>सोशल वायरल > आमना शरीफचा पिंक साडीतला सिझलिंग इथनिक लूक! हॅण्ड एम्ब्रॉयडरी जेव्हा मॉडर्न होते..

आमना शरीफचा पिंक साडीतला सिझलिंग इथनिक लूक! हॅण्ड एम्ब्रॉयडरी जेव्हा मॉडर्न होते..

नवरात्रीचे दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे या नवरात्रीला जर काही हटके आणि ट्रेण्डी लूक विथ सिझलिंग इथनिक टच असं काही करायचा विचार असेल तर आमना शरीफने नेसलेली ही साडी एकदा बघाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 01:26 PM2021-09-25T13:26:58+5:302021-09-25T13:27:54+5:30

नवरात्रीचे दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे या नवरात्रीला जर काही हटके आणि ट्रेण्डी लूक विथ सिझलिंग इथनिक टच असं काही करायचा विचार असेल तर आमना शरीफने नेसलेली ही साडी एकदा बघाच...

Amana Sharif's sizzling ethnic look in pink saree! Best example of hand embroidery that gives modern look | आमना शरीफचा पिंक साडीतला सिझलिंग इथनिक लूक! हॅण्ड एम्ब्रॉयडरी जेव्हा मॉडर्न होते..

आमना शरीफचा पिंक साडीतला सिझलिंग इथनिक लूक! हॅण्ड एम्ब्रॉयडरी जेव्हा मॉडर्न होते..

Next

आमना शरीफ... डेली सोप्समध्ये दिसणारा एक गोड, निरागस, सुंदर चेहरा. आमनाने नुकतेच काही दिवसांपूर्वी एक बोल्ड फोटो शूट केले होते. त्याची प्रचंड चर्चा सोशल मिडियावर झाली. नेहमी सोबर आणि इथनिक कपड्यांमधे दिसणारी आमना अचानक बोल्ड रूपात अवतरल्याने तिचे चाहतेही चांगलेच अचंबित झाले होते. आता मात्र पुन्हा एकदा आमना तिच्या हटके इथनिक स्टाईलमध्ये परत आली आहे. आमनाने नुकतेच बेबी पिंक किंवा हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसून फोटोशूट केले आहे. तिचा हा इथनिक लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. 

 

आमनाने जी साडी नेसली आहे, ती अशा प्रकारची आहे जी तुम्ही ऑफिसला जातानाही नेसू शकता, एखाद्या पार्टीमध्येही नेसू शकता किंवा आता नवरात्रीमध्ये इथनिक लूक कॅरी करायचा असेल, तर तेव्हाही ती हमखास भाव खाऊन जाऊ शकते. अशी प्रत्येक ठिकाणी हटके लूक देणारी ही साडी जबरदस्त ट्रेण्डी आहे. 

 

आमनाने या साडीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेेअर केले असून त्याला प्रचंड लाईक्स मिळत आहेत. “Yeh saariLai Bhaari,” अशी कॅप्शनही आमनाने या फोटोला दिली आहे. यामध्ये आमनाने तिचा मेकअप अतिशय सोबर ठेवला आहे. त्यामुळे साडीचे सौंदर्य अधिकच खूलून आले आहे. लाँग इअरिंग्स तिने घातले असून गळ्यात काहीही घातले नाही. या साडीवर तिने त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले असून एका हातात घड्याळ घातली आहे. साडीवर ज्या ॲक्सेसरीज तिने घातल्या आहेत, यावरून ती साडी फॉर्मल आणि इनफॉर्मल अशा दोन्ही ठिकाणी जबरदस्त कॅची ठरेल, हे लगेचच दिसून येते. 

 

कशी आहे आमनाची साडी?
आमनाने नेसलेली साडी मलमल ब्रॅण्डची असून ती पुर्णपणे कॉटनची आहे. हलक्या पिंग रंगाच्या साडीवर मोतीया रंगाच्या दोऱ्याने एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. लहान- लहान फुलं आणि पानं यांचं केलेले थ्रेड वर्क लक्षवेधक आहे. साडीच्या काठांना हेरिटेज लेस बॉर्डर आहे. त्यामुळे साडीचा मुळ रंग अधिक खुलला आहे. आमनाने नेसलेली ही साडी तब्बल १४ हजारांची आहे. अशा लाईट कलर शेडची सध्या जबरदस्त फॅशन आहे. त्यामुळे नवरात्रीला एम्ब्राॅयडरीची साडी आणि ट्रेण्डी एक्सेसरीज असा विचार करायला काहीच हरकत नाही. 

 

Web Title: Amana Sharif's sizzling ethnic look in pink saree! Best example of hand embroidery that gives modern look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

How to Take Care of Handbag : कितीही महागडी बॅग घेतली तरी झिप खराब होतात? रोज 'या' ५ चुका टाळा अन् वर्षानुवर्ष बॅग्स टिकवा - Marathi News | How to Properly Take Care of Your Handbag : These mistakes can spoil the zip of expensive handbags | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही महागडी बॅग घेतली तरी झिप खराब होतात? रोज 'या' ५ चूका टाळून वर्षानुवर्ष बॅग्स टिकवा

How to Take Care of Your Handbag : रोजच्या काही चुका आपल्या महागड्या बॅगला लगेच खराब करतात आणि वेळेच्या कमतरतेमुळे, जेव्हा तुम्ही ती पटकन दुरुस्त करत नाही, तेव्हा ही बॅग देखील कायमची खराब होते. ...

स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं? - Marathi News | Smita Gondkar's thrilling bike ride in the Himalayas! What did she do for fitness if she wanted to ride like that? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.  ...

हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला? - Marathi News | What's that, Shilpa Shetty is half bald! What hairstyle is this? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला?

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने चक्क मागच्या बाजूने अर्ध टक्कल केलं आहे. तिचा हा असला विचित्र हेअर कट पाहून चाहत्यांची मात्र झोप उडाली आहे.  ...

DSP monika singh : माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली - Marathi News | DSP monika singh goes viral : MP cm shivraj singh chouhan meet dsp monika singh who doing job for cm security and daughter care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माँ तुझे सलाम! रणरणत्या उन्हात लेकराला पोटाला बांधून ती कर्तव्यावर हजर झाली; व्हायरल होतेय DSP माऊली

DSP monika singh goes viral : कर्तव्यावर हजर राहण्यासाठी त्या आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मोनिका मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजर झाल्या. ...

लो चली मै! डोली- वरात काही नाही, नवरी स्वतःच गाडी चालवत लग्नाला निघाली आणि... - Marathi News | Let's go! in the wedding, the bride drove herself to the wedding spot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लो चली मै! डोली- वरात काही नाही, नवरी स्वतःच गाडी चालवत लग्नाला निघाली आणि...

लग्नासाठी आतूर झालेली नवरी थेट स्वत:च गाडी चालवत निघाली आणि तिचे रिल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले... ...

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म - Marathi News | Woman gives birth to a child at 70 year : Gujarat woman gives birth to a child at 70 years of age latest news | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

Woman gives birth to a child at 70 year : जीवूबेन आणि मालधारी यांचं 45 वर्षांपूर्वी लग्न झालं. दोघांनाही मूल व्हावे अशी खूप इच्छा होती, पण काही समस्यांमुळे त्यांची इच्छा इतक्या वर्षांपर्यंत अपूर्ण राहिली. ...