Join us

अमिताभ बच्चन यांच्या नातीची भोपाळभर मनसोक्त भ्रमंती, स्ट्रीट फूड खात नव्या नंदाने शेअर केले फोटो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 16:43 IST

Navya Nanda's Viral Post From Bhopal: अमिताभ बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता नंदा हिची लेक असणाऱ्या नव्या नंदाच्या वेगवेगळ्या गोष्टींची नेहमीच सोशल मिडियावर चर्चा होत असते.. आताही तिची अशीच एक पोस्ट गाजते आहे. 

ठळक मुद्देसध्या नव्याच्या आणखी एका प्रवासाची चर्चा होत आहे. यामध्ये नव्या चक्क भोपाळमधील स्ट्रीटफूडचा आस्वाद घेताना दिसत आहे. 

काही स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. सोशल मिडियावर त्यांचे फॅन फॉलोईंगही जबरदस्त असते. असंच नेहमीच चर्चेत असणारं एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा (Amitabh Bachchan's Grand daughter Navya Nanda). नव्या सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. खासकरून तिच्या प्रवासविषयक पोस्ट तर तिच्या चाहत्यांमध्ये बऱ्याच व्हायरल होत असतात. काही महिन्यांपुर्वी तिने तिच्या वडिलांसोबत केलेली विदेशवारीही सोशल मिडियावर अशीच गाजली होती. आता सध्या नव्याच्या आणखी एका प्रवासाची चर्चा होत आहे. यामध्ये नव्या चक्क भोपाळमधील स्ट्रीटफूडचा (Navya Nanda enjoying street food in Bhopal) आस्वाद घेताना दिसत आहे. 

 

याविषयीची पोस्ट नव्याने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 'भोपाल ❤️' असं एवढंच कॅप्शन तिने त्या फोटोंना दिलंय. यामध्ये भोपाळच्या अगदी लहान- लहान चिंचोळ्या गल्ल्यांमधून ती भटकंती करताना दिसते आहे.

पांढरे केस ‘डाय’ करायची भीती वाटते? मग हा नॅचरल डाय एकदा वापरून बघा.. सोपा घरगुती उपाय

दोन- तीन ठिकाणी तर तिचे वेगवेगळे खाद्यपदार्थ खातानाचे फोटोही आहेत. तिचं स्टारडम पुणपणे विसरून एखाद्या सामान्य तरुणीप्रमाणे ती खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बसून वेगवेगळे पदार्थ चाखून पाहते आहे. एवढेच नाही तर त्या गल्लीतल्याच एका सामान्य सलूनमध्ये जाऊन हेअर कट करून घेतल्याचा मिरर सेल्फीही तिने शेअर केला आहे. 

 

या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या प्रत्येक फोटाेमधून दिसून येणारा नव्याचा साधेपणा तिच्या चाहत्यांना भारीच आवडला आहे.

हिवाळ्यासाठी एनर्जी बुस्टर लाडू! प्रोटीन्सचा खजिना, बघा पौष्टिक लाडवांची सोपी रेसिपी

"you look so real and humble", अशा आशयाच्या अनेक कमेंट तिला आल्या असून काही जणांनी तिला भोपाळमध्ये गेल्यावर नेमके कोणकोणते पदार्थ खायला पाहिजेत, भोपाळची स्पेशल डिश कोणती, याविषयीही बरीच माहिती दिली आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्भोपाळनव्या नवेलीअमिताभ बच्चन