Lokmat Sakhi >Shopping > १० रुपयांत खिशाला परवडणारे मस्त वाण, टकाटक वस्तूंची ही घ्या चकाचक यादी..

१० रुपयांत खिशाला परवडणारे मस्त वाण, टकाटक वस्तूंची ही घ्या चकाचक यादी..

pocket friendly shopping for sankranti: यंदा संक्रांतीला एखादे पॉकेट फ्रेंडली वाण (wan for sankranti) लुटण्याचा विचार करत असाल, तर ही यादी एकदा बघाच. खिशाला परवडणाऱ्या १० वस्तूंची ही घ्या टकाटक यादी.. १० रूपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:18 IST2022-01-10T14:35:51+5:302022-01-10T17:18:56+5:30

pocket friendly shopping for sankranti: यंदा संक्रांतीला एखादे पॉकेट फ्रेंडली वाण (wan for sankranti) लुटण्याचा विचार करत असाल, तर ही यादी एकदा बघाच. खिशाला परवडणाऱ्या १० वस्तूंची ही घ्या टकाटक यादी.. १० रूपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू. 

Shopping Tips: Makar sankranti special haldi kunku wan gift items just in 10 rupees | १० रुपयांत खिशाला परवडणारे मस्त वाण, टकाटक वस्तूंची ही घ्या चकाचक यादी..

१० रुपयांत खिशाला परवडणारे मस्त वाण, टकाटक वस्तूंची ही घ्या चकाचक यादी..

Highlightsअगदी १० रूपयांत किंवा त्यापेक्षाही कमी किमतीचं वाण लुटण्याचा विचार करत असाल, तर ही बघा काही मस्त, टकाटक वस्तूंची यादी.

महिलांच्या दृष्टीने संक्रांतीचे मुख्य आकर्षण म्हणजे हळदी- कुंकू (haldi kunku program) कार्यक्रम. हळदी- कुंकू कार्यक्रमाचा उत्साह एवढा दांडगा असतो की त्या उत्साहाच्या भरात संक्रांत ते रथसप्तमी हा काळ कधी निघून जातो, ते देखील समजत नाही. हळदी- कुंकू करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विचार होतो ते, यंदा संक्रांतीमध्ये काय वाण लुटायचं याचा.. वाणाची वस्तू कशी युनिक आणि हटके असावी शिवाय सगळ्यांना तिचा फायदा व्हावा, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते.

 

शिवाय संक्रांतीला कुणी काय वाण दिलं याची चर्चाही संक्रांतीनंतर कितीतरी काळ चाललेली असते. त्यामुळे वाणाची वस्तू निवडताना ती काळजीपुर्वक निवडली गेली पाहिजे. आपल्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत चांगलं वाण लुटलं जावं, अशी इच्छा प्रत्येकीची असते. म्हणूनच तर अगदी १० रूपयांत किंवा त्यापेक्षाही कमी किमतीचं वाण लुटण्याचा (shopping tips for wan in sankranti) विचार करत असाल, तर ही बघा काही मस्त, टकाटक वस्तूंची यादी. असं जर वाण लुटलं तर ते निश्चितच सगळ्यांच्या उपयोगी पडेल शिवाय आपल्या खिशालाही परवडेल. 

 

 

१० रूपयांच्या आत मिळणाऱ्या या घ्या वाणाच्या वस्तू 
१. धान्याचे पॅक (grains)

आपल्या घरात असणारे धान्य झिपलॉकच्या छोट्या- छोट्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाका आणि हे धान्य संक्रांतीला वाण म्हणून लुटा. प्रत्येकाकडून धान्याचा वापर हमखास केलाच जातो. त्यामुळे ते वाया जाणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्ये, गहू, तांदूळ, साखर अशी लहान- लहान पाकीटे तुम्ही लुटू शकता. 

 

२. मास्क (mask)
ही तर हल्ली प्रत्येकीला लागणारी गोष्टी. सर्जिकल मास्कचं एक मोठं पाकिट विकत आणलं, तर त्यातले एक- दोन मास्क तुम्ही एकेकीला देऊ शकता. मोठं पाकिट विकत घेतलं तर एका मास्कची किंमत अंदाजे ३ ते ४ रूपये एवढी येते.

 

३. टिकल्याचे पाकीट (bindi)
टिकली हे प्रत्येकीला लागणारे. शिवाय एका टिकलीच्या पाकिटाची किंमत २ ते ३ रूपये असते. आपल्याकडे येणाऱ्या बहुसंख्य महिलांना कोणत्या प्रकारच्या टिकल्या आवडतात, ते ठरवा आणि टिकल्यांची खरेदी करा. आपल्या बजेटनुसार एकेकीला दोन- तीन टिकली पाकीटही देता येते.

 

४. मेहेंदी कोन (mehendi)
५ ते ७ रूपयांना किंवा काही ठिकाणी १० रूपयांना मेहंदी कोन मिळतात. मेहेंदी कोनचा वापरही सहसा प्रत्येकजण करतेच करते.

 

५. कानातले 
आजकाल डेली युजसाठी अगदी छोटे छोटे, सिंगल स्टोन असणारे कानातले टॉप्स घालायला अनेकींना आवडते. असे कानातले होलसेल मार्केटमधून खरेदी केल्यास ५ ते ७ रूपयांना एक जोड या प्रमाणात मिळतात.

 

६. हातरूमाल (hanky)
ही तर प्रत्येकीला लागणारी गोष्ट. १० रूपयांमध्ये हात रूमालाचे अनेक चांगले प्रकार बाजारात मिळतात.

 

७. बिस्किटे, ओट्स आणि मॅगी (oats and maggi)
प्रत्येक घरात हे दोन- तीन पदार्थ आवर्जून खाल्ले जाते. १० रूपयांत अनेक बिस्किटचे पुडे मिळतात. शिवाय मॅगी आणि हेल्दी ओट्स यांचे मिनी पॅकही १० रूपयांत मिळते. हे वाण जर लुटले तर निश्चितच ते सगळ्यांना आवडेल आणि मुख्य म्हणजे त्याचा तात्काळ वापर होईल.

 

८. पिनांचा सेट (hair pins)
साडी पीन, हेअर पीन, क्लचर, युपीन्स अशा अनेक गोष्टी प्रत्येक मैत्रिणीला लागतच असतात. त्यामुळे तुम्ही वाण लुटताना या पिनांचा सेट करून दिला तर तो नक्कीच प्रत्येकीला उपयोगी ठरेल.

 

९. दोऱ्याचं रिळ 
सुई आणि दोरा या दोन गोष्टी प्रत्येक घरात लागतात. एक दोऱ्याचं रिळ साधारण ३ ते ४ रूपयांना मिळते. १० रूपयांत २ ते ३ रिळ तुम्ही खरेदी करू शकता. 

 

१०. पेपर सोप (paper soap)
आजकाल कोरोनामुळे वारंवार हात धुवावे लागतात. त्यामुळे घराबाहेर गेल्यावर हात धुण्याची वेळ आल्यास आपल्या पर्समध्ये पेपरसोपचे पाकीट असणे कधीही चांगले. म्हणून हे एक चांगले वाण ठरू शकते. 

 

११. वेट वाईप्स (wet wipes)
घराबाहेर खूप वेळ राहिल्यास काळवंडलेला, तेलकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेट वाईप्सचा वापर अनेक जणी करतात. या वाईप्सचे मिनी पॅक १० रूपयांच्या आत मिळते. 

 

१२. साडी कव्हर (saree cover)
ज्यामध्ये केवळ एक साडी व्यवस्थित ठेवता येते, असे साडी कव्हर होलसेल मार्केटमध्ये १० रूपयाला मिळतात. घरात कितीही साडी कव्हर असले तरी प्रत्येकीला त्याची गरज असतेच असते.  


 

Web Title: Shopping Tips: Makar sankranti special haldi kunku wan gift items just in 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.