विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी सगळ्यांनाच माहिती आहे. विराट कोहली आजवरच्या त्याच्या सगळ्या यशाचं श्रेय अनुष्का शर्माला देतो आणि ती प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहून त्याचा आधार बनते म्हणून तिचं नेहमीच भरभरून कौतूक करतो. पण विराट कोहलीच्या चाहत्यांच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच आहे. विराट चांगला खेळतो तोपर्यंत त्याच्या चाहत्यांसाठी सगळं काही ठिक असतं. तोपर्यंत अनुष्कापण त्यांच्यासाठी चांगली असते. पण विराट अयशस्वी ठरला तर मग मात्र ते अपयशाचं सगळं खापर तिच्या डोक्यावर फोडतात. विराटच्या चाहत्यांकडून अनुष्काचं होणारं ट्रोलिंग आता अनुष्काच्या चाहत्यांनाही सहन झालं नाही आणि त्यांनीही ट्रोलर्सला जबरदस्त उत्तर दिलं...
आता खेळ म्हटलं की हरणं, जिंकणं आलंच... विराट कोहलीही त्याला अपवाद नाहीच. तो ही जसा जिंकतो तसाच काही वेळेला हरतो.
तुपापासून घरीच तयार करा मॉईश्चरायजर- बघा सोपी पद्धत, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही
काही सामन्यांमध्ये त्याची खेळी कमालीची असते तर काही सामन्यात तो शुन्यावरही आऊट होतो. ऑस्ट्रेलियासोबत चालू असणाऱ्या मालिकेत असंच झालं. लगातार दोन सामन्यांमध्ये त्याची खेळी खराब झाली.
आता तो अपयशी होणं आणि त्यासाठी अनुष्काला जबाबदार धरणं हे खूपच पोरकटपणाचं आहे. पण विराटचे चाहते तेच करून अनुष्काला ट्रोल करत आहेत.
डाळ बट्टीचा बेत? गव्हाच्या पिठापासून करा खुसखुशीत खमंग बट्टी- घ्या झटपट होणारी सोपी रेसिपी
यामुळे अनुष्काचे चाहते संतापले असून हा पुरुषी अहंकार सुखावण्याचाच एक प्रकार असल्याचं ते बोलत आहेत. विराटच काय पण कोणत्याही पुरुषाच्या अपयशासाठी अशा पद्धतीने महिलांना दोष देणं हे खूप चुकीचं आहे. कारण शेवटी जो चूक करतो तोच त्यासाठी जबाबदार असतो. नाही का?
