स्वच्छ आणि टापटीप घर कोणाला आवडत नाही? पण अनेकदा घरात स्वच्छता ठेवूनही उंदीर, पाल आणि झुरळ यांसारख्या कीटकांचा आणि प्राण्यांचा उपद्रव सुरूच असतो. हे त्रासदायक जीव फक्त घरात अस्वच्छताच पसरवत नाहीत, तर अनेक गंभीर आजारांनाही आमंत्रणही देतात. घर स्वच्छ ठेवूनही अनेकदा घरात उंदीर, पाल आणि झुरळांचा त्रास अचानक वाढतो आणि त्यामागचं नेमकं कारण कळत नाही. प्रत्यक्षात कीटकनाशकं फवारण्यापेक्षा किंवा महागडे उपाय करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन सवयींकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरतं. नकळतपणे आपण करत असलेल्या काही छोट्या चुका आणि दुर्लक्ष केलेल्या सवयी घरात उंदीर, पाल आणि झुरळांना आकर्षित करतात(5 Common Bad Habits That Are Attracting Rats, Insects & Lizards to Your House).
आपल्या नेहमीच्या ५ सवयी नकळतपणे या कीटकांना आणि प्राण्यांना घरात आश्रय घेण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. जर तुम्हाला तुमच्या घरातून या समस्येचा मुळापासून नायनाट करायचा असेल, तर सर्वातआधी या ५ मुख्य कारणांना ओळखून त्या सवयी बदलणे गरजेचे आहे. तर, कोणत्या आहेत त्या सवयी ज्यामुळे तुमच्या घरात उंदीर, पाल आणि झुरळांचे प्रमाण वाढते, हे जाणून घेऊया...
या मुख्य ५ चुकीच्या सवयींमुळे घरात उंदीर, पाल आणि झुरळांचे प्रमाण वाढते...
चूक १ :- ओलसरपणा किटकांना आकर्षित करतो :-
अन्न किटकांना आकर्षित करते, पण पाणी आणि पाण्याचा ओलावा त्यांना तिथे थांबायला भाग पाडते. आपल्या घरात गळणारे नळ, वापरानंतर बराच वेळ ओला राहणारा बाथरूमचा फरशीचा भाग किंवा फ्रीजखाली साचलेला ओलसरपणा आणि पाणी किंवा कुंड्यांमधील जमा झालेला ओलावा. ही ठिकाणे आपल्याला दिसत नाहीत, पण शक्यतो, अशा प्रकारे ओलावा असलेल्या ठिकाणी घरात उंदीर, पाल आणि झुरळांचे प्रमाण वाढते.
चूक २ :- घरातील या जागा असतात त्यांची आवडती ठिकाणे :-
कीटकांना आपल्या घरांतील काही विशिष्ट जागा खूप आवडतात, आणि त्या त्यांना मिळाल्यास ते तुमच्या घरात वारंवार येतात. कोपऱ्यांमध्ये ढकलून ठेवलेले पुठ्ठ्याचे ढिगारे, जुनी वर्तमानपत्रे आणि स्टोरेज बॅग्ज ही अंधारी, उष्णता देणारी ठिकाणे आहेत. विशेषतः उष्णता, ओलसरपणा शोषून घेते आणि घाण रोखून ठेवते, ज्यामुळे ते त्यांच्यासाठी एक अत्यंत आरामदायक आश्रयस्थान बनतात, यामुळे घरातील या जागा त्यांची आवडती ठिकाणे जिथे त असतात जिथे ते मोठया संख्येने राहतात.
चूक ३ :- कचरा खूप वेळ साठवून ठेवणे :-
घराला कीटक-मुक्त ठेवण्यासाठी, फक्त कीटकांना ज्या लहान-लहान गोष्टींची गरज असते, त्या काढून टाकाव्यात. उदाहरणार्थ - ओलसरपणाचे डाग, लपण्यासाठी आरामदायक जागा आणि घरात प्रवेश करण्यासाठी छोटी - छोटी छिद्रे. जेव्हा एखादया ठिकाणी कीटकांसाठी आवश्यक असणाऱ्या या गरजा पुरवणे बंद केले जाते तेव्हा कीटकांची त्या जागी राहण्याची आवड कमी होते. त्याचबरोबर, घरात कधीही कचरा खूप वेळ साठवून ठेवू नये. कचऱ्यातील अन्नपदार्थ आणि इतर गोष्टी यामुळे कीटक आकर्षित होतात यामुळे घरात कचरा खूप दिवस साठवून ठेवू नये.
चूक ४ :- रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवणे :-
आपण सगळेच कधी ना कधी रात्री भांडी घासायचे काम पुढे ढकलतो. आपण सकाळी भांडी घासू असे म्हणून त्यांना तसेच सोडून देणे झुरळं, पाल, मुंग्यांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. उरलेले अन्न, चिकटपणा आणि सिंकमध्ये साचलेले पाणी मुंग्या, झुरळे आणि माशांनाही आकर्षित करू शकते.
चूक ५ :- घरातील पाळीव प्राण्यांचे सांडलेले अन्नपदार्थ स्वच्छ न करणे :-
घरातील पाळीव प्राण्यांनी त्यांचे अन्नपदार्थ खाऊन टाकले असेल, तरीही उरलेले अन्नपदार्थ अनेक किटकांना आवडते. प्रथिने आणि पौष्टिक तत्वांनी भरपूर असलेले, तसेच ओले आणि ताजे अन्नपदार्थ उग्र वास सोडतात. हा वास मुंग्या, झुरळे आणि उंदरांसह अनेक प्रकारच्या कीटकांना आकर्षित करतो. पाळीव प्राण्यांची भांडी घरामध्ये किंवा बाहेर उघडी किंवा अस्वच्छ ठेवणे हे कीटकांना आमंत्रण देण्यासारखे आहे, हेकटाक्षाने टाळलेच पाहिजे.
Web Summary : Eliminate pests by addressing dampness, clutter, and food sources. Clean spills, avoid leaving dirty dishes overnight, and manage pet food promptly to discourage rats, lizards, and cockroaches from infesting your home.
Web Summary : नमी, कबाड़ और खाद्य स्रोतों को संबोधित करके कीटों को खत्म करें। चूहों, छिपकलियों और तिलचट्टों को अपने घर में घुसने से रोकने के लिए रिसाव साफ करें, रात भर गंदे बर्तन छोड़ने से बचें, और पालतू जानवरों के भोजन का तुरंत प्रबंधन करें।