Lokmat Sakhi >Shopping > लग्नाचे मोठमोठे घागरे-वर्कच्या साड्या ठेवायला जास्त जागा लागते? पाहा ‘ही’ भन्नाट वस्तू, काम सोपं...

लग्नाचे मोठमोठे घागरे-वर्कच्या साड्या ठेवायला जास्त जागा लागते? पाहा ‘ही’ भन्नाट वस्तू, काम सोपं...

Vacuum Compression Bags : DIY Lehenga Vaccum/Shrink Packing Ideas : How to Vacuum Pack Indian Clothes for a Wedding : Vacuum Storage Bags : Space Saving Bags : How To Packed So Many Clothes In One Bag : व्हॅक्युम बॅग्सच्या मदतीने अगदी मिनिटभरात मोठाले घेरदार लेहेंगे पटकन बॅगेत पॅकिंग करुन ठेवू शकतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 14:55 IST2025-04-17T23:00:42+5:302025-04-18T14:55:06+5:30

Vacuum Compression Bags : DIY Lehenga Vaccum/Shrink Packing Ideas : How to Vacuum Pack Indian Clothes for a Wedding : Vacuum Storage Bags : Space Saving Bags : How To Packed So Many Clothes In One Bag : व्हॅक्युम बॅग्सच्या मदतीने अगदी मिनिटभरात मोठाले घेरदार लेहेंगे पटकन बॅगेत पॅकिंग करुन ठेवू शकतो....

Vacuum Compression Bags Vacuum Storage Bags Lehenga Vaccum Shrink Packing Ideas How to Vacuum Pack Indian Clothes for a Wedding | लग्नाचे मोठमोठे घागरे-वर्कच्या साड्या ठेवायला जास्त जागा लागते? पाहा ‘ही’ भन्नाट वस्तू, काम सोपं...

लग्नाचे मोठमोठे घागरे-वर्कच्या साड्या ठेवायला जास्त जागा लागते? पाहा ‘ही’ भन्नाट वस्तू, काम सोपं...

सध्या उन्हाळ्यासोबतच लग्नसराईचा सिझन देखील सुरु झाला आहे. लग्नासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांची खरेदी तर हमखास केलीच जाते. लग्नाचे कपडे म्हटल्यावर स्त्रिया (Vacuum Compression Bags) आजकाल मोठमोठाले, घेरदार लेहेंगे खास लग्नासाठी विकत घेतात. लग्नासाठी साडीची जुनी फॅशन जाऊन आता लेहेंगा, चोली घालण्याचा (Lehenga Vaccum/Shrink Packing Ideas) ट्रेंड सुरु आहे. आपण हे मोठमोठाले, घेरदार, महागडे लेहेंगे विकत घेतो खरे, पण त्यांची काळजी देखील (Vacuum Storage Bags) तितकीच घ्यावी लागते. हे लेहेंगे दिसताना खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. एवढंच नव्हे तर यात तुमचा लूक एकदम छान दिसतो, पण हा घेरदार, वजन असलेला लेहेंगा घालून मिरवणं तितकंसं सोपं काम नाही(How to Vacuum Pack Indian Clothes for a Wedding).

हे लेहेंगे चांगले जाडजूड, वजनदार आणि फुलणारे असल्याने ते शक्यतो सुटकेस किंवा कपाटांत व्यवस्थित राहात नाहीत. इतकेच नव्हे तर या लेहेंग्याची नुसती घडी घालून देखील काहीच उपयोग नसतो. अशावेळी हे लेहेंगे स्टोअर कसे करायचे. तसेच लग्नासाठी जाताना एवढा मोठा जाडजूड लेहेंगा सुटकेसमध्ये   कसा पॅकिंग करायचा असा प्रश्न पडतो. फुलणारे आणि जाडजूड असल्याने ते बॅगेत भरून ठेवणे देखील कठीण जाते. परंतु यावर उपाय म्हणून तुम्ही बाजारांत मिळणाऱ्या व्हॅक्युम बॅग्सचा वापर करु शकता. या व्हॅक्युम बॅग्सच्या मदतीने आपण अगदी मिनिटभरात हे मोठाले घेरदार लेहेंगे पटकन बॅगेत पॅकिंग करुन ठेवू शकतो(How To Packed So Many Clothes In One Bag).

व्हॅक्युम बॅग्स म्हणजे नेमकं काय ?

व्हॅक्युम बॅग्स या मोठ्या प्लॅस्टिकच्या बॅग्स असतात. या बॅग्समध्ये आपण शक्यतो अधिक वजनदार किंवा घेरदार, फुलणारे कपडे अगदी व्यवस्थित घडी घालून ठेवू शकतो. या व्हॅक्युम बॅग्सचा वापर केल्याने आपल्या साड्या, लेहेंगे अगदी व्यवस्थित घडी घालून यात पॅकिंग करून ठेवल्याने कपडे नीटनेटके राहण्यास मदत होते. या व्हॅक्युम बॅग्समध्ये आपण कपड्यांशिवाय फारशा वापरात नसलेल्या मोठमोठाल्या उशा, चादरी, जाडजूड ब्लँकेट्स देखील पॅकिंग करून ठेवू शकतो. 

न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...

या व्हॅक्युम बॅग्सचा वापर कसा करायचा ?

सर्वात आधी एक बॅग घेऊन त्यात आपल्याला कपडे किंवा चादरी ज्या काही वस्तू ठेवायच्या असतील त्या ठेवून घ्या. त्यानंतर या पिशवीला सील लॉक असते ते सील लॉक लावून पिशवीचे तोंड बंद करून घ्यावे. पिशवीचे तोंड बंद झाल्यावर या पिशवीला एक नॉब दिलेला असतो. तसेच या पिशव्यांच्या पाकिटासोबत एक छोटा हॅन्ड पंम्प देखील फ्री दिलेला असतो. हा हॅन्ड पंम्प त्या नॉबला जोडून पंम्पच्या मदतीने पिशवीतील हवा बाहेर काढून घ्यावी. यामुळे पिशवीतील हवा बाहेर येऊन पिशवी अधिक न फुलता, आतील हवा बाहेर आल्याने त्याचा आकार लहान होतो. अशाप्रकारे आपण मोठमोठाले, घेरदार लेहेंगे या पिशवीत पॅकिंग करून अगदी सहजपणे बॅगेत भरुन ठेवू शकतो. 

फक्त २०० रुपयांची २ इन १ तेलाची बाटली, स्वयंपाकात तेलाचा वापर होईल आपोआप कमी...

 

या व्हॅक्युम बॅग्सची इतर वैशिष्ट्ये :- 

१. या या व्हॅक्युम बॅग्स वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असल्याने तुम्ही तुम्हाला हवी तितकी मोठ्या आकाराची व्हॅक्युम बॅग घेऊ शकता. 

२. या या व्हॅक्युम बॅग्स अजिबात लीक होत नाहीत, तसेच यातून पाणी आत जाऊन कपडे खराब होण्याचा धोका नसतो. 

३. या पिशव्या फक्त एकदाच वापरून मग फेकून न देता आता त्याचा पुनर्वापर करु शकतो. 

४. मोठमोठाले, घेरदार लेहेंगे, चादरी, उशा, साड्या अशा फुलणाऱ्या किंवा कपाट व बॅगेतील जागा व्यापरणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी व्यवस्थित पॅकिंग करु शकता. 


किंमत आणि रेटिंग... 

या 'व्हॅक्युम बॅग्स' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'व्हॅक्युम बॅग्सला ' ४.२ इतके स्टार रेटिंग देण्यांत आले आहे, तर आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक लोकांनी या या व्हॅक्युम बॅग्स विकत घेतल्या आहेत. या 'व्हॅक्युम बॅग्स' आपल्याला फक्त ४५५ रुपयांपर्यंत सहज विकत मिळतील. या या व्हॅक्युम बॅग्सच्या साईजनुसार त्याची किंमत कमी जास्त होत जाते. याच्या एका पाकिटामध्ये ३ या व्हॅक्युम बॅग्स असतात. अशा या 'व्हॅक्युम बॅग्स' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4ij24yk

Web Title: Vacuum Compression Bags Vacuum Storage Bags Lehenga Vaccum Shrink Packing Ideas How to Vacuum Pack Indian Clothes for a Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.