Join us  

दीपिकाचा ४४ हजार रुपयांचा बांधणी सिल्क कुर्ता; कमाल नजाकत! बांधणी सिल्कची काय पारंपरिक खासियत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 5:05 PM

Ethnic kurta of Actress Deepika Padukon: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे ब्राईट लाल (bright red kurta) रंगाच्या कुर्त्यातले काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल (social viral) झाले असून दीपिकाचा हा सिल्क कुर्ता तब्बल ४४ हजार रूपयांचा असल्याचे सांगितले जाते. 

ठळक मुद्देसिल्कवर बांधणी टाय करणे कठीण असल्याने बांधणी सिल्क या प्रकारातल्या कपड्यांच्या किमती इतर कपड्यांपेक्षा तुलनेने अधिक जास्त असतात.

दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या प्रमुख भूमिका असलेला 83 ( bollywood movie 83) हा चित्रपट लवकरच रिलिज होणार आहे. या पार्श्वभुमीवर दीपिका नुकतीच मुंबई येथील सिद्धी विनायक मंदिरात (sidhdhi vinayak temple) गेली आणि बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून आली.

 

यावेळी दीपिकाने पारंपरिक वेशभुषा केली होती. तिने जो लाल रंगाचा कुर्ता घातला हाेता, त्याची जबरदस्त चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. या कुर्त्यामधे दीपिका अतिशय देखणी तर दिसत होतीच, शिवाय तिची उंचीही अधिक आकर्षक वाटत होती. दीपिकाच्या या कुर्त्याची किंमत ४४ हजार ८०० रूपये एवढी असून तो रॉ मँगो या ब्रँण्डने डिझाईन केला आहे. 

 

बांधणी सिल्क किंवा बांधेज सिल्क या प्रकारातला हा कुर्ता होता. कुर्त्याचा रंग खूपच ब्राईट असल्याने तो दीपिकाला पुर्णपणे इथनिक लूक देणारा ठरला. कुर्त्याचा गळा समोरून व्ही शेपचा होता आणि गळ्याच्या व्ही लाईनवर पुर्णपणे हॅण्ड एम्ब्रॉयडरी करून ती खुलविण्यात आली होती. तिचा हा कुर्ता खूपच लूज फिटिंगचा होता. यावर तिने स्ट्रेट फिट सलवार घातली होती. सिद्धी विनायक मंदिरातून बाहेर आल्यानंतर दीपिकाने हात हलवून तिच्या चाहत्यांना बाय केले.. 

 

बांधणी सिल्कची काय पारंपरिक खासियतBandhani or Bandhej silk speciality बांधणी सिल्क किंवा बांधेज सिल्कचे अनेक कुर्ते, ड्रेस मटेरिअल, साड्या बाजारात असंख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. अगदी ५०० रूपयांपासून बांधणी साड्यांची सुरूवात होते. मग दीपिकाचा कुर्ता एवढा का विशेष की त्याची किंमत तब्बल ४४, ८०० रूपये एवढी असावी, असा प्रश्न पडणे अगदी साहजिक आहे. दीपिकाने जो कुर्ता घातला आहे, त्यावर महागडे सिल्क थ्रेड वापरून हॅण्ड एम्ब्रॉयडरी करण्यात आली असल्याने या कुर्त्याची किंमत एवढी जास्त असल्याचे सांगितले जाते.

 

बांधणी सिल्क किंवा बांधेज सिल्क हे मुळचे गुजरातच्या कच्छ प्रांताचे. टाय आणि डाय या दोन क्रिया बांधणी कलेत केल्या जातात. लाल, हिरवा, काळा, निळा आणि पिवळा हे दोन रंग बांधणी सिल्कमध्ये जास्त वापरले जातात. कालांतराने राजस्थानमध्येही बांधणी वर्क केले जाऊ लागले. पण राजस्थानी आणि गुजराती बांधणी यांची ठेवण, नक्षी पुर्णपणे वेगवेगळे आहेत. गुजरातची बांधणी ही कच्छी बांधणी किंवा कच्छी बांधेज म्हणून जास्त ओळखले जाते. मशिनचा वापर न करता हाताने ज्या कपड्यावर टाईंग आणि डाईंग करण्यात येते, त्या कापडाची किंमत जास्त असते. कॉटन, जॉर्जेट, सिल्क या कपड्यावर बांधणी करता येते. यापैकी अतिशय तलम कपडा असल्याने सिल्कवर बांधणी टाय करणे कठीण असल्याने बांधणी सिल्क या प्रकारातल्या कपड्यांच्या किमती इतर कपड्यांपेक्षा तुलनेने अधिक जास्त असतात. त्यामुळेच तर दीपिकाचा लाल कुर्ता एवढा महागडा आहे. 

image credit:

https://www.instagram.com/afashionistasdiaries/

and pinkvilla.com/

 

टॅग्स :सोशल व्हायरलदीपिका पादुकोणफॅशनमुंबईसिद्धीविनायक देवस्थान८३ सिनेमा