Lokmat Sakhi >Social Viral > वीज बिल जास्त येईल म्हणून वॉशिंग मशिन वापरणं टाळता? ५ टिप्स; वीजबिल येईल कमी

वीज बिल जास्त येईल म्हणून वॉशिंग मशिन वापरणं टाळता? ५ टिप्स; वीजबिल येईल कमी

5 energy saving tips for washing machine : वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्याने भरमसाठ वीज बिल येते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 03:19 PM2024-07-28T15:19:21+5:302024-07-28T15:20:26+5:30

5 energy saving tips for washing machine : वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्याने भरमसाठ वीज बिल येते?

5 energy saving tips for washing machine | वीज बिल जास्त येईल म्हणून वॉशिंग मशिन वापरणं टाळता? ५ टिप्स; वीजबिल येईल कमी

वीज बिल जास्त येईल म्हणून वॉशिंग मशिन वापरणं टाळता? ५ टिप्स; वीजबिल येईल कमी

बहुतांश लोकांकडे सध्या वॉशिंग मशीन आहेत (Washing Machine). वॉशिंग मशीनचा वापर कपडे धुण्यासाठी होतो, यात कपडे स्वच्छ धुवून निघतात. वॉशिंग मशीनमध्ये वॉशिंग पावडर आणि पाणी घाला, नंतर टायमर लावा (Electricity Bill). कपडे आपोआप धुवून निघतात. मशिनमध्ये कपडे धुवून पूर्ण वाळण्यासाठी  ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. यामुळे हाताने कपडे धुण्याचाही वेळ वाचतो (Cleaning Tips).

पण नियमित वॉशिंग मशीनचा वापर केल्याने वीज बिल जास्त येतं. या भीतीने काहीजण मशीनचा वापर मर्यादित करतात. जर आपल्याला नियमित वॉशिंग मशीनचा वापर करायचा असेल आणि वापरल्यानंतर वीजबिल जास्त येऊ नये असे वाटत असेल तर, ४ टिप्स फॉलो करा. कपडे स्वच्छ निघतील, विजेचा वापरही कमी होईल(5 energy saving tips for washing machine).

फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द

एका वेळी कपडे धुवा

काही लोक २ - ३ कपडे धुण्यासाठीही वॉशिंग मशीनचा वापर करतात. पण फक्त २ - ३ कपड्यांसाठी वॉशिंग मशीनचा वापर करणे टाळा. कपडे जास्त असल्यावर वॉशिंग मशीनचा वापर करा. खूप कपडे असतील तेव्हा धुतल्याने एकाच वेळा मशीनचा वापर होईल. ज्यामुळे वीजबिलही कमी येईल.

जास्त पाण्याचा वापर टाळा

काही लोक वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करतात. यामुळे पाण्याचा अपव्यय तर होतोच पण विजेचा वापरही वाढतो. त्यामुळे कपडे बुडतील इतक्याच पाण्याचा वापर करा. ज्यामुळे कपडे पूर्णपणे पाण्यात बुडतील, जास्त पाण्याचा वापर टळेल.

जान्हवी कपूर सांगते, त्या चार दिवसात कधीकधी नाकातून रक्तस्त्राव होतो! हा त्रास महिलांना कशाने होतो?

क्विक वॉश मोड

आजकाल बहुतांश वॉशिंग मशिनमध्ये क्विक वॉश मोड असते. हे बटण दाबल्यानंतर कपडे लवकर धुतले जातात. शिवाय विजेचीही बचत होते.

एनर्जी सेव्हिंग मोड

आजकाल वॉशिंग मशीनचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ज्यात 'एनर्जी सेव्हिंग मोड' असते. यामुळे विजेची बचत होऊ शकते.

Web Title: 5 energy saving tips for washing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.