Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > ऋजुता दिवेकरच्या घरी पिठलं भाकरी खाऊन खुश झाल्या आलिया भट- करिना कपूर, पिठलं खाऊन आलिया तर म्हणाली...

ऋजुता दिवेकरच्या घरी पिठलं भाकरी खाऊन खुश झाल्या आलिया भट- करिना कपूर, पिठलं खाऊन आलिया तर म्हणाली...

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर यांच्या घरचं पिठलं- भाकरी खाऊन करिना कपूर आणि आलिया भट एकदम खुशच होऊन गेल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 16:02 IST2026-02-13T16:01:25+5:302026-02-13T16:02:28+5:30

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर यांच्या घरचं पिठलं- भाकरी खाऊन करिना कपूर आणि आलिया भट एकदम खुशच होऊन गेल्या...

Alia Bhatt and kareena kapoor were happy after eating pithala and bhakari at Rujuta Diwekar's house | ऋजुता दिवेकरच्या घरी पिठलं भाकरी खाऊन खुश झाल्या आलिया भट- करिना कपूर, पिठलं खाऊन आलिया तर म्हणाली...

ऋजुता दिवेकरच्या घरी पिठलं भाकरी खाऊन खुश झाल्या आलिया भट- करिना कपूर, पिठलं खाऊन आलिया तर म्हणाली...

Highlights हा मेन्यू आलिया भटला एवढा आवडला की तिने त्या ताटाचाच फोटो इंस्टाग्राम स्टाेरी म्हणून शेअर केला...

करिना कपूर आणि आलिया भट ही नणंद- भावजयीची जोडी बऱ्याचदा एकत्र दिसते. किंवा कोणत्या कार्यक्रमाला त्या असतील तर एकमेकींशी भरपूर गप्पा मारताना दिसतात. आता ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र आली होती आणि त्याला निमित्त होतं ऋजुता दिवेकर यांच्या घरची पिठलं आणि भाकरी. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा आहारविषयक सल्ला घेण्यासाठी बॉलीवूड कलाकार नेहमीच येत असतात. करिना कपूर ही देखील त्यापैकीच एक. करिना कपूरने तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झिरो फिगर मिळवली होती असं म्हणतात. आता नणंदबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून आलियाही ऋजुता यांच्याकडे दिसली...

 

याविषयीची एक सुंदर पोस्ट ऋजुता आणि आलिया या दोघींनीही इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये आलिया भटने ऋजुता दिवेकर यांच्या घरच्या ताटाचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये पिठलं भाकरी हे दोन अस्सल मराठी पदार्थ दिसत आहेत.

घरच्याघरी फक्त १० रुपयांत चमकेल त्वचा! नेहमीची कॉफी 'या' पद्धतीने लावा- टॅनिंग, डेडस्किन गायब 

त्याशिवाय कोशिंबीर, एक पालेभाजी, वाटीमध्ये आमटी आणि चटणी असे पदार्थही ताटात वाढलेले आहेत. हा मेन्यू आलिया भटला एवढा आवडला की तिने त्या ताटाचाच फोटो इंस्टाग्राम स्टाेरी म्हणून शेअर केला असून त्याला ''the most wholesome and soul-some lunch" असं कॅप्शन दिलं आहे.

 

ऋजुताने देखील तिचा आलिया आणि करिना यांच्यासोबतच फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली आहे आलिया भट. तिचा पांढरा पंजाबी ड्रेस, गळ्यात अडकवलेली ओढणी आणि कानात बारीक कानातले अशा थाटातली आलिया अगदी सोज्वळ दिसते आहे.

नव्या नवरीसाठी सुंदर स्टायलिश ८ जोडवी, कमी वजन पण दिसतात ठसठशीत, पाहा डिझाईन्स..

आपण आपल्या घरात नेहमीच होते म्हणून पिठलं भाकरी खायला कधीकधी नाक मुरडतो. पण या दोघींनी मात्र अगदी चवीने पिठलं भाकरी खाल्ली आहे. पिठल्यातून मिळणारं प्रोटीन आणि भाकरीतून मिळणारे फायबर तब्येतीसाठी नक्कीच खूप फायदेशीर आहेत. 

 

Web Title : आलिया भट्ट और करीना कपूर ने रुजुता दिवेकर के घर में पिठला भाकरी का आनंद लिया।

Web Summary : आलिया भट्ट और करीना कपूर ने सेलिब्रिटी पोषण विशेषज्ञ रुजुता दिवेकर के घर पर पिठला भाकरी का पारंपरिक मराठी भोजन किया। आलिया ने इंस्टाग्राम पर भोजन की एक तस्वीर साझा की, और इसे एक पौष्टिक और आत्मा को संतुष्ट करने वाला दोपहर का भोजन बताया। दोनों अभिनेत्रियाँ दिवेकर की आहार सलाह लेने के लिए जानी जाती हैं।

Web Title : Alia Bhatt and Kareena Kapoor Enjoyed Pithla Bhakri at Rujuta Diwekar's Home.

Web Summary : Alia Bhatt and Kareena Kapoor relished a traditional Marathi meal of Pithla Bhakri at celebrity nutritionist Rujuta Diwekar's home. Alia shared a photo of the meal on Instagram, praising it as a wholesome and soul-satisfying lunch. Both actresses are known to seek Diwekar's dietary advice.