Lokmat Sakhi >Social Viral > पावसामुळे फुगलेल्या खिडक्या - दरवाजाच्या कळकट जाळ्या साफ करण्यासाठी ५ टिप्स, जाळ्या स्वच्छ होतील काही मिनिटांत

पावसामुळे फुगलेल्या खिडक्या - दरवाजाच्या कळकट जाळ्या साफ करण्यासाठी ५ टिप्स, जाळ्या स्वच्छ होतील काही मिनिटांत

5 tips to clean windows, clean sticky dirt from window nets easy tips : घराच्या खराब झालेल्या जाळ्या साफ करायची सोपी पद्धत. पाच मिनिटांत करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 13:41 IST2025-08-15T13:38:08+5:302025-08-15T13:41:08+5:30

5 tips to clean windows, clean sticky dirt from window nets easy tips : घराच्या खराब झालेल्या जाळ्या साफ करायची सोपी पद्धत. पाच मिनिटांत करा हे उपाय.

5 tips to clean windows, clean sticky dirt from window nets easy tips | पावसामुळे फुगलेल्या खिडक्या - दरवाजाच्या कळकट जाळ्या साफ करण्यासाठी ५ टिप्स, जाळ्या स्वच्छ होतील काही मिनिटांत

पावसामुळे फुगलेल्या खिडक्या - दरवाजाच्या कळकट जाळ्या साफ करण्यासाठी ५ टिप्स, जाळ्या स्वच्छ होतील काही मिनिटांत

पावसाळ्यात खिडकी किंवा दरवाज्याच्या जाळ्यांमध्ये चिखल, धूळ आणि पावसाच्या पाण्यामुळे जमा झालेली माती अडकून बसते जाळीवरुन हात फिरवला तर हातालाही घाण लागते. जाळ्या काळ्या दिसतात त्यातील माती सहसा जात नाही. (5 tips to clean windows, clean sticky dirt from window nets easy tips  )पाण्याच्या माऱ्यामुळे धूळ चिकटून बसते. निघता निघत नाही.  अशा वेळी त्यांची स्वच्छता करताना घाई करण्यापेक्षा थोडी तयारी करूनच काम करणे चांगले ठरते. सर्वप्रथम जाळ्यांवरील कोरडी धूळ किंवा हलकी माती कोरड्या ब्रशने किंवा जुना टूथब्रश वापरून काढावी. सुके फडके फिरवून माती झटकून घ्यावी. यामुळे पुढे पाणी वापरल्यावर चिखल वाढत नाही. अनेक जण डायरेक्ट पाणी मारुन साफ करायला जातात. त्यामुळे माती आणखी घट्ट बसते आणि घासून काढावी लागते. त्यामुळे आधी सुकी घाण काढून घ्यायची मग पाणी वापरायचे.

सुक्या फडक्याचे काम झाले की नंतर कोमट पाण्यात थोडा साबण किंवा लिक्विड सोप मिसळायचा. मिश्रण छान ढवळायचे. एक स्पंज किंवा मऊ कापड त्या मिश्रणात भिजवायचे. जाळी वरुन फिरवायचे. स्पंज वापरणे जास्त फायद्याचे ठरते. त्यामुळे स्पंज असेल तर फडके नको. जाळीच्या भोकांतून स्पंज आरपार फिरवत अडकलेली माती सैल करुन घ्यायची. नंतर कपडे घासण्यासाठी वापरली जाणारी दातांची घासणी घ्यायची. त्याच्या मदतीने जाळी घासायची. घासणीमुळे जाळीमध्ये अडकलेली चिकट माती सैल होऊन काढणे सोपे जाते. जाळी सुकल्यावर टुथपीक किंवा टोकदार पिन घ्यायची. जाळीवरुन फिरवायची. अडकलेली माती पडून जाते. खाली फडकं किंवा कागद ठेवा म्हणजे माती जमिनीवर पडून लादी खराब होणार नाही. जळी जर काढून धुणे शक्य असेल तर जाळी तिरकी ठेऊन त्यावर पाण्याचा फवारा मारुन साफ करता येते. मात्र जाळी जर फिटींगची असेल तर जरा कष्टायचे काम असते.  

मुळात जाळी पावसाळ्यात दर पंढरा दिवसांनी धुणे गरजेचे आहे. तसे नाही केले तर माती जास्त चिकटते आणि त्यामुळे साफ करताना फार त्रास होतो. वेळोवेळी सफाई करणे योग्य ठरते. 

Web Title: 5 tips to clean windows, clean sticky dirt from window nets easy tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.