आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानामुळे आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या आहेत. AI च्या मदतीने आजकाल अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य होतात, अवघडातील अवघड काम देखील मिनिटभरात पूर्ण करता येणं सहज शक्य होते. तंत्रज्ञानाच्या युगात 'सत्य' आणि 'भास' यातील अंतर कमी होत चाललं आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) काय करू शकत नाही? ऑफिसची कामं असोत किंवा अवघड कोडिंग, AI ने सगळं सोपं केलंय. परंतु या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आजकाल मजेशीर आणि आश्चर्यकारक अशा दोन्ही प्रकारे केला जात आहे. फोटो एडिटिंग, व्हिडिओ तयार करणे, आवाज बदलणे अशा अनेक गोष्टी AI च्या मदतीने सहज करता येतात. मात्र या तंत्रज्ञानाचा चुकीचा किंवा अतिशयोक्ती करण्यासाठी वापर केला तर काहीवेळा गैरसमज आणि वादाचे कारणही ठरू शकते हे सांगताही येत नाही...(lucknow woman pranks mother AI generated boyfriend viral video).
सोशल मीडियावर सध्या एका आई-मुलीच्या वादाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. चक्क AI वापरुन एका तरुण मुलीने आपल्या आईसोबत प्रँक केला, जो आता तिच्या अंगाशी आला आहे. निमित्त (AI boyfriend photo viral video) ठरलं ते म्हणजे 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' (AI)... स्वतःच्या लग्नाबाबत आईची मस्करी करण्यासाठी एका मुलीने AI चा वापर करून एक खोटा फोटो तयार केला आणि तो आपला पती असल्याचे आईला सांगितले. हा बनावट फोटो (funny AI viral video) पाहताच आईचा संयम सुटला आणि तिने मुलीची चांगलीच शाळा घेतली. या मजेशीर तरीही विचार करायला लावणाऱ्या घटनेने आता इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
नेमकं प्रकरणं आहे तरी काय...
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या वापरामुळे आता घरबसल्या कोणीही आपले हुबेहूब दिसणारे फोटो तयार करू शकतं. मात्र, याच तंत्रज्ञानाचा वापर करून एका मुलीने आपल्या आईला आश्चर्याचा धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न तिला चांगलाच महागात पडला. एका AI जनरेटेड फोटोमुळे आई आणि मुलीमध्ये जे काही भांडणं रंगलं, ते पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगी तिच्या आईसोबत बसलेली दिसते. ही मुलगी एका AI ॲपचा वापर करून स्वतःचा आणि एका अनोळखी मुलाचा फोटो तयार करते. हा फोटो पाहताना असे वाटते की, त्या दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा ते कपल आहेत. ही मुलगी तो फोटो आपल्या आईला दाखवते आणि सांगते की, "हा माझा नवरा आहे आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे."
खरंच की काय? करण जोहर सांगतो ‘ऑझेम्पिक’ नव्हे, भात-बटाटे खाऊनच ‘असं’ केलं वजन कमी...
हे पाहून आईचा पारा चढला! आपल्या मुलीने आपल्याला न सांगता होणाऱ्या जावयाची निवड केली आहे, हे ऐकून आईला मोठा धक्का बसतो. सुरुवातीला आईला हे खरं वाटतं. फोटो इतका हुबेहूब होता की आईचा त्यावर विश्वास बसतो आणि ती प्रचंड चिडते. व्हिडिओमध्ये आई मुलीला ओरडताना आणि तिच्यावर रागावताना स्पष्टपणे दिसत आहे. मुलगी मस्करी करत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करते, पण आईचा राग शांत होण्याचे नावच घेत नाही. मुलगी आईची खोटी - खोटी समजून काढताना म्हणते की, त्या मुलाला सरकारी नोकरी आहे, त्याचे श्रीमंत घराणे आहे... परंतु आईचा राग कमी होई ना आई म्हणते, जर ही गोष्ट बाबांना समजली तर काय होईल किंवा लोक काय म्हणतील तो फोटो आधी डिलीट कर...
हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. काहींनी म्हटले आहे की, "मस्करी करताना आईच्या रागाचा विचार करायला हवा होता," तर काहींनी "AI तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे," यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
अस्सल खान्देशी उडीद वडे, चव झणझणीत अशी की खाताच म्हणाल वाढा आणखी! पारंपरिक चवीचा बेत...
तंत्रज्ञानाचा वापर मनोरंजनासाठी करणे चांगले असले तरी, घरच्यांसोबत अशा प्रकारची मस्करी काहीवेळा अंगाशी येऊ शकते, हेच या व्हिडिओतून दिसते. सध्या हा 'AI जनरेटेड जावई' आणि 'सासूबाईंचा राग' इंटरनेटवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Web Summary : A daughter's AI-generated 'groom' prank on her mother backfired spectacularly. The realistic photo enraged the mother, leading to a viral family argument about the AI husband.
Web Summary : बेटी का एआई-जनित 'दूल्हा' प्रैंक उसकी माँ पर बुरी तरह से उल्टा पड़ा। असली दिखने वाली तस्वीर से माँ गुस्से में आ गई, जिससे एआई पति को लेकर वायरल पारिवारिक बहस हुई।