Join us  

वय 41, दिसते 25 वर्षांची! लोकांना तिचं खरं वय कळलं आणि धक्काच बसला, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 3:49 PM

आधी तिचं वय किती याबाबत उत्सुकता होती. तिनं आता स्वत:चं वय सांगितलं तर लोकांना विश्वास बसत नाहीये.. असं तिच्या बाबतीत का व्हावं?

ठळक मुद्देसोशल मीडियामध्ये सध्या एम्बर लॅंकेस्टरची चर्चा सुरु आहे ती तिच्या वयावरुनच.एम्बरनं एका क्लिपमध्ये आपला जन्म 1980 सालचा असून आता आपण 40 पार केली आहे असं सांगितलं आहे. तू पंचविशीचीच वाटते असं म्हणत अनेकांनी एम्बरच्या वयावर विश्वास बसत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

कोणी स्वत:हून वय सांगितलं नाही तरी एकूण दिसणं, वावरणं, आरोग्य यावरुन वयाचा अंदाज लावणं शक्य असतं. पण एखाद्यानं वय सांगूनही त्यावर विश्वास ठेवणं अशक्य झालं तर? सोशल मीडियामध्ये सध्या एम्बर लॅंकेस्टरची चर्चा सुरु आहे ती तिच्या वयावरुनच. एम्बर लॅंकेस्टर कॅलिफोर्नियाची असली तरी इन्स्टाग्रामवर तिचे जवळ जवळ चार लाख फाॅलोअर्स आहेत त्यामुळे  एम्बरचे जगभरात फाॅलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती ब्यूटी, फॅशन आणि लाइफ स्टाइल संदर्भातील  कंटेंट शेअर करत असते. ती ब्यूटी, फॅशनच्या संदर्भात काय मजकूर टाकते याची फाॅलोअर्स वाटच पाहात असतात.

Image: Google

एम्बरनं आपल्या एका पोस्टमधून आपलं खरं वय किती हे सांगितलं आणि लोकांना धक्काच बसला. कोणालाच एम्बरनं सांगितलेलं वय पटत नाहीये. फोटोवरुन एम्बर ही फारच तरुण वाटते. उलट तुझं वय तरी किती असा प्रश्न तिच्या फाॅलोअर्सना पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर एम्बरनं दिल्यावर मात्र लोकांना तिच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाहीये. 

एम्बरनं एका क्लिपमध्ये आपला जन्म 1980 सालचा असून आता आपण 40 पार केली आहे असं सांगितलं.  तिची ही क्लिप ऐकून अनेकांचा भ्रमनिरास झाला तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.  पंचविशीची वाटणारी एम्बर प्रत्यक्षात 42 वर्षांची आहे हे वास्तव समजल्यावर ती प्रत्यक्षात मोठी असताना छोटी कशी दिसते? असा प्रश्न अनेकांना पडला. तर अनेकांनी प्रत्यक्षात चाळीशी पार एम्बरच्या तरूण तेजस्वी त्वचेचं, फिटनेसचं कौतुक करुन तुला हे कसं जमतं असा कुतुहलमिश्रीत प्रश्न विचारला आहे. तू करत असलेले उपाय आम्हालाही सांग अशी विनंती अनेकांनी केली आहे. 

Image: Google

एम्बरनं यावर उत्तर देण्यासाठी एक टिकटाॅक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओद्वारे तिने आपण वापरत असलेल्या ब्यूटी प्रोडक्टची माहिती दिली आहे. वाढतं वय त्वचेवर दिसू नये यासाठी एम्बर अनेक ब्यूटी प्रोडक्टस वापरत असून तिचा मुख्य भर हा ॲण्टि एजिंग क्रीम आणि माॅश्चरायझर वापरण्यावर असतो. ती म्हणते मी वापरत असलेल्या प्रोडक्टसाठी प्रिस्क्रिप्शनची गरज आहे. हे प्रोडक्टस आपण  15 वर्षांपासून वापरत असून त्याचा फायदा आपल्याला चेहऱ्यावर  दिसतो असं एम्बर सांगते.

Image: Google

एम्बरच्या उत्तरानं कोणाचं समाधान होवो अथवा न होवो पण चाळीशी पार वय असूनही पंचविशीतल्या तरुणीसारखं दिसता येतं हा विश्वास एम्बरनं स्वत:च्या उदाहरणातून निर्माण केला आहे हे खरं!

 

टॅग्स :सोशल व्हायरलकॅलिफोर्नियामहिलात्वचेची काळजी