Join us

बाथरुमच्या पाईपमध्ये केसांचा गुंता अडकून चोकअप होते? ३ ट्रिक्स, पाणी तुंबणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2025 14:53 IST

3 Easy Tricks of Bathroom Drain Cleaning : 3 Tips to Clean Clogged Bathroom Drain Easily : 3 ways to unclog a drain without a plumber : Tricks To Stop Hair From Getting Stuck In The Drain : बाथरूमच्या पाईपमध्ये केस अडकून ड्रेनेज तुंबू नये आणि बाथरुम स्वच्छ राहावे यासाठी सोप्या ३ ट्रिक्स...

स्वच्छ, सुंदर बाथरुम सगळ्यांनाचं आवडतं. आपण घरातील बाथरुम नेहमी स्वच्छ ठेवतोच, परंतु शक्यतो केस धुतल्यानंतर बाथरूम काही केल्या अस्वच्छ होतंच. बाथरूममध्ये केस (3 Easy Tricks of Bathroom Drain Cleaning) धुताना अनेकदा केस बाथरुमच्या नालीत अडकतात. केस धुताना बाथरूमच्या नालीत बरेच केस एकत्रित (3 Tips to Clean Clogged Bathroom Drain Easily) जमा होतात, जे साफ करण्याकडे आपण ( 3 ways to unclog a drain without a plumber) अनेकदा दुर्लक्ष करतो. पण काही काळानंतर यामुळे ड्रेनेज तुंबते आणि त्यातून दुर्गंधीही येऊ लागते. अनेकदा वारंवार अशा प्रकारे केस आणि साबणाचा फेस नालीत साठून ड्रेनेज तुंबते, यामुळे पाणी साचते, दुर्गंधी येऊ लागते आणि शेवटचा उपाय म्हणून प्लंबरला बोलवावेच लागते(Tricks To Stop Hair From Getting Stuck In The Drain).

काहीवेळा ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी महागड्या ड्रेन क्लिनरचा वापर केला जातो. परंतु अनेकदा हे सगळे उपाय करूनही काहीच उपयोग होत नाही. अशावेळी, थोडी काळजी घेतल्यास तसेच काही सोपे घरगुती उपाय केल्यास ही समस्या अगदी सुरुवातीपासूनच रोखता येऊ शकते. आपण अशा कशी सोप्या टिप्स आणि कमी खर्चिक ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे बाथरूम स्वच्छ राहील आणि नालीत केस अडकण्याची वेळच येणार नाही. बाथरूमच्या नालीत केस अडकून ड्रेनेज तुंबू नये आणि बाथरुम स्वच्छ राहावे यासाठी सोप्या ३ ट्रिक्स पाहूयात. 

बाथरूमच्या नालीत केस अडकून ड्रेनेज तुंबू नये म्हणून... 

१. नॅपकिन / टिश्यू पेपर वापरा :- बाथरूमच्या नालीत केस अडकण्याची समस्या कमी करण्यासाठी आपण नॅपकिन किंवा टिश्यू पेपरचा वापर करु शकता. टिश्यू पेपर किंवा जाड नॅपकिन आपण बाथरूममधील नालीवर ठेवू शकता. नॅपकिन किंवा टिश्यू पेपर ठेवल्यामुळे पाणी सहजपणे वाहून जाईल, पण केस नॅपकिनमध्येच अडकतील. केस धुतल्यानंतर नॅपकिनसोबत त्या अडकलेल्या केसांना उचलून कचरापेटीत टाका.

गॅस शेगडीवरचे डाग काढा झटपट, घ्या फक्त १ चमचा मीठ-१ चमचा पीठ! पाहा भन्नाट ट्रिक...

२. ड्रेन कव्हरचा वापर करा :- ड्रेन कव्हरचा वापर केल्यानेही नालीत केस अडकण्याची समस्या टाळता येते. केस धुण्यापूर्वी किंवा अंघोळ करण्यापूर्वी ड्रेन कव्हर नालीवर लावा. ड्रेन कव्हर लावल्यामुळे केस तिथेच अडकतील, आणि अंघोळ झाल्यावर किंवा बाथरूम स्वच्छ केल्यावर तुम्ही ते सहज काढून फेकून देऊ शकता.

करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...

३. गरम पाणी ओता :- नालीत केस अडकण्याची समस्या टाळण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे नालीत अडकलेले केस आणि जमा झालेला साबणाचाही मैल सैल होतो आणि सहज वाहून जातो. आठवड्यातून दोनदा नालीत उकळते गरम पाणी ओतल्याने ड्रेनेज पाईप स्वच्छ राहतो आणि तुंबण्याची समस्या येत नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स