Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा खरा पागल 'लव्हर बॉय'! गर्लफ्रेंडचा वाढदिवस म्हणून त्याने पाहा काय विचित्र पराक्रम केला, व्हिडीओ व्हायरल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 10:57 IST

real life lover boy: lover boy viral video: girlfriend 26th birthday surprise: गर्लफ्रेंडच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल २६ किलोमीटर धावून तिला एक आगळंवेगळं सरप्राईज दिलं आहे.

प्रेमात पडलेली माणसं काय करतील याचा नेम नाही, असं उगाच म्हटलं जात नाही. कोणी प्रेमासाठी ताजमहाल बांधतो तर कोणी सातासमुद्र पार जातो. सध्याच्या काळात वाढदिवस म्हटलं की महागड्या हॉटेल्समध्ये पार्टी, ब्रँडेड गिफ्ट्स किंवा एखादी ट्रिप हे समीकरण.(real life lover boy) मात्र याला भेदून एका तरुणाने प्रेमाची एक वेगळीच व्याख्या मांडली. (lover boy viral video)सध्या सोशल मीडियावर अशाच एका 'लव्हर बॉय'ची चर्चा रंगली आहे, ज्याने आपल्या प्रेयसीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणतंही महागडं गिफ्ट न निवडता, स्वतःच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लावली.(girlfriend 26th birthday surprise) या पठ्ठ्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल २६ किलोमीटर धावून तिला एक आगळंवेगळं सरप्राईज दिलं आहे. हा 'रिअल लाईफ' पराक्रम सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी या तरुणाच्या जिद्दीला सलाम करत आहेत.

खरंतर २६ किलोमीटर न थांबता धावणं कठीणचं. बेंगळूरच्या अविक भट्टने आपल्या प्रेयसीचा २६ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी २६ किलोमीटर धावतानाचा एक व्हिडीओ इन्ट्राग्रामवर शेअर केला आणि तासाभरातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओ सोशल मीडियावरील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा व्हिडीओ भट्टाचार्याची  सिमरन हिचा संयुक्त इंस्टाग्राम अकाउंट @simranxavik वरून हा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडीओच्या सुरुवातीला सिमरन म्हणते की तिला तिच्या वाढदिवशी २६ किमी स्वत:धावायचे होते पण तिची तब्येत ठीक नव्हती. तिने या कृतीवर मला या माणसाशी कसे जुळवायचे हे माहित नाही. भट्टाचार्य म्हणतो, माझी मैत्रीण नुकतीच २६ वर्षांची झाली, म्हणून मी तिच्या वाढदिवसासाठी २६ किमी धावणार आहे. त्याने तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली. तो आणि सिमरन अडीच आठवड्यानंतर येणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची तयारी देखील करत आहे. माझं आजचं धावणं हे तिच्यासाठी होतं. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी इंस्टाग्रामवर कमेंट्स देखील केल्या. 

सिनेमात आपण हिरोला अशक्य गोष्टी करताना पाहतो, पण खऱ्या आयुष्यात आपल्या माणसाला आनंद देण्यासाठी घेतलेली ही कष्ट मेहनत कोणत्याही फिल्मी सीनपेक्षा कमी नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Real-life 'Lover Boy' Runs 26km for Girlfriend's Birthday Surprise!

Web Summary : A Bengaluru man, Avik Bhatt, ran 26km to celebrate his girlfriend Simran's 26th birthday. Instead of expensive gifts, he chose a unique way to show his love, which went viral. The couple is also preparing for the Mumbai Marathon.
टॅग्स :सोशल व्हायरल