Join us

कडुलिंबाची पाने ५ प्रकारे वापरा, डास-माशा पळतील दूर, घरात वाटेल प्रसन्न रोज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 18:04 IST

5 Ways to Use Neem Leaves to Get Rid of Mosquitoes : How to use neem leaves for mosquitoes : Mosquito killer using neem extract : पावसाळ्यात डास, माशांना पळवून लावण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा 'असा' करा वापर...

पावसाळा सुरु झाला की घरात डास, माशा अगदी कानाकोपऱ्यात घोंगावतात. काहीवेळा तर घरभर फिरणाऱ्या या डास, माशांचा इतका त्रास होतो की अगदी वैताग येतो. या डास, माशा घराच्या कानाकोपऱ्यात लपून बसून आपल्याला त्रास देतात. घरात येणारे डास, माशा कानाजवळ सतत भुणभुणतात, चावतात, स्वयंपाक घरातील अन्नपदार्थांवर (How to use neem leaves for mosquitoes) बसून रोगराई पसरवतात. घरातील डास आणि माशांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. डास चावू नयेत म्हणून, बरेचदा आपण बाजारातून केमिकल्सयुक्त क्रीम्स, लोशन (Mosquito killer using neem extract) आणून त्वचेवर चोपडतो. यासोबतच, डास, माशांना पळवून लावणारे केमिकलयुक्त स्प्रे आणि मॉस्किटो रिपेलंट्सचा वापर करतो,पण याचा कितीही उपयोग होत असला तरी ते आरोग्यासाठी हानिकारकच असतात. अशा परिस्थितीत, कडुलिंबाच्या पानांचा नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरू शकतो. आपल्याच घरातील छोट्याशा कुंडीत सहज मिळणाऱ्या कडुलिंबाच्या पानांचा उपयोग करून डासांपासून नैसर्गिक पद्धतीने संरक्षण मिळवता येतं( Mosquito killer using neem extract).

कडुलिंबाच्या पानांमध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात, जे डास आणि इतर पावसाळी कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात. याचा वापर करून आपण पावसाळ्यात डास, माशा व इतर कीटकांना घरापासून दूर ठेवू शकतो. कोणताही खर्च नाही, कोणतीही रासायनिक प्रक्रिया नाही, फक्त कडुलिंबाच्या पानांचा  योग्य वापर फायदेशीर ठरेल. पावसाळ्यात डास, माशा व इतर किट्कांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर कोंणत्या ५ पद्धतींनी करावा ते पाहूयात. 

पावसाळ्यात डास, माशांना पळवून लावा मिनिटभरात... 

१. कडुलिंबाच्या पानांचा स्प्रे:- मच्छर दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा सगळ्यात सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे त्याचा स्प्रे तयार करणे. त्यासाठी कडुलिंबाची ताजी पाने पाण्यात टाकून चांगली उकळा. पाण्याचा रंग बदलून हिरवटसर किंवा गडद होईपर्यंत ते उकळा. नंतर हे पाणी गार करून एका स्प्रे बाटलीत भरून घ्या. हा स्प्रे घराच्या सर्व कोपऱ्यांत आणि ज्या ठिकाणी डास, माशा जास्त असतात अशा ठिकाणी फवारणी करा. यामुळे डास, माशा दूर राहतात आणि घरात नैसर्गिक सुगंधही येतो. 

झुरळं-पाली-उंदीर यांना पळवून लावणारा खास उपाय, एकदाच करा त्रास होईल कायमचा बंद...

२. लादी पुसण्याच्या पाण्यांत घाला हे द्रावण :- अनेकवेळा डास, माशा घराच्या कानाकोपऱ्यात अंडी घालतात आणि तिथेच आपलं वास्तव्य करतात. अशा परिस्थितीत कडुलिंबाची पाने पाण्यांत उकळवून ते पाणी आपल्या नेहमीच्या लादी पुसण्याच्या पाण्यांत घातल्याने डास,माशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. या नैसर्गिक उपायामुळे मच्छर दूर राहतात आणि घरातील जंतूंचाही नायनाट होतो. 

३. त्वचेवर लावा कडुलिंबाच्या पानांचा लेप :- जर तुम्हाला झोपताना किंवा घरात सतत मच्छर चावत असतील, तर त्वचेवर कडुलिंबाचा लेप लावणे हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी कडुलिंबाची ताजी पाने वाटून घ्या आणि त्यात थोडं नारळाचं तेल मिसळा. हा तयार लेप त्वचेवर लावा. हा उपाय लहान मुलांच्या त्वचेवर देखील फायदेशीर ठरु शकते. कडुलिंबाच्या उग्र गंधामुळे डास, माशा जवळ येत नाहीत आणि त्वचेला नैसर्गिक संरक्षण मिळतं.

वापरलेली चहा पावडर फेकू नका! स्वयंपाकघरातील ६ कामं होतील सहजसोपी - वाटेल आधी का नाही केला उपाय...

४. घरात ठेवा कडुलिंबाची ताजी पाने :- पावसाळ्यात डास, माशांना पळवून लावण्यासाठी उपाय म्हणून घरातल्या कानाकोपऱ्यांमध्ये कडुलिंबाची ताजी पाने ठेवू शकता. कडुलिंबाच्या पानांचा गंध डास, माशांना अजिबात आवडत नाही, त्यामुळे ते त्या भागापासून दूर राहतात. खिडक्या, दरवाजे, स्वयंपाकघरातील सिंक या ठिकाणी कडुलिंबाची पाने ठेवा. कडुलिंबाच्या पानांची छोटी पोटली करून ती वेंटिलेशनच्या भागांत लटकवून ठेवू शकता. हा उपाय नैसर्गिक, सुरक्षित आणि घरगुती आहे.

केसगळती थांबवते, केस वाढतात भरभर-लावा ‘हे’ जादुई तेल! एक चंपी-डोकं शांत-केस सुंदर...

५. कडुलिंबाच्या पानांचा धूर :- कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास डास, माशा घराबाहेर पळतात. यासाठी एका मातीच्या भांड्यात कोरडी आणि ताजी कडुलिंबाची पाने घ्या. त्यात कापूरच्या वड्या घालून नंतर ही पाने जाळा. या धुरामुळे मच्छर लगेच घर सोडून पळतात आणि घरात एक नैसर्गिक सुवास दरवळत राहतो. हा उपाय संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केल्यास अधिक फायदेशीर ठरतो.

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीघरगुती उपाय