Join us  

किचनमध्ये झुरळांनी थैमान घातलं? ३ ट्रिक्स- एका रात्रीत झुरळं होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 10:10 AM

3 remedies that prevent cockroaches and bugs in kitchen : झुरळांमुळे वैतागले असाल तर, एकदा किचनमधल्या ३ गोष्टींचा वापर करून पाहा..

अनेकांना झुरळाची भीती वाटते आणि किळसही येते (Cleaning Tips). अस्वच्छतेच्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त असतो. झुरळांमुळे आजुबाजूची जागादेखील प्रदुषित होते. किचनमध्ये अधिक प्रमाणात झुरळांचा वावर असतो. ते भांड्यावर आणि डब्यांवर फिरतात. ज्यामुळे पदार्थही प्रदूषित होते, आणि आरोग्यावरही परिणाम होतो (Cockroaches).

झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण पेस्ट कण्ट्रोल करतो. पण पेस्ट कण्ट्रोलही झुरळं घर सोडत नाही. झुरळांना पळवून लावण्यासाठी महागडे पेस्ट कण्ट्रोल करण्यापेक्षा, आपण घरगुती उपायांनी त्यांना पळवून लावू शकता. यामुळे झुरळांचा वावर कमी होईल, शिवाय घरात पुन्हा फिरकणारही नाही(3 remedies that prevent cockroaches and bugs in kitchen).

झुरळांचा वावर कमी करण्यासाठी घरगुती उपाय

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त स्वयंपाकात नसून, झुरळांना पळवून लावण्यासाठीही वापरता येऊ शकते. यासाठी बेकिंग सोडामध्ये साखर मिसळून मिश्रण तयार करा. आता ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त आहे, त्या ठिकाणी तयार पावडर शिंपडा. याच्या गंधामुळेमुळे झुरळे पळून जातील आणि हळूहळू गायब होतील.

मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

व्हिनेगर

स्वयंपाकासाठी आपण व्हिनेगरचा वापर करतो. पण याच्या वापराने आपण झुरळांना देखील पळवून लावू शकता. बऱ्याचदा झुरळं विशेषतः भांडी धुणाऱ्या सिंकच्या आत आणि बाथरूममध्ये फिरत असतात. त्यांना पळवून लावण्यासाठी एका वाटीत व्हिनेगरमध्ये कोमट पाणी मिसळा. तयार पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे झुरळं पळून जातील.

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळ का खातात? ५ फायदे- रक्त शुद्ध, पचनक्रिया सुधारते आणि..

लिंबू आणि सोडा

झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त आहे, त्या ठिकाणी मिश्रण शिंपडा. लिंबाचा रस आणि बेकिंग सोड्याच्या तीव्र गंधामुळे झुरळं त्या ठिकाणी पुन्हा फिरकणार नाही.

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्स