पक्षपंधरवाडा संपला की त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते. त्यामुळे आता नवरात्रोत्सवाला मोजकेच काही दिवस शिल्लक असून घराघरांत घटस्थापनेची तयारी सुरू झालेली आहे. घटस्थापना करण्यापुर्वी घराची व्यवस्थित स्वच्छता केली जाते. घर सुशोभित केलं जातं. बहुतांश ठिकाणी देवाच्या जवळच घट बसविले जातात. त्यामुळे देवघराच्या आजुबाजुची जागा, देवघरही घासून पुसून स्वच्छ केलं जातं. आता जर तुमच्याकडे लाकडी देवघर असेल तर ते स्वच्छ करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच करून पाहा..(2 simple tips for the cleaning of wooden temple in house) यामुळे तुमचं देवघर कितीही जुनं असलं तरी ते अगदी नव्यासारखं चकचकीत होईल.(how to maintain the shine of old wooden temple in house)
लाकडी देवघर कसं स्वच्छ करावं?
१. लाकडी देवघर स्वच्छ करताना एक मुख्य काळजी घ्यावी लागते आणि ती म्हणजे लाकडी देव्हारा खूप पाणी घालून आपण स्वच्छ करून शकत नाही. कारण पाण्यामुळे लाकूड खराब होतं. त्यामुळे देवघर स्वच्छ करण्यापुर्वी आणि देवघरातले जे कोपरे असतात त्यात अडकलेली धूळ इअर बड वापरून स्वच्छ करून घ्या.
नवरात्री स्पेशल : साबुदाण्याची तिखट खीर! चवीला मस्त आणि पोटाला आरामदायी, चाखून पाहाच...
२. यानंतर एका वाटीमध्ये गरम पाणी घ्या. त्यात १ चमचा डिशवॉश लिक्विड घाला. आता हे पाणी देवघरावर शिंपडा आणि घासणीने अलगदपणे घासून देवघर स्वच्छ करा. यानंतर एखाद्या सुती कपड्याने ते पुसून घ्या.
३. वरील पद्धतीने देवघर स्वच्छ झाल्यानंतर आता एका वाटीमध्ये ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यामध्ये ४ ते ५ थेंब कोणतेही इसेंशियल ऑईल घाला. आता कापसाचा बोळा त्या तेलामध्ये बुडवा आणि त्याने देवघर पुन्हा एकदा पुसून घ्या.
नेहमीच सगळ्यांपेक्षा तंदुरुस्त आणि ठणठणीत राहाल! निरोगी आयुष्यासाठी ६ सवयी स्वत:ला लावून घ्या
ऑलिव्ह ऑईलमुळे देवघरावर छान पॉलिश केल्याप्रमाणे चमक येते आणि ते अगदी नव्यासारखे दिसू लागते. शिवाय इसेंशियल ऑईलमुळे देवघराच्या आसपास छान सुगंध दरवळतो.
४. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑईल किंवा इसेंशियल ऑईल नसेत तर व्हॅसलिनचा उपयोग करूनही लाकडी देव्हारा चमकवता येतो. त्यासाठी अगदी थोडंसं व्हॅसलिन हातावर घ्या आणि हाताने ते देवघरावर चोळा. देवघराला छान चकचकीतपणा येईल.