Join us

अंकिता लोखंडेची फ्युशिया पिंक साडी! नव्या नवरीचा परफेक्ट गुलाबी लूक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 15:29 IST

Social viral: अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नव्या नवरीच्या परफेक्ट लूकमधले फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत... बघा तिच्या या एथनिक लूकची झलक!!

ठळक मुद्देनव्या नवरीच्या गालावर आलेला ग्लो पाहून नेटकरी तिच्यावर नव्याने फिदा झाले आहेत.. 

लग्न होऊन एक- दिड महिना उलटून गेला तरी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या लग्नाचे आणि लग्नानंतरच्या विविध कार्यक्रमांचे चर्चे अजूनही सोशल मिडियावर सुरूच आहेत.. आता हेच बघा ना... मध्यंतरी ती तिचे खूपच जास्त फोटो साेशल मिडियावर टाकते, म्हणून चांगलीच ट्रोलही झाली होती. पण तरीही ती जेवढे फोटो टाकते, तेवढे सगळे बघितले जातात आणि त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही होतच असतो.. 

 

सध्या अंकिताचे एथनिक लूकमधले काही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. तिच्या एका सासरच्या कार्यक्रमासाठी ती तयार झाली होती.. साडी हा अंकिताचा आवडता पेहराव हे तिने स्वत:च सांगितलेले आहे. त्यामुळे सासरच्या कार्यक्रमासाठी तयार होतानाही तिने झकासपैकी साडी नेसणेच पसंत केले.. फ्युशिया पिंक रंगाची सिल्क साडी (6 yards silk saree of Ankita Lokhande), तिच्यावर गोल्डन रंगाने केलेले काम, सिंपल- सोबर ज्वेलरी, कपाळावरची मोठी टिकली आणि सिंधूर या अशा पारंपरिक वेशभुषेतला अंकिताचा लूक तिच्या चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. नव्या नवरीचा परफेक्ट लूक कसा असावा, असा प्रश्न जर कुणाला पडला असेल, तर त्यासाठीचं उत्तर म्हणजे अंकिताचे हे एथनिक लूकमधले फोटो..

 

या साडीवर अंकिताने दागिनेही अगदी मोजून- मापून घातले आहेत. तिच्या गळ्यात हिऱ्यांचं मंगळसूत्र असून तिने चिंचपेटीप्रमाणे दिसणारे एक चोकरही घातले आहे. गुलाबी रंगाच्या हातभर बांगड्या घातलेली अंकिता खरोखरंच खूप देखणी दिसत आहे. मधोमध भांग पाडून तिने तिचे सिल्की केस मोकळे सोडले आहेत. फोटो सोबतच तिचा एक व्हिडिओही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये नव्या नवरीच्या गालावर आलेला ग्लो पाहून नेटकरी तिच्यावर नव्याने फिदा झाले आहेत.. 

 

तिचे फोटो आणि व्हिडिओ यामध्ये खटकणारी एकच गोष्ट म्हणजे दोन्ही हातात अंकिताने तिच्या साडीवर मॅचिंग होणाऱ्या गुलाबी रंगाच्या हातभर बांगड्या घातल्या आहेत. पण उजव्या हातात तिच्या बांगड्यांसोबत मोठं डायल असणारी घड्याळही दिसते आहे. बांगड्या आणि घड्याळ एकत्रपणे घालण्याचा अंकिताचा हा प्रकार थोडा विचित्र वाटतोय हे नक्की.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअंकिता लोखंडेसेलिब्रिटीफॅशन