lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अनुष्का शर्मा आणि आलिया भटनं स्वीकारलं  जुगनू डान्स चॅलेंज! आहे काय प्रकार, कौतुक नेमकं कशाचं 

अनुष्का शर्मा आणि आलिया भटनं स्वीकारलं  जुगनू डान्स चॅलेंज! आहे काय प्रकार, कौतुक नेमकं कशाचं 

अनुष्का आणि आलियानं बादशहाचं हे जुगनू डान्स चॅलेंज पूर्ण करताना अतिशय उत्साहाने डान्स केला आहे. हा डान्स करताना त्यांच्या हावभावातून त्यांच्या मूळ स्वभवाची झलकही पाहायला मिळत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 02:25 PM2021-10-29T14:25:09+5:302021-10-29T14:32:31+5:30

अनुष्का आणि आलियानं बादशहाचं हे जुगनू डान्स चॅलेंज पूर्ण करताना अतिशय उत्साहाने डान्स केला आहे. हा डान्स करताना त्यांच्या हावभावातून त्यांच्या मूळ स्वभवाची झलकही पाहायला मिळत आहे.

Anushka Sharma and Alia Bhatt accept Jugnu Dance Challenge! See How they complete that? | अनुष्का शर्मा आणि आलिया भटनं स्वीकारलं  जुगनू डान्स चॅलेंज! आहे काय प्रकार, कौतुक नेमकं कशाचं 

अनुष्का शर्मा आणि आलिया भटनं स्वीकारलं  जुगनू डान्स चॅलेंज! आहे काय प्रकार, कौतुक नेमकं कशाचं 

Highlightsअनुष्कानं शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या डान्ससोबतच मूल झाल्यानंतर तिने पुन्हा मिळवलेला फिटनेस कौतुकाचा विषय ठरला आहे.आलिया भटनं डान्सद्वारे स्टायलिश अदा दाखवताना आपला लूकही असाच स्टायलिश ठेवला आहे. तिने फिकट जांभळ्या रंगाची पॅण्ट आणि त्यावर टॅंक टॉप घातला असून डोळ्यांवर फॅन्सी गॉगलही आहे.

सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या चॅंलेन्जेसची चलती असते. या चॅलेन्जेसमधे सामान्यांपासून स्टारपर्यंत अनेकजण भाग घेऊन आपल्या प्रतिक्रिया, आपल्या एक्सप्रेशन्सला अभिव्यक्त करत असतात. सध्या यूट्यूबवर अनुष्का आणि आलिया भटच्या एका डान्सला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. अनुष्का शर्माच्या चुलबुलेपणाला तर आलियाच्या स्टायलिश अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या डान्स चॅलेन्जमधे आम्ही सहभागी झालो तसं तुम्हीही सहभागी होवून नाचण्याचा आनंद घेण्याचं आवाहनही या दोघींनी केलं आहे.

https://www.instagram.com/reel/CVj-YGVADeV/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" style=" background:#FFF; border:0; border-radius:3px; box-shadow:0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width:540px; min-width:326px; padding:0; width:99.375%; width:-webkit-calc(100% - 2px); width:calc(100% - 2px);">
https://www.instagram.com/reel/CVj-YGVADeV/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" background:#FFFFFF; line-height:0; padding:0 0; text-align:center; text-decoration:none; width:100%;" target="_blank">
https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink">
View this post on Instagram

https://www.instagram.com/reel/CVj-YGVADeV/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" style=" color:#c9c8cd; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none;" target="_blank">A post shared by Virushka Empire (@virushka_empire)

अनुष्का आणि आलिया यांनी स्वीकारलेलं हे डान्स चॅलेंज आहे काय नेमकं? तर रॅपर बादशहाचा ‘जुगनू’ हा नवीन म्युझिक अल्बम आला आहे. या गाण्यावर स्वत: बादशहाने काही स्टेप्स दाखवून आता तुम्ही करा? म्हणत बघणार्‍यांना आवाहन केलं आहे. जुगनू अल्बम प्रचंड गाजत असल्यामुळे बादशहाच्या चॅलेंमधे अनेकजण सहभागी झाले आणि बादशहानं शिकवलेल्या स्टेपनुसार डान्स केला. यात सर्वसामान्य माणसांप्रमाणेच स्टार कलाकारांनीही सहभाग घेऊन बादशहानं दिलेलं चॅलेन्ज स्वीकारलं आहे. यात अनुष्का आणि आलिया यांच्या आधी इतर कलाकारही सहभागी झाले होते. पणा सध्या चर्चा होतेय ती केवळ अनुष्का आणि आलियानं केलेल्या डान्सची.

Image: Google

अनुष्का आणि आलियानं बादशहाचं हे जुगनू डान्स चॅलेंज पूर्ण करताना अतिशय उत्साहाने डान्स केला आहे. हा डान्स करताना त्यांच्या हावभावातून त्यांच्या मूळ स्वभवाची झलकही पाहायला मिळत आहे. अनुष्काच्या हावभावांमधून तिचा चुलबुला स्वभाव प्रतीत होत आहे तर आलियानं आपण कसं स्टायलिश आहोत हे डान्स करताना दाखवून दिलं आहे.
अनुष्कानं शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमधे अनुष्काला खूप महिन्यांनी नृत्य करतांना पाहून चाहत्यांना आनंद तर झालाच पण बाळांतपणानंतर अवघ्या नऊ महिन्यात अनुष्कानं पूर्वीसारखा फिटनेस राखलेला बघून तिचं कौतुक आणि त्याबाबतचं आश्चर्यही तिच्या या व्हिडीओवर प्रतिसाद देताना व्यक्त केल्या आहेत. खूप महिन्यांपासून अनुष्काचा पडद्यावरचा हलका फुलका वावर बघण्यास आपण उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. या व्हिडीओमधे अनुष्काने वन शोल्डर काळ्या रंगाचा टॉप, निळी डेनिम पॅण्ट आणि पायात पांढरे स्नीकर्स घातले आहेत. जुगनूनं मला असं उत्साहानं नाचायला भाग पाडलं आहे असं म्हणत, तुम्ही काय म्हणता, तुम्हीही करणार का? असा प्रश्न अनुष्का व्हिडीओ शेअर करताना विचारते.

Image: Google

अनुष्का शर्माच्या व्हिडीप्रमाणेच आलियानेही ‘जुगनू’चॅलेंज स्वीकारुन आपल्या डान्सची पोस्ट समामाध्यमांवर शेअर केली आहे.आलियानेही या चॅलेंजला गांभिर्यानं घेऊन तिच्या मूळ स्वभावाप्रमाणे तिने ‘जुगनु’वर स्टायलिश डान्स करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्टायलिश अदा दाखवताना आलियानं आपला लूकही असाच स्टायलिश ठेवला आहे. तिने फिकट जांभळ्या रंगाची पॅण्ट आणि त्यावर टॅंक टॉप घातला असून डोळ्यांवर ग् फॅन्सी गॉगल चढवला आहे. फक्त चित्रपटातच नाहीतर इन्स्टंट चॅलेंजवरही आपण दिलखुलासपणे उत्कृष्ट डान्स करु शकतो हे आलिया आणि अनुष्काने दाखवून दिलं आहे. एका गंमतीशीर चॅलेंजमधे गांभिर्यानं सहभागी होतं आपल्यातलं बेस्ट देणार्‍या अनुष्का आणि आलियाच्या जुगनू डान्सिंग चॅलेंजच्या व्हिडीओजचं म्हणूनच कौतुक होत आहे.

या दोघींचा जुगनू डान्स पाहून आपलेही पाय उत्साहानं नाचण्यासाठी , थिरकण्यासाठी सळसळू लागले असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. कोणीही हे व्हिडीओ बघताना अनुष्का छान नूत्य करते की आलिया असा भेदभाव न करता भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अनुष्का शर्मा आणि आलियाचा जुगनू डान्स बघितला तर बादशहाचं जुगनू डान्सिंग चॅलेंज स्वीकारण्याची इच्छा कोणालाही होईल हे नक्की!

Web Title: Anushka Sharma and Alia Bhatt accept Jugnu Dance Challenge! See How they complete that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.