चुरगळलेले किंवा सुरकुतलेल्या कपड्यांना छान कडक इस्त्री केली की ते सुंदर दिसतात. आपण अनेकदा कपड्यांना इस्त्री करतो, परंतु इस्त्री करताना आपल्याला कपड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. काहीवेळा इस्त्री गरजेपेक्षा जास्त गरम झाली की कपडे जळण्याची शक्यता असते. याचबरोबर, कपड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आपण इस्त्रीचे (Ironing Accessories Protect Fabrics) तापमान सेट करून घेतो. हलके - फुलके, नाजूक कपडे असतील तर आपण इस्त्रीचे तापमान कमी ठेवतो याउलट, जाडजूड कपडे असल्यास तापमान थोडे वाढवतो(Teflon Iron Cover Protector Protect your clothes from scorching, sticking or shining while ironing).
अशाप्रकारे, आपण इस्त्री करताना कपडे जळू नये किंवा इस्त्रीचा पृष्ठभाग कपड्यांना चिकटू नये यासाठी खूप काळजी घेतो. परंतु काहीवेळा घाई - गडबडीत आपल्याकडून इस्त्रीचे तापमान चुकीचे सेट केले जाते किंवा इतर अनेक कारणांमुळे इस्त्री करताना कपडे जळण्याची शक्यता असते. अशावेळी आपले महागामोलाचे कपडे जळू नये यासाठी आपण बाजारांत विकत मिळणाऱ्या एका खास उपकरणाचा वापर करु शकतो. हे उपकरण नेमकं काय आहे? त्याचा कसा वापर करायचा याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
इस्त्री करताना कपडे जळू नये यासाठी...
इस्त्री करताना कपडे जळू नये यासाठी आपण बाजारांत विकत मिळणाऱ्या एका खास उपकरणाचा वापर करु शकतो. या उपकरणाला 'स्टीम आयर्न टॅफलॉन कव्हर' (Steam Iron Teflon Cover) असे म्हणतात. 'स्टीम आयर्न टॅफलॉन कव्हर' ही एक विशिष्ट प्रकारची टॅफलॉन कव्हर शीट असते. इस्त्रीच्या पृष्ठभागाचा जसा आकार असतो तसाच आकार या शीटचा असतो.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
ही शीट आपण इस्त्रीच्या पृष्ठभागावर लावून कपड्यांना इस्त्री करु शकतो. जाळीदार, लहान - गोलाकार छिद्र असलेल्या या शीटसोबत आपल्याला दोन स्प्रिंग देखील मिळतात. या दोन स्प्रिंगच्या मदतीने आपण ही शीट इस्त्रीच्या पृष्ठभागावर जोडून लावू शकतो. अशी ही स्टीम आयर्न टॅफलॉन शीट इस्त्रीच्या तळाशी लावून आपण कोणत्याही प्रकारच्या कपड्याला अगदी सहजपणे इस्त्री करु शकतो.
काय आश्चर्य, भाजीत मीठ घालायचं कामच नाही, ‘हा’ इलेक्ट्रिक चमचा स्वत:च करतो चविष्ट काम!
या शीटचा वापर केल्याने इस्त्रीचा पृष्ठभाग कितीही गरम झाला असेल तरीही कपडे जळत नाहीत. तसेच इस्त्रीच्या पृष्ठभागावर कपडे चिकटत देखील नाहीत. ही शीट अगदी सहज काढता - घालता येण्यासारखी आहे. याचबरोबर, या शीटच्या वापरामुळे आपल्याला कपड्यांना इस्त्री करताना इस्त्रीचे तापमान देखील सेट करण्याची फारशी गरज लागत नाही. या शीटच्या तळाशी असणाऱ्या लहान छिद्रांमधून उष्णता सगळीकडे अगदी समान पसरली जाते. त्यामुळे कपड्यांना अगदी व्यवस्थित एकसारखीच इस्त्री करणे सोपे जाते.
फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...
ही शीट फारशी महाग नसून आपल्या सगळ्यांच्याच खिशाला परवडेल अशी आहे. याचबरोबर युजरफ्रेंडली असल्याने घरातील सगळ्याच वयोगटातील व्यक्ती याचा अगदी सहज वापर करु शकतात. ही शीट तुम्हाला २८० ते ८०० रुपयांपर्यंत अगदी सहज विकत मिळते. अशी ही फारच उपयोगी 'स्टीम आयर्न टॅफलॉन शीट' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Click To Buy :- https://amzn.to/3EbIPIo