साबण ही आपल्या अगदी रोजच्या वापरातली वस्तू. रोजच्यारोज ती अगदी लागतेच. त्यामुळे ती खूप पटापट संपते सुद्धा.. आता साबण संपून तिचा छाेटासा तुकडा उरला की मग काही जण तो लगेच फेकून देतात. असं महिन्याकाठी आपण साबणाचे कितीतरी तुकडे फेकून देतो. पण हेच तुकडे खूप वेगवेगळ्या छान- छान पद्धतींनी वापरता येतात (how to reuse leftover soap?). त्यासाठी नेमके काय करायचे याच्या काही मस्त आणि खूप सोप्या आयडिया पाहूया..(5 amazing ideas for reusing leftover soap bar)
साबणाचे तुकडे पुन्हा वापरण्याच्या काही खास ट्रिक
१. साबणाचे तुकडे पुन्हा वापरण्याची एक अतिशय सोपी आणि बहुतांश लोकांना माहिती असलेली ट्रिक म्हणजे साबणाच्या तुकड्यांपासून हॅण्डवॉश तयार करणे. यासाठी साबणाच्या तुकड्याचे अगदी लहान लहान तुकडे करा. त्यात थोडं गरम पाणी टाका.
गरम पाणी टाकून ठेवल्यानंतर काही वेळातच साबण विरघळेल. विरघळलेल्या साबणामध्ये थोडं डेटॉल किंवा शाम्पू टाका आणि हे मिश्रण हॅण्डवॉशच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरून ठेवा.
२. दुसरा उपाय म्हणजे साबणाचे तुकडे थोडे ओलसर करा आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करा. हे बॉल्स तुम्ही प्रवासात नेण्यासाठी वापरू शकता. ते कॅरी करायलाही अगदी सोपे जातात.
३. साबणाचा तुकडा एखाद्या पेपर बॅगमध्ये टाका. ती बॅग चारही बाजूंनी पॅक करा आणि त्या बॅगवर छोटी छोटी छिद्रे पाडा. आत ही बॅग तुमच्या एखाद्या खोलीमध्ये लटकवून ठेवा. साबणाचा सुगंध खोलीभर पसरेल.
फक्त ५०० रुपयांत घ्या स्टायलिश लॅपटॉप बॅग, वजनाला हलकी आणि भरपूर टिकाऊ
४. वरील पद्धतीने तयार केलेली बॅग तुम्ही तुमच्या कपाटामध्ये किंवा मग जिथे ठेवणीचे कपडे ठेवलेले असतात अशा ठिकाणी ठेवू शकतात. उदा. दिवाणच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या कपड्यांना बऱ्याचदा कुबट वास येतो. अशा ठिकाणी साबण ठेवलेली पिशवी ठेवली तर कपड्यांना कुबट वास येणार नाही.
कुंडीमध्ये माती भरताना ३ गोष्टी नक्की घाला, रोपं वाढतील जोमानं- बाग होईल हिरवीगार
५. साबणाचा वापर करून तुम्ही मुलांसाठी क्रेयॉन रंग तयार करू शकतात. साबण वितळवून घ्या त्यामध्ये फूड कलर टाका आणि नंतर बर्फाच्या ट्रेमध्ये भरून ठेवा. थंड झाल्यानंतर हे क्यूब मुलांना क्रेयॉन रंगांप्रमाणे वापरता येतील.