आपल्या रोजच्या वापरात बरेचसे कपडे हे पांढऱ्या रंगाचे असतात. पांढऱ्याशुभ्र कपड्यांची इतर कपड्यांपेक्षा अधिक जास्त काळजी घ्यावी लागते. पांढऱ्या रंगाचे कपडे लगेच मळतात किंवा धुतले तरी लवकर खराब होतात. इतकेच नव्हे तर हे कपडे घातल्यावर त्याला कुठे डाग लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. काहीवेळा पांढरेशुभ्र (2 ways to whiten your white clothes that have yellowed) कपडे सततच्या वापरामुळे, किंवा दीर्घकाळ ( Preventing White Clothes from Turning Yellow) कपाटात ठेवून, तसेच घाम आणि मळ यामुळे खराब होतात किंवा त्यांवर हलके पिवळसर डाग ( White Clothes Turned Yellow Here's how to fix them) दिसू लागतात. पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर असे पिवळे डाग (Hack to Remove Yellow Stains From White Clothes FAST) दिसू लागले की, हे कपडे आपण शक्यतो वापरत नाही. याचबरोबर, या पांढऱ्या कपड्यांवरचे पिवळे डाग काढणे देखील कठीण काम असते. यासाठीच, पांढरेशुभ्र कपडे नेहमीच फ्रेश आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी धुताना त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते.
पांढऱ्याशुभ्र कपड्यांवरील पिवळे डाग काढून टाकण्यासाठी आपण साध्यासोप्या घरगुती उपायांचा वापर करु शकतो. या उपायांमध्ये लिंबाचा रस, बेकिंग सोडा यांसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश आहे, जे पांढऱ्याशुभ्र कपड्यांची रंगत आणि चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. घरच्याघरीच पांढऱ्याशुभ्र कपड्यांवरील पिवळे डाग काढून त्यांचा पांढराशुभ्रपणा टिकवून ठेवण्यासाठी सोपे उपाय पाहूयात.
पांढऱ्याशुभ्र कपड्यांवरील पिवळे डाग काढून टाकण्यासाठी...
पद्धत १ :- पांढऱ्याशुभ्र कपड्यांवरील पिवळे डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा अधिकच फायदेशीर ठरतो. यासाठी, एका मोठ्या भांड्यात ४ लिटर गरम पाणी घेऊन त्यात १ कप बेकिंग सोडा घालावा. आता हे मिश्रण थोडे हलवूंन एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात पांढरे कपडे रात्रभर भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हे कपडे डिटर्जंट किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत.
घराच्या भिंतीत किंवा पाईपवर पिंपळाचं रोप उगवलंय? १ भन्नाट ट्रिक - त्रास होईल कमी...
पावसाळ्यात डास - चिलटं - माशांचा भणभणाट? पाहा लसणाचा असरदार उपाय- घर पावसाळ्यातही वाटेल फ्रेश...
पद्धत २ :- बेकिंग सोड्याप्रमाणेच लिंबाचा रस देखील पांढऱ्याशुभ्र कपड्यांवरील पिवळे डाग काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. हा उपाय करण्यासाठी, एका मोठ्या भांड्यात ४ लिटर गरम पाणी घेऊन त्यात ४ ते ५ लिंबाचा रस घालावा. आता पाणी आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण एकजीव करुन घ्यावे या मिश्रणात पांढरे कपडे रात्रभर भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हे कपडे डिटर्जंट किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत. पांढऱ्याशुभ्र कपड्यांचा काळपट- पिवळटपणा काढून टाकायचा असेल, तर स्वच्छ धुतलेले कपडे नेहमी उन्हात, मोकळ्या हवेत वाळत घाला.
घरभर उंदरांचा उच्छाद? करा कणकेच्या पिठाचा सोपा घरगुती उपाय - उंदीर पळतील घराबाहेर...