सोशल मीडियावर रोज काहींना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असे असतात जे थेट मनाला भिडतात आणि हसवतातही.(Alto driver viral video) असाच एक हटके आणि भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ना एखाद्या ट्रकवर लिहिलेल्या शायरीचा आहे, ना मोठ्या गाडीचा.(Funny car message India) हा व्हिडीओ आहे एका सध्या अल्टो कार चालकाचा, ज्याने आपल्या गाडीवर लिहिलेल्या एका वाक्यामुळे लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (EMI car viral video)
भारतीय रस्त्यांवरील वाहनांच्या मागे लिहिलेल्या काही गोष्टी कायमच आपलं लक्ष वेधून घेतात. कधीकधी ट्रकवर 'बुरी नजर वाले तेरा मुह काला' लिहिलेले असते, तर कधीकधी ऑटो-रिक्षावर मजेशीर काहीतरी. कर्नाटकातील मंगळुरु येथील एका कार मालकाच्या अल्टोच्या मागे असे काहीतरी लिहिले आहे. जे अनेकांना हसवते देखील आणि सहानुभूती देखील दर्शवते. या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की तो ५६ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
अपघात टाळण्यासाठी अनेकादा वाहनांवर keep distance असं लिहिलेलं असतं. परंतु या वाहन चालकांने गाडीच्या मागे लिहिलं. अंतर ठेवा, EMI अजून बाकी आहे. याचा अर्थ असा की गाडीपासून लांब राहा, धडकू नका. कारण बँकेचे हफ्ते अजून संपलेले नाहीत. गाडीला काही झाले तर दुरुस्तीचा खर्च आणि हफ्ते दोन्हीही महागात पडेल.
हा व्हिडिओ @bearys_in_dubai या इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केला. कर्नाटकातील मंगळुरु या सर्किट हाऊस रोडवर ट्रॅफिकमधून पांढरी अल्टो जाताना या व्हिडीओमध्ये दिसते आहे. कॅमेरा झूम इन करताच, हे मजेशीर वाक्य पाहायला मिळते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला.
या व्हिडीओला ३ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत तर हजारो लोकांनी कमेंट्स देखील केले. सेक्शनमध्ये मजेशीर कमेंट्स शेअर केल्या आहेत. एकाने म्हटलं की हे मजेशीर आणि वाईट सुद्धा.. तर एकाने लिहिलं की भारत नवशिक्यांसाठी नाही. अनेकांनी या व्हिडीओला मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
