Lokmat Sakhi >Social Viral > मोबाईल रोज वापरता पण स्वच्छ करता का ? ४ स्टेप्समध्ये मोबाईल स्वच्छ करा - जुना मोबाईलही दिसेल नवाकोरा...

मोबाईल रोज वापरता पण स्वच्छ करता का ? ४ स्टेप्समध्ये मोबाईल स्वच्छ करा - जुना मोबाईलही दिसेल नवाकोरा...

How To Clean Up Your Mobile Phone : How to Clean Your Cell Phone and Keep it Germ-Free : How to clean your smartphone safely : 4 easy steps to clean your phone from the outside : साध्यासोप्या ४ स्टेप्स फॉलो करुन मोबाईल स्वच्छ करण्यासाठी भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 09:17 IST2025-03-11T08:50:50+5:302025-03-11T09:17:09+5:30

How To Clean Up Your Mobile Phone : How to Clean Your Cell Phone and Keep it Germ-Free : How to clean your smartphone safely : 4 easy steps to clean your phone from the outside : साध्यासोप्या ४ स्टेप्स फॉलो करुन मोबाईल स्वच्छ करण्यासाठी भन्नाट ट्रिक...

4 easy steps to clean your phone from the outside How To Clean Up Your Mobile Phone | मोबाईल रोज वापरता पण स्वच्छ करता का ? ४ स्टेप्समध्ये मोबाईल स्वच्छ करा - जुना मोबाईलही दिसेल नवाकोरा...

मोबाईल रोज वापरता पण स्वच्छ करता का ? ४ स्टेप्समध्ये मोबाईल स्वच्छ करा - जुना मोबाईलही दिसेल नवाकोरा...

'मोबाईल' ही आता आपल्या जीवनावश्यक वस्तूंपैकी एक महत्वाची वस्तू झाली आहे. आजकाल लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजी - आजोबांपर्यंत सगळ्यांच्याच हातात कायम मोबाईल ( 4 easy steps to clean your phone from the outside) दिसतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत (How To Clean Up Your Mobile Phone) आपण आपली बरीचशी काम मोबाईलवरच करतो. दिवसभर असा वेगवेगळ्या कामांसाठी मोबाईलचा वापर केल्याने मोबाईल अनेकदा हाताळला जातो. मोबाईल वापरताना आपण तो कधीही - कुठेही - कसाही ठेवतो. याचबरोबर, रोज वापरल्याने या मोबाईलवर (How to Clean Your Cell Phone and Keep it Germ-Free) धूळ साचते. याचबरोबर, या मोबाईलच्या कडांमध्ये किंवा चार्जिंग पोर्टमध्ये धूळ जाऊन फसते.

मोबाईलवर अशी वारंवार धूळ साचत राहिल्यास मोबाईल कितीही नवा जरी असला तरीही तो जुनाच दिसू लागतो. इतकेच नव्हे मोबाईल आपण जेवताना, नाश्ता करताना कधीही हाताळतो त्यामुळे यावर तेलकट - चिकट डाग लागतात. तर काहीवेळा त्याच्या स्क्रीनवर देखील आपलेच घाणेरडे हात लागल्याने स्किन खराब होते. यासोबतच, या मोबाईलवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया देखील असतात, जे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाहीत पण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच असतात. अशावेळी हा मोबाईल स्वच्छ कसा करावा हे आपल्याला समजत नाही. परंतु आपण काही साध्यासोप्या टिप्स फॉलो (How to clean your smartphone safely) करुन आपला मोबाईल स्वच्छ करु शकतो. alshihacks या इंस्टाग्राम अकाउंटवरून मोबाईल फोन स्वच्छ कसा करावा याबाबतच्या काही साध्या टिप्स शेअर करण्यात आल्या आहेत, त्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात.    

मोबाईल स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक... 

१. मोबाईल स्वच्छ करण्यासाठी एक मायक्रोफायबर कापड आणि थोडे बाऊलभर पाणी लागेल. या मायक्रोफायबर कापडाचा एक कोपरा पाण्यांत बुडवून हलकासा ओला करून या ओल्या कापडाने मोबाईल बाहेरुन स्वच्छ पुसून घ्यावा. मोबाईलच्या कडांमध्ये असणारी धूळ यामुळे सहजपणे निघण्यास मदत होते. 

किचन ट्रॉलीमध्ये झुरळांचा सुळसुळाट ? ४ टिप्स, महागडे स्प्रे - गोळ्यांचा वापर न करता झुरळं होतील गायब...

२. मोबाईलच्या पृष्ठभागाशी असणारे स्पिकर्स, माईक, चार्जिंग पोर्ट स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एका सॉफ्ट दातांच्या टूथब्रशची गरज  लागणार आहे.  स्पिकर्स, माईक, चार्जिंग पोर्ट स्वच्छ करण्यासाठी एक ब्रश घेऊन तो हलकासा तिरका हातात धरुन स्पिकर्स, माईक, चार्जिंग पोर्ट आतून स्वच्छ करून घ्यावेत. 

फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

३. क्लिनिंग जेलचा वापर करून देखील आपण मोबाइलवरची धूळ स्वच्छ करु शकता. ही क्लिनिंग जेल आपल्याला बाजारांत किंवा ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर अगदी सहज विकत मिळेल. ही क्लिनिंग जेल हातात धरून अलगद मोबाईलचे कोपरे व कडांवर फिरवून घ्यावी, यामुळे मोबाईलवरील धूळ या क्लिनिंग जेलला चिकटून मोबाईलवरची धूळ निघून जाण्यास मदत होते. 

४. क्लिनिंग जेल प्रमाणेच आपण एअर ब्लोअरचा वापर करून देखील मोबाइलवरची धूळ स्वच्छ करुन मोबाईल एकदम क्लिन आणि चकाचक करु शकता. स्पिकर्स, माईक, चार्जिंग पोर्ट यामध्ये एअर ब्लोअरने हवा सोडल्यास ते स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी की स्टीलची? दिवसभर कोणतं पाणी पिणं जास्त फायद्याचं...

अशाप्रकारे आपण ४ सोप्या स्टेप्समध्ये घरच्या घरीच मोबाईल फोन स्वच्छ करु शकतो.


Web Title: 4 easy steps to clean your phone from the outside How To Clean Up Your Mobile Phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.