लग्नसराई सुरु झाली की आपण सगळ्यात आधी खरेदीला लागतो. त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे लग्नाच्या जेवणाचा. आपल्यासमोर पंचपक्वान, भात, पनीरची भाजी, गरमागरम जिलेबी, गुलाबजाम किंवा थंडगार आईस्क्रीम असेल तर हे सगळं पाहून तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. पण लग्नाच्या पंगतीत आनंदाने जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अनेकांची अवस्था बिकट होते. काल खूप जास्त खाल्ल, पोट जड झालंय, एसिडीटी झालीये. अशा तक्रारी आपल्याला घराघरात ऐकायला मिळतात.
बरेचदा लग्नाच्या पंगतीत आपण सुरुवातीलाच इतकं ताव मारतो की, शेवटचे भारी पदार्थ खायला जागाच उरत नाही. मग घरी आल्यावर पश्चात्ताप होतो की, अरे यार! रसमलाई तर राहिलीच! लग्नाच्या पंगतीत मनसोक्त खाण्याची इच्छा असते खरी पण पोटाच्या भीतीने अनेकजण आपल्या आवडत्या पदार्थांना मुकतात. पण यावर उपाय म्हणून बंगळुरूच्या एका इंजिनिअरने यावर असा उपाय शोधला. बेंगळुरूच्या पंकज नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने एक असं 'भन्नाट' टूल बनवलंय. पंकजने चक्क 'BuffetGPT' नावाचं एक AI टूल तयार केलं आहे. जो आपल्याला लग्नाच्या जेवणाचा 'गेम प्लॅन' आखून देतं.
पंकजच्या मते, भारतीय लग्नातली जेवण हे एका 'स्कॅम'सारखं असतं. आपण आवडीचे पदार्थ सोडून भलतंच काहीतरी खातो आणि पोट भरते. यावर उपाय म्हणून त्याने 'कंप्युटर व्हिजन' तंत्रज्ञानाचा वापर करून हे AI टूल बनवलं. हे टूल आपल्याला मोबाईलने आधी स्कॅन करायला सांगते. त्यानंतर AI प्रत्येक पदार्थ ओळखतो. त्यानंतर हे टूल आपल्या पोटाविषयी जाणून घेतं. त्यानंतर AI आपल्याला काय खायचं, काय टाळायचं आणि किती प्रमाणात खायचं हे सांगते ज्यामुळे आपण जास्तीत जास्त पदार्थांची चव घेऊ शकतो, ज्यामुळे पोट जडही होणार नाही.
त्याने नुकतेच त्याच्या एका मित्राच्या लग्नात या टूलचे Alpha Version टेस्ट केले. त्याने सांगितलं की, रिझल्ट्स खूपच समाधानकारक आहे. सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट टाकत त्याने लिहिलं की, खरं सांगायचं तर, माझी कम्प्युटर सायन्सची डिग्री आज खऱ्या अर्थाने कामाला आली आहे!
हा जुगाड सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. काही युजर्सने म्हटलं आता ताटात काय वाढायचं हे आई-वडील नाही तर AI आपल्याला सांगणार. हे टूल कधी लाँच होतंय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.
indian wedding buffet is a scam. i always leave regretting something. so i built BuffetGPT 😠
— Pankaj (@the2ndfloorguy) February 6, 2026
an ai agent that scans entire buffet and gives you a game plan.
it uses computer vision to detect every dish, then optimizes what to eat, what to skip, and how much based on actual… pic.twitter.com/yLxEf17LSJ
