Join us  

५ सवयी तुमचं इम्प्रेशन डाऊन करतात, चारचौघात पोलखोल-लोकांना कळतं तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 2:02 PM

5 Body language mistakes to avoid : तुमच्याकडे पाहूनच कळतं की तुमचा आत्मविश्वास कमी आहे? कारण तुमच्या ५ सवयी, चारचौघात जरा सांभाळा

आपली बॉडी लॅग्वेज ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग असते. आपण कसे वावरतो, हातवारे करतो यावर आपला अॅटीट्यूड, आपल्याला असलेले मॅनर्स या गोष्टी ठरत असतात. ऑफीसमध्ये असो किंवा बाहेर कुठेही वावरताना आपलं वागणं, बोलणं जितकं महत्त्वाचं असतं तितकीच आपली बॉडी लॅग्वेजही महत्त्वाची असते. आपल्याही नकळत आपण वावरताना काही वेळा चुकीचे हातवारे करतो. याचे कारण एकतर आपल्याला तसे करण्याचा अर्थ माहित नसतो किंवा गडबडीत आपल्या ते लक्षात येत नाही. 

सोशली अशाप्रकारे हातवारे करणे किंवा काही चुकीच्या गोष्टी करणे आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी किंवा इमेजसाठी योग्य नसते. प्रसिद्ध इमेज कोच आरती अरोरा आपल्या अन्स्टा्गराम अकाऊंटवरुन याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. आता अशा कोणत्या हालचाली आहेत ज्या आपण आवर्जून टाळायला हव्यात? ज्यामुळे आपले सगळ्यांसमोर चांगले इंप्रेशन पडेल आणि त्यामुळे नकळत आत्मविश्वासही वाढायला मदत होईल (5 Body language mistakes to avoid). 

१. खिशात हात घालणे

कोणाशीही बोलताना हात खिशात घालणे चुकीचे आहे. आपल्याही नकळत बोलता बोलता आपण हात पँटच्या खिशात घालतो. हल्ली कुर्ता, कॉटन पँट यांनाही सोयीसाठी खिसे दिलेले असतात. बोलताना हाताचे काय करायचे हे न समजल्याने आपण असे करतो. मात्र त्यामुळे समोरचा व्यक्ती घाबरलेला राहू शकतो. त्यामुळे बोलताना असे करणे टाळावे. 

२. बोलताना बोटे दाखवणे 

काही जणांना बोलताना खूप हातवारे करण्याची सवय असते. यामध्ये बोट दाखवून बोलण्याचीही सवय असू शकते. मात्र अशाप्रकारे कोणाशीही बोलणे योग्य नाही. बोट दाखवल्याने समोरच्याला आपण त्याच्यावर काहीतरी आरोप करतोय असे फिलिंग येते. इतकेच नाही तर त्यामुळे त्या व्यक्तीला अपमानित वाटू शकते. 

३. पेन किंवा घड्याळाशी खेळणे 

ऑफीसमध्ये किंवा व्यावसायिक मिटींगच्या वेळी आपण नकळत बोलताना पेन किंवा हातात असलेल्या घड्याळाशी खेळत राहतो. मात्र असे करण योग्य नसते. यामुळे आपण नर्व्हस आहोत असे समोरच्याला वाटत राहते. 

४. नखं खाणे 

नखं खाणे ही अतिशय कॉमन सवय आहे. अनेकांना नखं खाताना खूप कम्फर्टेबल आणि सेफ वाटते. असे असले तरी पब्लिकली अशाप्रकारे नखं खाणं योग्य नाही. आरोग्याच्या दृष्टीने तर ते चांगले नसतेच पण आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप म्हणूनही ते योग्य नसते. नखं खाणारी व्यक्ती खूप चिंतेत किंवा काळजीत आहे असे समजले जाते. त्यामुळे तुमचा नर्व्हसनेस समोरच्याला समजू द्यायचा नसेल तर असे करणे टाळायला हवे. 

५. खूप जास्त परफ्यूम मारणे

काही जणांना खूप जास्त परफ्यूम मारण्याची सवय असते. यामुळे आपल्या अंगाला घामाचा वास न येता चांगला वास येईल हे जरी खरे असले तरी असे करणे योग्य नाही. कारण अशाप्रकारे खूप जास्त प्रमाणात परफ्यूम मारल्याने इतर व्यक्ती तुमच्यापासून नकळत दूर राहणे पसंत करतात.  

टॅग्स :सोशल व्हायरलप्रेरणादायक गोष्टीव्यक्तिमत्व