Join us

चक्क पाळीव कुत्रीचं केलं डोहाळेजेवण आणि थाट असा केला की.... व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 16:52 IST

Baby Shower of a Pet Dog: डोहाळेजेवणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) झाला आहे. बघा नेमकं कशा पद्धतीने पार पडलं हे अनोखं डोहाळेजेवण

ठळक मुद्देकुत्र्यावर अगदी जिवापाड प्रेम करणाऱ्या त्या महिलेचं तर सगळ्यांना कौतूक वाटत आहेच, पण हे सगळं ते कुत्रं किती छान पद्धतीने एन्जॉय करतंय, हा पण चर्चेचा विषय ठरतो आहे. 

सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी सगळ्यात जास्त पसंती मिळवणारे व्हिडिओ असतात ते लहान मुलांचे आणि प्राण्यांचे. सध्या एका पेट डॉगचा मजेशीर व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. यामध्ये एका पेट लव्हर महिलेने तिच्या घरच्या पाळीव कुत्रीचं चक्क डोहाळेजेवण (Baby Shower of a Pet Dog) केलं आहे. यादरम्यान तिने त्या डॉगीचा असा काही थाट केला की तो पाहूनच अनेकांना तिच्याबद्दल कौतूक वाटत आहे. त्यामुळे थेाडा वेळ काढून एकदा बघाच हा व्हायरल व्हिडिओ (funny viral video).

 

काही दिवसांपुर्वी 'व्हॅनिला' हा एक मराठी चित्रपट आला होता. एक शाळकरी मुलगी आणि तिचं तिच्या कुत्र्यावर असणारं जिवापाड प्रेम.. असा त्या चित्रपटाचा विषय होता.

स्ट्रेस घालवून रिफ्रेश होण्यासाठी ट्विंकल खन्ना करते १ भन्नाट उपाय... बघा तिचा व्हायरल व्हिडिओ

या चित्रपटात ती मुलगीही मोठ्या हौशेने तिच्या त्या कुत्रीचं डोहाळेजेवण करते, असा सीन आहे. हाच सीन प्रत्यक्षात उतरविण्याचं काम व्हिडिओमधल्या या महिलेने केलं आहे. suja_housemate या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघणं खरंच खूप गमतीशीर आहे.

 

कसं केलं डोहाळेजेवण?डोहाळेजेवणासाठी अतिशय जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वप्रथम त्या कुत्रीला एका आसनावर बसवण्यात आलं. त्यानंतर तिच्या अंगावर नवी शाल टाकण्यात आली. गळ्यात मस्त गुलाबी फुलांचा हार घातला.

थंडी सुरू होताच डोक्यातला कोंडा वाढून केस गळणं सुरू? करून पहा ५ गुणकारी घरगुती उपाय

तिच्या डोक्याला आणि पुढच्या दोन्ही पायांना चंदन लावण्यात आलं. त्याच बरोबर तिचे पुढचे पाय हे तिचे हात आहेत, असं समजून तिच्या हातात बांगड्याही घालण्यात आल्या. त्यानंतर विविध पदार्थ असणारं ताट त्या कुत्रीपुढे ठेवण्यात आलं आणि त्याच ताटाप्रमाणे इतरही २- ३ ताटं वाढण्यात आली. ही ताट मग नंतर गल्लीतल्या इतर कुत्र्यांना खाऊ घातली गेली. कुत्र्यावर अगदी जिवापाड प्रेम करणाऱ्या त्या महिलेचं तर सगळ्यांना कौतूक वाटत आहेच, पण हे सगळं ते कुत्रं किती छान पद्धतीने एन्जॉय करतंय, हा पण चर्चेचा विषय ठरतो आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकुत्रामहिला