Join us
Daily Top 2Weekly Top 5

चली चली रे पतंग...! मकर संक्रांतीला मनसोक्त पतंग उडवा आणि मुलांनाही उडवू द्या, ५ फायदे आणि आनंद भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2026 18:35 IST

Makar Sankranti 2026: पुढे सांगितलेले काही फायदे वाचाल तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हीही अगदी आवर्जून पतंग उडवायला जाल..(health benefits of kite flying on makar sankranti)

ठळक मुद्देउन्हात जाऊन पतंग उडविल्याने आरोग्याला कित्येक लाभही होतात. ते नेमके कोणते पाहा..

कोणताही सण म्हटला की त्याचा एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. ज्या त्या सणाच्या निमित्ताने एकेक वेगळी प्रथा- परंपरा पाहायला मिळते. आता संक्रांत म्हणजे महिलांच्या दृष्टीने वाण देणे, हळदी- कुंकू करणे, तिळगूळ घेणे आणि देणे असे कार्यक्रम असतात (Makar Sankranti 2026). पण पुरुष आणि बच्चे कंपनीला मात्र या काळात होणाऱ्या पतंगबाजीचं खूप आकर्षण असतं. त्यांच्या दृष्टीने संक्रांत म्हणजे पतंगबाजी. गुजरात येथील पतंगबाजी प्रसिद्ध असली तर देशभरातच आता पतंगबाजीचा जल्लोष दिसून येतो. पंतगांचा हा उत्सव का सुरू झाला असावा, त्याची अनेक लोक वेगवेगळी कारणं सांगतात (health benefits of kite flyig on makar sankranti). पण तो मात्र आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरतो. उन्हात जाऊन पतंग उडविल्याने आरोग्याला कित्येक लाभही होतात. ते नेमके कोणते पाहा..(benefits of flying kites)

 

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याचे फायदे

या दिवसांत खूप थंडी असते. अशा थंड वातावरणामुळे कित्येकांना पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळत नाही. त्यामुळे अंगदुखी वाढते. अशावेळी जर तुम्ही थोडं उन्हात जाऊन पतंग उडवले तर अंग मोकळं होतं. व्हिटॅमिन डी मिळतं आणि शरीरात उब निर्माण होते.

'हे' त्रास असणाऱ्या लाेकांसाठी अमृतासमान आहे तांब्याच्या भांड्यातलं पाणी, पाहा कसं आणि किती प्यावं

पतंग उडविण्यातून जो काही आनंद मिळतो त्यामुळे शरीरावरचा, मनावरचा तणाव कमी होण्यास मदत होते. स्ट्रेस कमी झाल्याने कॉर्टीसॉल हार्मोन्सची पातळीही कमी होत जाते. 

पत्रिका डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार डॉ. अखिलेश जैन असं सांगतात की कॅलरी बर्न करण्यासाठीही पतंगबाजी उपयुक्त ठरते. तो एक प्रकारचा व्यायामच आहे. ताज्या, मोकळ्या हवेत यानिमित्ताने आपण काही वेळ घालवतो. त्यामुळे ते फुफ्फुसाच्या आरोग्यासाठीही चांगली ठरते.

 

पतंग उडवत असताना आपण आकाशात दूरवर नजर लावतो. असं निळ्याशार आकाशाकडे पाहताना डोळ्यांचाही चांगला व्यायाम होतो. यामुळे नजरेतही सुधारणा होऊ शकते.

संक्रांत स्पेशल इंस्टंट ग्लो देणारं फेशियल, घरातलेच पदार्थ 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, १५ मिनिटांत त्वचा चमकेल

एवढंच नाही तर पतंग उडवणं हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं असं म्हणतात. कारण यामुळे शरीर ॲक्टीव्ह असतं. शिवाय आपण मोकळ्या शुद्ध हवेत असतो. यामुळे रक्ताभिसरण अधिक चांगले होते. त्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते.   

English
हिंदी सारांश
Web Title : Fly kites on Makar Sankranti: 5 amazing health benefits revealed!

Web Summary : Makar Sankranti kite flying offers Vitamin D, stress relief, calorie burn, eye exercise, and heart health benefits. Enjoy the sun and fresh air!
टॅग्स :सोशल व्हायरलमकर संक्रांती