Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ... इस्रायलमध्ये चक्क 'बॉम्ब शेल्टर डेटिंग ॲप'लाँच; बंकरमध्ये प्रेम शोधणाऱ्या अजब तंत्रज्ञानाची जगभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 11:26 IST

Israel Iran war latest news Marathi: Israel bomb shelter dating app: 'बंकरमधील डेटिंग' हा विषय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकीकडे युद्धाचे ढग दाटलेले असताना आणि आकाशातून क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असताना, माणूस काय विचार करेल? नक्कीच जीव वाचवण्याचा! पण इस्रायलमध्ये काहीतरी वेगळंच घडतंय. इराणसोबत सुरू असलेल्या भीषण संघर्षात, जिथे सायरन वाजताच लोकांना पळत जाऊन 'बॉम्ब शेल्टर'मध्ये (बंकर) आश्रय घ्यावा लागतो, तिथे आता 'प्रेम' बहरतंय.(Israel Iran war latest news Marathi) इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच एका अशा अनोख्या 'डेटिंग ॲप'ची माहिती दिली आहे, जे चक्क बॉम्ब शेल्टरमध्ये असलेल्या सिंगल्सना एकमेकांशी जोडून ठेवत आहे. (Israel bomb shelter dating app)

Gudhipadwa 2026: गुढीपाडव्याला नेसा पारंपरिक मराठमोळी नऊवारी साडी! रेडी-टू-वेअरचे ५ लेटेस्ट पॅटर्न; मिनिटांत मिळेल राजघराण्यासारखा लूक

मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, हे फक्त इस्त्रायलमध्येच शक्य आहे. ज्यावेळी देश गोंधळात असतो, तेव्हाच नवनिर्मिती जन्माला येते. या अॅपचा मूळ उद्देश हाच आहे की, सायरनच्या आवाजात आणि भीतीखाली वावरताना आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवता येईल. हा प्रयोग जितका चर्चेचा विषय ठरला तितकाच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जगात युद्ध सुरू असताना, महागाईने माणसांचं कंबरडं मोडलेलं असताना, 'बंकरमधील डेटिंग' हा विषय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

इस्रायलला 'स्टार्ट-अप नेशन' म्हटलं जातं, पण युद्धकाळात त्यांनी लॉन्च केलेलं हे अॅप पाहून जग थक्क झालं आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'Hooked' नावाच्या एका स्पीड-डेटिंग ॲपच्या मदतीने ही संकल्पना राबवली आहे. इस्रायलमधील अनेक बॉम्ब शेल्टरच्या दारावर क्यूआर कोड लावण्यात आले. शेल्टरमध्ये शिरल्यानंतर लोक हा कोड स्कॅन करतात. यावरून त्यांना लगेच समजतं की, त्याच बंकरमध्ये सध्या किती लोक 'सिंगल्स' आहेत. सायरनच्या तणावाखाली असताना एकमेकांशी संवाद सुरू करण्यासाठी ही एक संधी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

डेटिंग व्यतिरिक्त 'शावर रिस्क प्रेडिक्टर' नावाचे अजब साधनही चर्चेत आहे. सायरन वाजण्याच्या वेळा आणि पॅटर्नचा अभ्यास करून हे ॲप आपल्याला सांगतं की, सध्या आंघोळीला जाणं सुरक्षित आहे का? ज्यामुळे आपली धावपळ होणार नाही. तसेच बॉम्ब शेल्टर ट्रॅक्टरद्वारे आपण युद्धामुळे किती तासांची झोप गमावली हे देखील समजतं. 

अमेरिकेचे इस्रायलमधील राजदूत माइक हकाबी यांनी यावर म्हटलं की भविष्यात ही जोडपी आपल्या मुलांना सांगतील की आम्ही बॅलिस्टिक मिसाईल्स टाळताना बंकरमध्ये भेटलो होतो.पण, अनेकांना ही कल्पना आवडली नाही. नेटकऱ्यांनी म्हटलं लोक मरत आहे आणि तुम्हाला डेटिंगच पडली आहे? युद्धात होणारी जीवितहानी आणि देश आर्थिक संकटात असताना 'क्रिएटिव्हिटी'च्या नावाखाली मार्केटिंग करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त होत आहे.

भारतसह इतर देशात सध्या लग्नाळू तरुणांची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. एकीकडे लग्नाचे हॉल बंद होत आहेत, सोन्याचे भाव ८० हजारांच्या वर गेले आहेत आणि गॅस सिलेंडरच्या किमतीने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. अशा काळात इस्रायलमधील हे ॲप म्हणजे "दुष्काळात तेरावा महिना" असाच प्रकार वाटतो.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Launches 'Bomb Shelter Dating App' Amidst Conflict: A Unique Concept

Web Summary : Amidst conflict, Israel launches a dating app for singles in bomb shelters. The 'Hooked' app uses QR codes in shelters to connect people, offering a chance for connection during tense times. While some find it innovative, others criticize it as insensitive given the ongoing crisis.
टॅग्स :सोशल व्हायरलइस्रायल