Lokmat Sakhi >Social Viral > अरुणाचल प्रदेशातल्या लहानशा मुलीनं गोड आवाजात मनापासून म्हंटलेलं राष्ट्रगीत ऐका, डोळ्यात पाणीच येईल...

अरुणाचल प्रदेशातल्या लहानशा मुलीनं गोड आवाजात मनापासून म्हंटलेलं राष्ट्रगीत ऐका, डोळ्यात पाणीच येईल...

Arunachal girls soulful rendition of Jana Gana Mana goes viral : national anthem India : viral news : Arunachal Pradesh: अरुणाचलमधील चिमुकल्या मुलीचा राष्ट्रगीत गातानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2025 14:43 IST2025-08-08T14:31:28+5:302025-08-08T14:43:11+5:30

Arunachal girls soulful rendition of Jana Gana Mana goes viral : national anthem India : viral news : Arunachal Pradesh: अरुणाचलमधील चिमुकल्या मुलीचा राष्ट्रगीत गातानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल...

Arunachal girls soulful rendition of Jana Gana Mana goes viral | अरुणाचल प्रदेशातल्या लहानशा मुलीनं गोड आवाजात मनापासून म्हंटलेलं राष्ट्रगीत ऐका, डोळ्यात पाणीच येईल...

अरुणाचल प्रदेशातल्या लहानशा मुलीनं गोड आवाजात मनापासून म्हंटलेलं राष्ट्रगीत ऐका, डोळ्यात पाणीच येईल...

आपल्या देशाबद्दलचे प्रेम हे सगळ्यांच्याच मनात कायम असते. देशाप्रती असणारे प्रेम आणि आपल्या भावना आपण वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्त करतो. सध्याच्या काळात वेगवेगळ्या सोशल मिडिया (national anthem India) माध्यमांवरून लहान मुलांचे अनेक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल(Arunachal Pradesh) होताना दिसतात. नुकताच अरुणाचल प्रदेशातील एका चिमुकलीचा राष्ट्रगीत गातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'रोईंग' येथील आमदार मुच्छू मिथी यांनी हा व्हिडिओ गुरुवारी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला(Arunachal girls soulful rendition of Jana Gana Mana goes viral).

देशप्रेमाची खरी जाणीव काहीवेळा अगदी निरागस स्वरांतून व्यक्त होते आणि मनाला भिडते, याचे उत्तम उदाहरण म्हणजेच ही चिमुरडी आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या लहानग्या मुलीचा छोटासा गोड आवाज, डोळ्यांतली निरागसता आणि प्रत्येक ओळीतून झळकणारा देशाभिमान यामुळे हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात देशभक्तीची नवी ऊर्जा तयार झाली आहे. 

अरुणाचल प्रदेशातील एका चिमुरडीने ‘जन गण मन’ हे आपले राष्ट्रगीत गातानाचा असा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चेत आहे. तिच्या गोड आवाजातील निरागसता आणि मनापासून व्यक्त झालेला देशप्रेमाचा भाव, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची भावना आणि देशाबद्दलचे प्रेम अधिक वाढवत आहे. 

NET Northeast Today या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश घातलेली एक लहान मुलगी डोळे मिटून, मनोभावे आणि निरागसतेने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गाताना दिसते. तिच्या आवाजातील निर्मळ भावना, देशाविषयीचा अभिमान आणि गाण्यातील निरागस भावनांनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

कचऱ्यात फेकले जाणारे ५ पदार्थ मोगऱ्याच्या रोपासाठी वरदान! फुलांचा येईल बहर -घरभर दरवळेल सुगंध...    

फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? ६ टिप्स, एका मिनिटात बर्फ वितळून फ्रिज होईल स्वच्छ...

'रोईंग' येथील आमदार मुच्छू मिथी यांनी हा व्हिडिओ गुरुवारी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की – “अरुणाचलमधील एका कोपऱ्यातून आलेला हा छोटासा आवाज, आपल्या राष्ट्र्रगीताचे बोल संपूर्ण देशभरात निनादत आहेत, आणि जगाला सांगत आहे – ‘I am India and India is me.’ जय हिंद.” सोशल मिडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून हजारो वेळा शेअर होत असून, लोक या चिमुकलीच्या देशप्रेमाने भारावून गेले आहेत.

Web Title: Arunachal girls soulful rendition of Jana Gana Mana goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.