Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुरशी-काळे डाग पडलेले कांदे खावे का? ‘सायलेंट पॉयझन' टाळा डॉक्टर्सचा इशारा- पाहा ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2025 09:30 IST

Mold on onions: Black spots on onion: Are moldy onions safe : कांद्याला बुरशी का लागते?, जाणून घ्या कारण

कांदा हा भारतीय स्वयंपाकघरात नेहमीच वापरला जातो. भाजी असो, चटणी असो किंवा जेवणातला साधा फोडणीचा स्वाद, कांदा नसला की जेवणच अपूर्ण वाटतं. पण आपण रोज वापरत असलेला हाच कांदा आपल्या आरोग्यासाठी विषासमान ठरु शकतो.(Mold on onions) खरं तर बाजारात मिळणाऱ्या अनेक कांद्यावर काळे डाग, पावडरसारखी काळी बुरशी दिसते. स्वस्त मिळत असल्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण ही दिसायला साधी वाटणारी बुरशी आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. (Onion safety tips)कांद्यावर दिसणारी ही काळी बुरशी म्हणजे Aspergillus niger नावाचा फंगस. हा फंगस केवळ कांद्याला खराब करत नाही तर तो शरीरात फूड पॉइझनिंग, पोटदुखी, उलटी, अतिसार, श्वसनाचा त्रास अशा गंभीर समस्या निर्माण करु शकतो.(How to choose fresh onions) याचा सगळ्यात जास्त परिणाम हा लहान मुले आणि गरोगर महिलांवर होऊ शकतो. 

लाडक्या लहान लेकीसाठी चांदीचा खास दागिना, छुमछूम वाजणारे ५ सुंदर पैंजण- लहान मुलींसाठी खास..

अनेकदा आपण कांद्याची पिशवी घेताना फक्त बाहेरुन कांदे बघतो आणि ती पिशवी घेतो. पण याच पिशवीतल्या एका खराब कांद्यामुळे पूर्ण कांदा महिन्याभरात कुजून जातो. त्यामुळे योग्य कांदा निवडणं आणि त्याची नीट साठवणूक करणं अतिशय आवश्यक आहे.

कांद्यांना बुरशी लागण्याची मोठी कारणे म्हणजे जास्त ओलावा, चुकीची स्टोरेज पद्धत, थंडीत जास्त काळ साठवणूक किंवा खराब असलेले कांदे निवडणे. कांद्यांना एकदा का बुरशी लागली की ते इतर कांद्यांना देखील खराब करतात. म्हणून बाजारातून कांदे आणताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

तुम्ही काय गूगल करून खाल्ले? पाहा २०२५ मध्ये भारतात सर्वात जास्त शोधण्यात आलेले १० पदार्थ! उकडीचा मोदक आणि...

कांदा महिनाभर फ्रेश ठेवण्यासाठी बुरशी नसलेला, कोरडा आणि कडक कांदा निवडा. वरच्या सालीवर काळे डाग, ओलावा किंवा मऊ भाग दिसला तर कांदा घेऊ नका. कांदे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका—त्यामुळे ते पटकन खराब होतात. कांदा हवेशीर भागात ठेवा, ज्यामुळे त्याचा वास येणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't eat moldy onions! Doctor's warning and 4 safety tips.

Web Summary : Moldy onions, often overlooked, pose health risks like food poisoning. Choose firm, dry onions, avoiding those with dark spots. Store in a well-ventilated area, not the refrigerator, to prevent spoilage.
टॅग्स :सोशल व्हायरल