पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात युद्ध झाले. या हल्ल्याच्या बदला घेत भारताने पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला. त्या संपूर्ण ऑपरेशनला सिंदूर असं म्हटलं गेलं.(Moti Pak renamed to Moti Shree) यानंतर भारत- पाकिस्तान बॉर्डरसह अनेक राज्यात तणाव निर्माण झाला.(Moti Shree sweet shop viral news) भारतातील अनेक राज्यात पाकिस्तानाकडून हमले करण्यात आले. इतकेच नाही तर भारताने देखील त्याचे प्रतिउत्तर चोख प्रमाणात दिलं.(Operation Sindoor sweet shop news)
अशातच भारतातील काही भागात 'पाक' या शब्दांवरुन वाद मोठ्या वाढलेला पाहायला मिळाला.(Traditional Indian sweets renamed) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेमच नाही. अशीच एक बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Name change in respect of Indian values) जयपूरसह काही शहरांमध्ये 'पाक' या शब्दांवर बंदी घालण्यात आली.
पावसाळ्यात साखर-मीठाला पाणी सुटतं? धान्य खराब होतं, पाहा ४ सोपे उपाय-यंदा दरवर्षीचा त्रास विसरा
जयपूरमधील काही नावाजलेल्या मिठाईच्या दुकानातील मिठाईची नावे बदलण्यात आली आहे. 'मोती पाक' या मिठाईचे नाव आता 'मोती श्री' करण्यात आले. आम पाक, गोंद पाक, मैसूर पाक यांसारख्या काही मिठाईंची नावे बदलण्यात आली. आता ती आम श्री, गोंद श्री , मैसूर श्री नावाने ओळखले जाईल. देशभरात प्रसिद्ध असणारी ही मिठाई आता नव्या नावाने ओळखली जाईल असं म्हटलं जात आहे. मिठाई तयार करणाऱ्या प्रतिष्ठित ब्रँडने हा निर्णय शुद्धता आणि सांस्कृतिक मूल्यांचा विचार करुन घेतला आहे.
ब्रँडचे संस्थापक असे सांगतात की, 'पाक' या शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. यासाठी आमच्या उत्पादनाचे नावही त्याच्या चवीइतकेच शुद्ध आणि भारतीय असायला हवे. म्हणून आम्ही त्याचे नाव 'मोती श्री' ठेवण्याचा निर्णय घेतला.
दिवसाची सुरुवात कशाने करावी? चहा की लिंबू पाणी - काय तब्येतीला जास्त बरे
नाव बदलले असले तरी मिठाईची चव, रेसिपी आणि त्याच्या दर्जामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच ग्राहकांनी या बदलाचे देखील मोठ्या मनाने स्वागत केले. 'पाक' हा शब्द खरेतर संस्कृत आहे. चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक जेवण बनवण्याची कला. भारतात प्रत्येक प्रांतामध्ये विविध पद्धतीचे पाककलेचे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात.
मिठाईचे नाव बदल्यानंतर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालण्यात आला आहे. अनेक युजर्सने यावर कमेंट देखील केली. एका युजर्सने म्हटलं की, पाक हा शब्द संस्कृत आहे. याचा अर्थ शिजवणे, पाकिस्तान नाही. पाककला शाळेत हा शब्द नेहमी संस्कृत म्हणून सांगितला जायचा. तर दुसऱ्या युजर्सने सांगितले की, संस्कृतमध्ये पक्वाशय (duodenum). शब्दांचे अर्थ हे वेळ, स्थान आणि भाषेनुसार बदलतात. अशा एकापेक्षा अनेक भन्नाट कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.