Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > इश्कवाला जुगाड! ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ला मिळालेल्या गुलाबांच्या करा ७ गोष्टी, प्रेमाचा सुगंध वर्षभर राहील साेबत...

इश्कवाला जुगाड! ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ला मिळालेल्या गुलाबांच्या करा ७ गोष्टी, प्रेमाचा सुगंध वर्षभर राहील साेबत...

How To Reuse Valentine’s Day Roses : how to reuse rose flowers at home : Valentine roses reuse ideas : 7 ways to reuse Valentine’s Day roses : व्हॅलेन्टाईन डेला मिळालेल्या गुलाबांच्या फुलांचा घरच्याघरीच करता येणारे ७ भन्नाट उपयोग कोणते ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 14:32 IST2026-02-16T14:25:28+5:302026-02-16T14:32:09+5:30

How To Reuse Valentine’s Day Roses : how to reuse rose flowers at home : Valentine roses reuse ideas : 7 ways to reuse Valentine’s Day roses : व्हॅलेन्टाईन डेला मिळालेल्या गुलाबांच्या फुलांचा घरच्याघरीच करता येणारे ७ भन्नाट उपयोग कोणते ते पाहा...

7 ways to reuse Valentine’s Day roses How To Reuse Valentine’s Day Roses how to reuse rose flowers at home Valentine roses reuse ideas | इश्कवाला जुगाड! ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ला मिळालेल्या गुलाबांच्या करा ७ गोष्टी, प्रेमाचा सुगंध वर्षभर राहील साेबत...

इश्कवाला जुगाड! ‘व्हॅलेण्टाइन्स डे’ला मिळालेल्या गुलाबांच्या करा ७ गोष्टी, प्रेमाचा सुगंध वर्षभर राहील साेबत...

‘व्हॅलेण्टाइन्स डे' ला मिळालेली गुलाबाची फुले ही केवळ फुले नसून त्यासोबत अनेक सुंदर भावना जोडलेल्या असतात. नुकताच व्हॅलेन्टाईन्स डे पार पडला आणि प्रेमाची आठवण म्हणून मिळालेली सुंदर गुलाबाची फुलं आता हळूहळू कोमेजायला लागतात. पुढील दोन - तीन दिवसांत ही फुलं सुकायला लागली की आपण नाईलाजाने ती फेकून देतो(7 ways to reuse Valentine’s Day roses).

या खास दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेली गुलाबाची फुले प्रेमाचे प्रतीक असतात. पण जसजसे दिवस सरतात, तसतशी ही फुले सुकू लागतात आणि मग प्रश्न पडतो की या फुलांचे करायचे काय? फेकून देणं तर जिवावर येतं! काळजी करू नका, तुमच्या या लाडक्या फुलांना आणि त्यासोबतच्या आठवणींना तुम्ही घरच्याघरीच वेगवेगळ्या प्रकारे वापरुन ही फुलं वाया न घालवता त्यांचा चांगला उपयोग करुन घेऊ शकता. आपल्याला मिळालेली गुलाबांची फुल (how to reuse rose flowers at home) कचऱ्यात फेकण्यापेक्षा, खरंतर या गुलाबांचा उपयोग घरच्या घरी अनेक क्रिएटिव्ह आणि उपयोगी गोष्टींसाठी करता येतो. थोडीशी कल्पकता वापरली तर हीच फुलं तुमच्या घराला सुगंध देऊ शकतात, सौंदर्य वाढवू शकतात आणि खास आठवणी (Valentine roses reuse ideas) जपून ठेवण्यासही मदत करू शकतात. व्हॅलेन्टाईन डेला (Valentine roses reuse ideas) मिळालेल्या गुलाबांच्या फुलांचा घरच्या घरी करता येणारे ७ भन्नाट उपयोग कोणते ते पाहा... 

१. गुलाबपाणी:- जर गुलाब पूर्णपणे सुकलेला नसेल, तर त्याच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी गुलाबपाणी तयार करता येते. यासाठी पाकळ्या नीट धुऊन एका भांड्यात टाका आणि त्या पूर्ण बुडतील इतके पाणी घाला. मंद आचेवर १० ते १५ मिनिटे उकळा, जोपर्यंत पाणी हलके गुलाबी रंगाचे होत नाही. थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. हे गुलाबपाणी स्किन टोनरप्रमाणे वापरता येते आणि चेहऱ्याला ताजेपणा देते.

किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...

२. सुगंधी 'पोटपूरी' (Potpourri) बनवा :- गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्यापासून नैसर्गिक रूम फ्रेशनर तयार करता येते. पाकळ्या पूर्णपणे वाळवून घ्या. एका काचेच्या बाऊलमध्ये या पाकळ्या ठेवा, त्यात थोडी दालचिनी किंवा लवंग पावडर टाका आणि गुलाबाच्या तेलाचे किंवा कोणत्याही इसेन्शियल ऑईलचे काही थेंब टाका. हा बाऊल हॉलमध्ये किंवा बेडरुममध्ये ठेवल्यास घरभर या नॅचरल रुम फ्रेशनरचा मंद सुगंध दरवळेल.

३. स्किन केअर स्क्रब :- वाळलेल्या पाकळ्या बारीक करून त्यात बेसन, दूध किंवा मध मिसळा. हा नॅचरल स्क्रब त्वचेला सौम्य एक्सफोलिएशन देतो आणि त्वचा तजेलदार बनवतो. आठवड्यातून २ वेळा लावल्यास त्वचा मऊ, चमकदार आणि ग्लोइंग होते. याचबरोबर, गुलाबपाण्यात थोडंसं ग्लिसरीन मिसळून स्प्रे बाटलीत ठेवा. दिवसभरात कधीही वापरल्यास त्वचा ड्राय होत नाही.

शिवजयंती विशेष : राजमाता पैठणीचे मनमोहक डिझाईन्स! ब्लाऊजवर चंद्रकोर आणि पदरावर तुतारी; अस्सल मराठमोळा साज!

४. बुकमार्क :- जर तुम्हाला वाचनाची आवड असेल, तर त्या गुलाबाचा वापर तुम्ही पुस्तकात बुकमार्क म्हणून देखील करू शकता. एखादे जाड पुस्तक घ्या आणि त्यात गुलाबाची पाकळी किंवा संपूर्ण फूल नीट दाबून ठेवा. काही दिवसांनी ते फूल चपटे आणि सुकलेले दिसेल. या फुलाला लॅमिनेट करून तुम्ही एक सुंदर 'मेमरी बुकमार्क' तयार करू शकता.

५. रिलॅक्सिंग बाथ सॉल्ट :- थकवा घालवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून आपण बाथ सॉल्ट देखील तयार करु शकता. वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा चुरा करा. त्यात थोडे 'एप्सम सॉल्ट' (Epsom Salt) किंवा साधे खडे मीठ मिसळा. अंघोळीच्या गरम पाण्यात हे मिश्रण टाकल्यास त्वचेला आराम मिळतो आणि छान सुगंध येतो.

६. गुलकंद तयार करा :- गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून साखरेसोबत काचेच्या बरणीत भरून उन्हात ठेवा. काही दिवसांत स्वादिष्ट आणि आरोग्यदायी गुलकंद तयार होतो. हा शरीराला थंडावा देणारा आणि पचनासाठीही फायदेशीर असतो.

७. सजावटीसाठी फोटो फ्रेम :- मिळालेल्या गुलाबाचे फूल सुकवून तुम्ही ते फोटो फ्रेममध्ये देखील सुंदररित्या सजवू शकता. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोटो असलेल्या फ्रेमच्या कोपऱ्यात हे सुकलेले फूल किंवा पाकळ्या डिझाइन म्हणून चिकटवा. यामुळे ती फ्रेम दिसायला अधिक व्हिंटेज आणि रोमँटिक वाटेल.

Web Title : वैलेंटाइन के गुलाब न फेंके! 7 रचनात्मक, उपयोगी विचार।

Web Summary : वैलेंटाइन के गुलाबों को गुलाब जल, पॉटपौरी या स्किन स्क्रब में बदलें। बुकमार्क, बाथ सॉल्ट या गुलकंद बनाएं। फोटो फ्रेम सजाएं। यादों को रचनात्मक रूप से संरक्षित करें!

Web Title : Don't throw away Valentine's roses! 7 creative, useful ideas.

Web Summary : Transform Valentine's roses into rosewater, potpourri, or skin scrub. Create bookmarks, bath salts, or gulkand. Decorate photo frames. Preserve memories creatively!