Join us  

समीरा रेड्डीची ३ वर्षांची लेक करून देतेय आईचं मॅनिक्युअर, मायलेकीचा सुंदर व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 3:01 PM

Nyra Doing Her Mother's Manicure: अभिनेत्री समीरा रेड्डीने (Actress Sameera Reddy) तिचा आणि तिच्या लेकीचा एक अतिशय सुरेख व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये बघा तिची लेक आईवर कोणकाेणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करते आहे.

ठळक मुद्देएकंदरीतच मॅनिक्युअरच्या नावाखाली नायराने तिच्या आईच्या हाताचे हाल केले असले, तरी तो व्हिडिओ खूपच गोड आहे, यात वाद नाही. 

अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. तिच्या मुलांशी संबंधित अनेक पोस्ट ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे आणि तिच्या सासुबाईंचे विनोदी व्हिडिओदेखील कायमच व्हायरल होत असतात. आता समीराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल (viral video of Sameera Reddy and her daughter) झाला आहे. या व्हिडिओमध्ये समीरा आणि तिची तीन- साडेतीन वर्षांची लेक नायरा या दोघीजणी दिसत असून नायरा तिच्या आईला चक्क मॅनिक्युअर करून देत आहे. (Nyra doing her mother's manicure)

 

ज्यांची मुलं- मुली साधारण समीराच्या मुलीच्या वयाची असतात, त्या महिलांनी एकदा तरी समीरासारखा प्रसंग नक्कीच अनुभवलेला असतो. बऱ्याचदा असं होतं की आई जेव्हा पार्लरला जाते तेव्हा मुलांकडे लक्ष देण्यासाठी कुणी नसल्याने मग मुलांनाही सोबत घेऊन जावं लागतं. मुलं पार्लरमध्ये सुरु असलेल्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघतात आणि मग घरी आल्यावर कुणाचं थ्रेडिंग, व्हॅक्सिंग तर कुणाचं फेशियल करणं, असा त्यांचा लुटूपुटूचा खेळ सुरू होतो. जवळ मिळेल ते खेळणं किंवा सामान वापरून मुलं हे सगळं करत असतात, तेव्हा ते भारीच गोड, लाघवी वाटतं. असाच काहीसा खेळ समीराची लेक तिच्यासोबत खेळते आहे. 

 

या व्हिडिओमध्ये समीराच्या लेकीने चक्क समीराचंच मॅनिक्युअर करण्याचा घाट घातला आहे. तिच्या हातात एकच काहीतरी वस्तू आहे आणि तिचा वापर करून ती मॅनिक्युअरच्या वेगवेगळ्या स्टेप्स करते आहे. मध्येच एकदा ती एवढ्या जोरात आईच्या हाताजवळ येते की आता ती समीराला चावते की काय असं वाटतं. त्यानंतर ती ज्या पद्धतीने मसाज करते, ते तर खरोखरंच अतिशय मजेदार आणि बघण्यासारखं आहे. यानंतर ज्या काही पुढच्या एक- दोन स्टेप्स तिने केल्या त्यात तर समीराचं नख देखील तुटल्यासारखं वाटतंय... एकंदरीतच मॅनिक्युअरच्या नावाखाली नायराने तिच्या आईच्या हाताचे हाल केले असले, तरी तो व्हिडिओ खूपच गोड आहे, यात वाद नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामब्यूटी टिप्ससमीरा रेड्डी