Lokmat Sakhi >Social Viral > पायाला फ्रॅक्चर, वजन कमी-पिटुकल्या उंदराएवढा होता! अहान पांडेच्या आईनं सांगितली, त्याच्या प्री मॅच्युअर जन्माची कथा...

पायाला फ्रॅक्चर, वजन कमी-पिटुकल्या उंदराएवढा होता! अहान पांडेच्या आईनं सांगितली, त्याच्या प्री मॅच्युअर जन्माची कथा...

Ahaan Panday premature birth : Ahaan Panday was ‘as small as a rat’ as he was born 42 days early, was transported to hospital in a thermocol box: ‘He had a hairline fracture on his leg’ : Saiyaara actor Ahaan Panday had complicated birth : 'सैयारा' फेम अहान पांडेच्या आईने सांगितली त्याच्या जन्माच्या कहाणी! उंदरा इतका लहान आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2025 14:34 IST2025-08-09T13:46:08+5:302025-08-09T14:34:58+5:30

Ahaan Panday premature birth : Ahaan Panday was ‘as small as a rat’ as he was born 42 days early, was transported to hospital in a thermocol box: ‘He had a hairline fracture on his leg’ : Saiyaara actor Ahaan Panday had complicated birth : 'सैयारा' फेम अहान पांडेच्या आईने सांगितली त्याच्या जन्माच्या कहाणी! उंदरा इतका लहान आणि...

Ahaan Panday premature birth Ahaan Panday was ‘as small as a rat’ as he was born 42 days early, was transported to hospital in a thermocol box: ‘He had a hairline fracture on his leg’ Saiyaara actor Ahaan Panday had complicated birth | पायाला फ्रॅक्चर, वजन कमी-पिटुकल्या उंदराएवढा होता! अहान पांडेच्या आईनं सांगितली, त्याच्या प्री मॅच्युअर जन्माची कथा...

पायाला फ्रॅक्चर, वजन कमी-पिटुकल्या उंदराएवढा होता! अहान पांडेच्या आईनं सांगितली, त्याच्या प्री मॅच्युअर जन्माची कथा...

मोहित सुरीच्या 'सैयारा' चित्रपटाने सध्या देशभर धुमाकूळ घातला आहे. तरुण पिढी या चित्रपटाच्या फारच प्रेमात आहे. सुपरहिट लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट आजच्या काळातील प्रेमी यूगुलांना प्रचंड आवडला. या बॉक्स ऑफिस हिट सिनेमाने सगळ्यांना वेड लावलेले असतानाच, या चित्रपटांतील प्रमुख पात्राची भूमिका करणाऱ्या 'अहान पांडे' ला देखील तितकीच प्रसिद्धी मिळाली आहे(Ahaan Panday was ‘as small as a rat’ as he was born 42 days early, was transported to hospital in a thermocol box: ‘He had a hairline fracture on his leg’).

अहान पांडेने 'सैयारा' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये अगदी हटके आणि धडाकेबाज एंट्री केली आहे. २७ वर्षीय अहान पांडे हा चिक्की पांडे आणि डीन पांडे यांचा मुलगा. अहान पांडे (Ahaan Panday) काही वर्षांपूर्वीपर्यंत सोशल मिडियावर खूप ॲक्टिव्ह होता आणि त्याची बहीण अलाना पांडेच्या चॅनेलवरील अनेक ब्लॉगमध्ये देखील तो नेहमी असायचा. अलाना हिच्या एका ब्लॉगमध्ये, अहानची आई डीन हिने अहानच्या जन्माच्या वेळचा अतिशय भावुक असा खास प्रसंग शेअर केला(Saiyaara actor Ahaan Panday had complicated birth).

अहानची आई डीन पांडे सांगते की, अहानचा जन्म हा त्याच्या जन्माच्या तारखेच्या ४२ दिवस आधी झाला होता. त्यानंतर त्याला थर्मोकोल कूलरमध्ये ठेवून  मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले जेणेकरून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवता येईल. पुढे डीन यांनी सांगितले की, मला आठवतंय, त्यावेळी मला तातडीने सी-सेक्शनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. "माझ्या प्रसूतीच्या तारखेच्या सुमारे ४२ दिवस आधी, माझ्या गर्भाशयाच्या पिशवीतून पाण्याची थोडीशी गळती सुरू झाली. त्यावेळी आम्ही दादीला उठवलं आणि तिने डॉक्टरांना फोन केला, त्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, 'तिला आत्ताच रुग्णालयात घेऊन जा', हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना समजलं की, माझ्या गर्भाशयाच्या पिशवीतून सर्व द्रव गळत आहे आणि बाळाला ताबडतोब गर्भाशयातून बाहेर काढावं लागलं. 

पावसाळ्यात फ्रिजमध्ये मीठ ठेवा, ही व्हायरल ट्रिक खरी आहे? खरंच फ्रिजमधला कुबट वास कमी होतो...

"त्यांनी सोनोग्राफी केली, तोपर्यंत सर्व पाणी बाहेर आले होते आणि अहान एका कोपऱ्यात गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला होता. त्यांनी मला इमर्जन्सी सिझेरियन करण्यासाठी नेले आणि जेव्हा त्यांनी अहानला बाहेर काढले तेव्हा तो उंदरा इतक्याच लहान आकाराचा होता. त्यांनी त्याला बाहेर काढले आणि मी बेशुद्ध पडलो. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा मी विचारले, 'माझे मूल कुठे आहे?' आणि त्यांनी मला सांगितले की त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एनआयसीयूमध्ये नेण्यात आले आहे. मला नुकतेच टाके पडले असताना देखील मी त्यांना तिथे घेऊन जाण्यास सांगितले. 

आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

पिंपल्स येऊ नयेत म्हणून तमन्ना भाटिया चेहऱ्याला रोज लावते एक विचित्र गोष्ट, पण डॉक्टर म्हणतात..

डीन ही गोष्ट सांगत असताना अलाना मध्येच म्हणाली, “आई एक महत्वाची गोष्ट सांगायला विसरली"... "अहानला कूलरमध्ये नेण्यात आले होते, आणि ते ही  चक्क थर्माकोलच्या बॉक्समध्ये! ही गोष्ट तब्बल २५ वर्षांपूर्वीची आहे पण अगदी फिल्मी कहाणीच होती ती"... डीनने सांगितले की ज्या रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला, तेथे एनआयसीयू नव्हते. त्यामुळे तिच्या आई आणि सासूबाईंनी अहानला तातडीने नानावटी रुग्णालयात नेले. त्या वेळी डीनला बरीच औषधे दिली जात होती आणि बाळंतपणानंतर ती बेशुद्ध पडली होती. पण शुद्धीवर आल्यावर तिने सगळ्यात आधी “माझं बाळ मला दाखवा” अशी इच्छा व्यक्त केली. 

तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि अखेर जेव्हा तिने अहानला पाहिलं, तेव्हा त्याच्या पायाला आधार देण्यासाठी काठी चिकटवलेली दिसली. कारण, त्याच्या पायाला हेअर लाईन फ्रॅक्चर झाले होते. डीन म्हणाली, “तो इतका छोटा होता की, तो उंदराइतकाच लहान दिसत होता, आणि त्याच्या मांड्या फारच बारीक होत्या.”


 

मी दुरूनच अहानला पाहत होती, तेव्हा त्याला नर्स ड्रॉपरने दूध पाजताना दिसली, तेव्हा मी तिला थांबण्यास सांगितले. पुढील दहा दिवस, डीन रुग्णालयातच उपचार घेत होती आणि अहान एनआयसीयूमध्येच होता. जेव्हा कधी त्याला जेवण द्यावे लागत असे तेव्हा डीन व्हीलचेअरवरून एनआयसीयूमध्ये येत असे. या सर्वांनंतर तो अखेर त्याच्या पालकांसोबत सुखरूप घरी आला. 

आपल्या लेकराला होणारा त्रास आणि त्या त्रासाची नुसती कल्पना जरी केली तरी जगातील कोणत्याही आईचे हृदय पिळवटून निघेलच. लहानग्या अहानच्या श्वासांची ऊब आणि त्याचा नाजूक स्पर्श, डीनसाठी संपूर्ण जग जिंकण्यासारखाच होता. अशी ही अहान आणि डीन या मायलेकरांची कहाणी समोरच्याला भावूक करणारी व डोळ्यांतून अश्रू आणणारी आहे.

Web Title: Ahaan Panday premature birth Ahaan Panday was ‘as small as a rat’ as he was born 42 days early, was transported to hospital in a thermocol box: ‘He had a hairline fracture on his leg’ Saiyaara actor Ahaan Panday had complicated birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.