सध्या वेगवेगळ्या ट्रेंड्सचा जमाना आहे. दिवसागणिक हे ट्रेंड्स बदलत जातात. यातही कधी कुठला ट्रेंड व्हायरल होईल हे सांगता येत नाही. नुकतेच आपण सगळ्यांनी घिबली ट्रेंडच देशादेशांत पसरलेलं वादळ पाहिलंच. हा ट्रेंड मागे पडतो न पडतो तोच आता काय म्हणे तर ‘टर्मरिक ग्लो’ हा ट्रेंड ( Turmeric Glow Trend) सध्या सगळ्याच सोशल मिडिया माध्यमांवर जोर धरतो आहे. आत्तापर्यंत आपल्यापैकी बऱ्याचजणांनी हा ट्रेंड फॉलो करत स्वतःचे व्हिडीओ काढून वेगवेगळ्या सोशल मिडिया माध्यमांवर पोस्टही (6 amazing benefits of turmeric water) केले असतीलच. ‘टर्मरिक ग्लो’ ट्रेंड करताना सगळ्यांत आधी घरातल्या लाईट बंद (Benefits of Turmeric Water) करून संपूर्णपणे काळोख करून घ्यावा, त्यानंतर आपल्या फोनचा फ्लॅश लाईट ऑन करून मोबाईल आपल्या समोर ठेवावा. मग या बरोबर फ्लॅश लाईटवर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवावा, त्यानंतर या पाण्यांत चमचाभर हळद घालावी(Haldi Water Trend).
हळद जसजशी ग्लासच्या तळाशी जाते तसतशी ती ग्लासात पसरत जाते व याचा प्रकाश संपूर्ण खोलीभर पसरतो. असा काहीसा हा साधासोपा ट्रेंड.... हा ट्रेंड करण्यासाठी अगदी बेसिक आणि सगळ्यांच्याच घरात कायम उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर केला जातो, म्हणून जो तो उठून हा ट्रेंड फॉलो करत आहे. परंतु या ट्रेंडसाठी रील शूट करुन झाल्यावर हे हळदीचे पाणी अनेकजण फेकून देतात. पण खरंतर हे हेल्दी आणि औषधी गुणधर्म असलेलं हळदीचं पाणी फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा इतर गोष्टींसाठी वापर करु शकता. हळदीचं पाणी फेकून न देता आपण त्याचा कसा वापर करु शकतो ते पाहा...
हळदीच्या पाण्याचा असा करा वापर...
१. फेसटोनर किंवा फेसपॅक म्हणून :- हळदीचं पाणी कापसाच्या बोळ्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि पिंपल्स, डाग, मुरुम, पुटकुळ्या कमी होतात. यासोबतच, आपण या पाण्याचा त्वचेसाठी फेसपॅक म्हणून देखील वापर करू शकतो. या हळदीच्या पाण्यांत आपण बेसन, मुलतानी माती यांसारखे औषधी घटक घालूंन त्वचेसाठी फेसपॅक तयार करु शकतो.
पावसाळ्यात डाळी - कडधान्य खराब होतात? डब्यात ठेवा ७ पदार्थ- अळ्या-किडे-बुरशीचा त्रास नाही...
२. घरातील शो - पीस मुर्त्या करा स्वच्छ :- घरातील पितळेच्या वस्तू, भांडी, शो- पिस स्वच्छ करण्यासाठी देखील आपण या हळदीच्या पाण्याचा वापर करु शकता. हा पाण्यांत रुमाल भिजवून त्याने पितळेच्या वस्तू पुसून घ्यावेत त्यामुळे त्यावर वेगळीच चमक येते व पितळेच्या वस्तू नव्या दिसू लागतात.
३. बागेतील रोपांसाठी :- १ ग्लास हळदीचे पाणी ५ लिटर पाण्यांत मिसळून त्याचे द्रावण तयार करावे. हे द्रावण बागेतील रोपांच्या कुंडीत ओतावे. यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते तसेच पाने हिरवीगार राहण्यास मदत होते.
लालचुटुक लिचीची करा मस्त आंबटगोड 'लिची जेली' - विकतच्या चॉकलेटपेक्षा भारी- खास रेसिपी...
४. डाळ तयार करण्यासाठी :- आपण रोजच्या जेवणात डाळ आवर्जून करतोच. डाळ तयार करताना आपण त्यात पाणी व हळद घालतोच. तेव्हा हे पाणी वाया जाऊ न देता डाळ तयार कारण्यासाठी आपण या हळदीच्या पाण्याचा वापर करु शकतो.
न वाफवता करा ८ दिवस टिकणारी कुरकुरीत कोथिंबीर वडी, करायला सोपी चवीला उत्तम - पाहा रेसिपी...
५. माऊथ वॉश म्हणून वापरा :- हळद अँटी-बॅक्टेरियल असल्याने हळदीचं पाणी माऊथ वॉशसाठी वापरल्यास तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात व ताजेपणा मिळतो. याचबरोबर, तोंडातील दुर्गंधी, दातांच्या समस्या, हिरड्यांना येणारी सूज या सगळ्या समस्यांवर हळदीचे पाणी फायदेशीर ठरते.
६. अंघोळीच्या पाण्यात मिसळा :- अंघोळीच्या पाण्यात आपण हे हळदीचं पाणी मिसळू शकता. यामुळे त्वचा मऊ होते आणि शरीराला थंडावा मिळतो.