौतुकच नाही? गिफ्ट देताना ‘ही’ १ गोष्ट कायम लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2026 14:43 IST

Best Gift Ideas for Wedding Season: कोणताही समारंभ असला तरी गिफ्ट देताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा.. तुमचे पैसे अजिबात वाया जाणार नाहीत...

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. आता लग्नसराई म्हटलं की लग्न जवळचं असो किंवा मग दुरचं असो.. आहेर तर करायचाच असतो. तरी हल्ली बऱ्याच लग्नांमध्ये नवरदेव किंवा नवरी गिफ्ट स्विकारत नाहीत. पण हे प्रमाण तसं कमीच आहे. लग्नाशिवाय वाढदिवस, वास्तूशांती, मौंज असे कित्येक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांनाही गिफ्ट्सची देवाणघेवाण होतेच.. शिवाय यात एक मोठी अडचण अशी असते की पैसा खर्च करून आपण आणलेलं गिफ्ट दुसऱ्याला आवडेलच असं नाही. त्याचा वापर होईलच असं नाही. म्हणूनच कोणालाही गिफ्ट देण्यापुर्वी थोडा विचार नक्की करा जेणेकरून त्याचा खरंच उपयोग होईल आणि तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत.(Best Gift Ideas for Wedding Season)

लग्नकार्यात गिफ्ट देण्यापुर्वी हा विचार नक्की करा...

 

१. समोरच्याची गरज ही गोष्ट कोणालाही गिफ्ट देण्यापुर्वी सगळ्यात आधी विचारात घेणं आवश्यक आहे. कारण गरजेनुसार वस्तू दिली गेली तरच ती वापरली जाते. त्यामुळे ज्याला गिफ्ट देणार आहात ती व्यक्ती जर तुमची खूप जवळची असेल तर तिला सरळ काय गिफ्ट द्यायचं म्हणूनच विचारा आणि तिच्या आवश्यकतेनुसार वस्तू आणून द्या. त्याचा चांगला उपयोग होईल.

 

२. आपण नेहमीच पाहातो की काही ठेवणीतल्या वस्तू जसं की क्रॉकरी सेट, ग्लासचे सेट, कप सेट हे जेवढ्या संख्येने गिफ्ट म्हणून आपल्या घरात येतात, तेवढी त्यांची अजिबातच गरज नसते. त्या मग एकीकडून दुसरीकडे फिरत राहतात. त्यामुळे या वस्तू देण्यापेक्षा तुमचं जेवढं बजेट असेल तेवढे पैसे पाकिटात घालून द्या. मग अगदी १०० रुपये तुम्ही दिले जरी चालतील. कारण त्याचा हमखास उपयोग होतो. त्या पैशांमधून समोरच्याला जे पाहिजे ते घेता येते आणि पैशांचा अपव्यय टळतो.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thoughtful gifting: Consider needs before giving gifts for appreciation.

Web Summary : Before gifting, consider the recipient's needs, especially during wedding season. Practical gifts or even cash are better than unwanted items. Thoughtful gifting avoids waste and ensures appreciation.
टॅग्स :सोशल व्हायरलगिफ्ट आयडिया