Join us

सायली संजीवची मायेची गोधडी... बघा आजी- आईच्या जुन्या साड्यांपासून कशी शिवली आठवणींची गोधडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2022 18:17 IST

Viral Video of Actress Sayali Sanjeev: आजच्या ऑनलाईन शॉपिंगच्या हायफाय जमान्यात मायेच्या गोधडीचा अनेक जणांना विसर पडला आहे. पण अभिनेत्री सायली संजीव मात्र ही मायेची उब विसरलेली नाही. 

ठळक मुद्देसायलीने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘चिंध्या चिंध्या जमवीत, आई आयुष्य वेचते...खरखरीत हाताने, मऊ मऊ गोधडी शिवते' अशी सुंदर कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली आहे.

काही वर्षांपुर्वी घरोघरी गोधडी दिसायची. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी एक गोधडी (godhadi) तर असायचीच. शिवाय पाहुण्यांसाठीही एक- दोन गोधड्या बाजूला काढून ठेवलेल्या असायच्या. हिवाळा आला की या सगळ्या गोधड्या आपोआप बाहेर निघायच्या. आता मात्र अनेक घरांमधून गोधड्या बाहेर हद्दपार झाल्या असून त्यांची जागा मऊशार दोड किंवा रग यांनी घेतली आहे. पण आई- आजीच्या पातळांपासून, साड्यांपासून तयार झालेल्या मायेच्या गोधडीमध्ये जी उब आहे, ती या रेडिमेड रग, दुलईमध्ये नाहीच. म्हणूनच तर अशीच मायेची उब देणारी गोधडी हातात आल्यामुळे अभिनेत्री सायली संजीव (Actress Sayali Sanjeev) अतिशय आनंदी झाली आहे. 

 

सायलीने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘चिंध्या चिंध्या जमवीत, आई आयुष्य वेचते...खरखरीत हाताने, मऊ मऊ गोधडी शिवते' अशी सुंदर कॅप्शन तिने या व्हिडिओला दिली आहे.

सिझेरिअननंतरही उत्तम फिटनेस सांभाळणाऱ्या ७ अभिनेत्री; त्या सांगतात सिझरविषयीचे गैरसमजच जास्त कारण..

अतिशय प्रेमाने सायालीने तिची ती गोधडी अंगावर लपेटून घेतली आहे. या गोधडीविषयी ती सांगते की आई आणि आजीच्या काही जुन्या साड्यांपासून तिने ही गोधडी तयार करून घेतली असून कितीही थंडी असली तरी या प्रेमाच्या गोधडीतून मायेची उब जाणवतेच..

 

मदरक्विल्ट्स आणि घोंगडी डॉट कॉम या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांच्या मदतीने तिने ही गोधडी करून घेतली आहे.

फक्त एक पांढरा खडू आणि फळा.. बघा 'तिने' कसं सुंदर चित्र रेखाटलं!

या उपक्रमांच्या माध्यमातून गोधड्या, घोंगड्या तयार केल्या जातात आणि जवळपास १९ देशांमध्ये त्यांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. त्या माध्यमातून ९ राज्यांतील ३५० पेक्षाही अधिक लोकांना रोजगार मिळतो आहे. हा प्रयत्न नीरज बोराटे या एका मराठी तरुणाकडून केला जात असल्याचंही सायलीने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.   

टॅग्स :सोशल व्हायरलसायली संजीव