Join us

ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या बाहुलीची व्हायरल चर्चा, कुणाला आवडली तर कुणी म्हणे किती ते गचाळ काम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2024 13:21 IST

Aishwarya Rai turned into a doll: Artist immortalises her Anant Ambani wedding look : ऐश्वर्या रायसारखी दिसणारी बाहुली सोशल मीडियात ट्रोल का होतेय?

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन अनेक कारणांमुळे चर्चेत असते (Aishwarya Rai Bachchan). ती बऱ्याचदा विविध कार्यक्रमांमध्ये दिसते. तिचा लूक हा कायम चर्चेत असतो (Viral Doll). सध्या तिच्या एका लूकनुसार एका चाहत्याने बाहुली साकारली आहे त्याचीच व्हायरल चर्चा गाजते आहे. ऐश्वर्या रायचा अंबानी वेडिंग लूक व्हायरल झाला होता (Ambani Wedding Look). या लूकवर एका श्रीलंकन चाहत्याने ऐश्वर्याची हूबेहूब बाहुली तयार केली. ती बाहुली कुणाला आवडली तर कुणी म्हणाले ही ऐश्वर्या की राधे मा?

श्रीलंकन आर्टिस्ट निगेशन याने काही आठवड्यांपूर्वी, ऐश्वर्या रायच्या अंबानी वेडिंग लूकने प्रेरित होऊन एक बाहुली तयार केली(Aishwarya Rai turned into a doll: Artist immortalises her Anant Ambani wedding look).

दाणेदार रवाळ तूप तयार करताना घरभर वास पसरतो? लक्षात ठेवा १ ट्रिक; तूप होईल झटपट आणि..

अनंत अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या रायने जशी वेशभुषा केली होती तशीच ही बाहुली दिसते. तिनेलाल रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. गळ्यात सुंदर हार होता. आणि मांगटिकाही होता. या लूकमध्ये ऐश्वर्या अप्सरा दिसत होती. सेम तशीच बाहुली या आर्टिस्टने तयार केली.

वजन कमी करण्याचे सगळेच फंडे फेल? 'या' चहामध्ये तूप घालून प्या; थुलथुलीत पोट होईल सपाट आणि..

पण झालं ट्रोलिंगही कारण..

फोटो आणि व्हिडिओ शेअर करत निगेशने कॅप्शनमध्ये लिहलं की, 'ऐश्वर्या रायच्या अंबानी वेडिंग लुकचे डॉल व्हर्जन तयार केले आहे.'त्यावर एकाने लिहिले की 'हा ऐश्वर्या रायचा मोठा अपमान आहे.', तर दुसऱ्याने 'हे मंजुलिकाचे अपग्रेडेड व्हर्जन दिसत आहे.' तर आणखी एका ट्रोलरने  'क्षणभर मला वाटले की ती राधे माँ आहे.' असं म्हणत बाहुलीची खिल्ली उडवली.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसोशल व्हायरल