Lokmat Sakhi >Social Viral > आलिया भट म्हणते- मी नेहमीच कपडे रिपिट करते कारण.... बघा तिचं कारण तुम्हाला पटतंय का

आलिया भट म्हणते- मी नेहमीच कपडे रिपिट करते कारण.... बघा तिचं कारण तुम्हाला पटतंय का

Alia Bhatt Explains About Repeating Her Clothes: आलिया भट बऱ्याचदा तिचे जुने कपडे रिपिट करताना दिसते. याविषयी बघा तिनेच सांगितलेल्या काही खास गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 16:06 IST2024-12-13T16:05:39+5:302024-12-13T16:06:38+5:30

Alia Bhatt Explains About Repeating Her Clothes: आलिया भट बऱ्याचदा तिचे जुने कपडे रिपिट करताना दिसते. याविषयी बघा तिनेच सांगितलेल्या काही खास गोष्टी...

actress alia Bhatt explains about why she always repeats her clothes | आलिया भट म्हणते- मी नेहमीच कपडे रिपिट करते कारण.... बघा तिचं कारण तुम्हाला पटतंय का

आलिया भट म्हणते- मी नेहमीच कपडे रिपिट करते कारण.... बघा तिचं कारण तुम्हाला पटतंय का

Highlightsआता सेलिब्रिटीही त्यांचे कपडे पुर्वीसारखे लाजतबुजत नाही तर आत्मविश्वासाने रिपिट करताना दिसत आहेत.

आलिया भट (Alia Bhatt) हे बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव. महेश भट यांची ती मुलगी असली किंवा आता कपूर घराण्याची सून असली तरी ती तिची ओळख नाही. ती स्वत:च तिची ओळख आहे. तिच्या अभिनयाद्वारे तिने जगभर चाहते निर्माण केले आहेत. ती अतिशय संयमी, चोखंदळ आणि विचारी आहे, असं तिच्या सभोवतालचे लोक नेहमीच म्हणतात. तिचा विचारीपणा, तिची ठोस भूमिका घेण्याची सवय ही काही महिन्यांपुर्वी दिसून आली जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी तिने तिच्या लग्नात घातलेलीच साडी नेसली.(actress Alia Bhatt explains about why she always repeats her clothes)

 

जुने कपडे पुन्हा पुन्हा घालणे यात काही वेगळं नाही. सर्वसामान्य लोक तर ते नेहमीच करतात. पण जेव्हा आलिया भटसारखी सुपरस्टार अभिनेत्री असं करते तेव्हा साहजिकच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. आजवर आपण हेच पाहात आलो आहोत की सेलिब्रिटी खूपच क्वचितप्रसंगी आणि ते ही खूपच लपूनछपून आधीचेच कपडे पुन्हा घालतात.

हिवाळ्यात महागडा सुकामेवाच कशाला हवा, मूठभर शेंगदाणे खा! आहारतज्ज्ञ सांगतात ५ जबरदस्त फायदे

त्यातही जर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासारखा मानाचा कार्यक्रम असेल तर तिथे नक्कीच जुने कपडे रिपीट करण्याची हिंमत अन्य कोणत्याही सेलिब्रिटीने केली नसती. पण आलियाने ते केलं. तेव्हाही ती म्हणाली होती की लग्न आणि राष्ट्रीय पुरस्कार सोहळा हे दोन्ही प्रसंग तिच्यासाठी अतिशय खास आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रसंगी तिने तिच्या अतिशय आवडीची साडी पुन्हा नेसली. तिला त्यात काहीच वेगळं वाटलं नाही. पण तिच्या चाहत्यांनाच मात्र ते खूप खटकलं.

 

त्यानंतर कपडे रिपीट करण्याच्या आलियाच्या या कृत्याचं अनेक सेलिब्रिटींनी खूप कौतूक केलं. काही सोहळ्यांमधून आता सेलिब्रिटीही त्यांचे कपडे पुर्वीसारखे लाजतबुजत नाही तर आत्मविश्वासाने रिपिट करताना दिसत आहेत.

प्रत्येकीकडे हव्याच या ५ साड्या, तुमच्या ड्रेसिंग स्टाईलचं कौतुक होऊन चारचौघींत कायम उठून दिसाल

एका मुलाखतीत आलिया सांगते की कपडे रिपीट करण्यात काय चूक आहे. आपल्या वॉर्डरोबमध्ये तर ३६५ दिवसांचं ३६५ कपडे असू शकत नाहीत. त्यामुळे एकदा घातलेले कपडे पुन्हा घालावेच लागणार आहेत. मग ती सेलिब्रिटी असली म्हणून काय झालं...याबाबतीत आलिया ट्रेण्डसेटर झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही, नाही का?

 

Web Title: actress alia Bhatt explains about why she always repeats her clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.