निकिता बॅनर्जी
पावसाळ्यात कोणतं मॉइश्चरायझर लावावं असा मोठा प्रश्न असतो. आधीच बाहेर पाऊस, त्यात चिकचिक, त्वचा ड्राय होते कधी तेलकट दिसते अशावेळी चेहऱ्याला वेगळं, हातपायांना वेगळं असे दोन मॉइश्चरायझर लावावेत की एकच लावावे असा प्रश्न पडतो. त्यात अडचण अशी की चिपचिपे, चेहरा तेलकट करणारे मॉइश्चरायझर पण अजिबात चांगले वाटत नाही. पावसात भिजल्यावर तर अजूनच चेहरा खराब होतो. आणि कळत नाही की पावसाळ्यात नेमकी कोणती क्रिम योग्य? या साऱ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे NIVEA Soft (Light Moisturizer Cream)
हे मॉश्चरायजर चेहरा, हात, बॉडी असं सगळ्यांसाठी वापरता येऊ शकतं. ऑल सिझन उपयोग असला तरी पावसाळ्यातही सहज वापरावं असं आहे.
NIVEA Soft - Light Moisturizer Cream with Vitamin E & Jojoba Oil for Instant Hydration असं त्याचं वर्णन.
लहान १०० एमएलपासून ते उपलब्ध आहे.
खास काय आहे?
हे ऑल सिझन मॉश्चरायझर आहे. चेहऱ्यासाठी वेगळे आणि बॉडीसाठी वेगळे, पायांसाठी वेगळे असे क्रिम घ्यायची गरज नाही.
त्यात व्हिटामिन इ आणि जोजो ऑइल असल्यानं इन्स्टंट हायड्रेशन मिळते.
त्वचा कोरडी होत नाही. लावताक्षणी ते शोषले जाते त्यामुळे त्वचा अजिबात तेलकट-चिपचिपी दिसत नाही.
सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय?
हे क्रीम आपण नाइट आणि डे क्रिम म्हणून वापरु शकतो. दिवसा ऑफिस किंवा कॉलेजला जाताना, मेकअप करण्यापूर्वी असे वापरु शकतो. आणि नाइट क्रिम म्हणूनही वापरु शकतो.
त्यामुळे टू इन वन यूज हा या क्रिमचा सर्वात जास्त फायदा आहे.
किंमत काय?
१४६ रुपये १०० एमएल क्रिमसाठी. मोठ्या बाटल्याही उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे किंमत बदलते.
लक्षात ठेवण्यासारखं..
मॉइश्चरायझर निवडताना आपल्या त्वचेचा पोत लक्षात ठेवायला हवा. मात्र हे मॉइश्चरायझर ऑल स्किन आणि ऑन सिझन असल्याने ते वापरणं सोपं आहे.
व्हॅल्यू फॉर मनी
किंमत आणि उपयोग यासाठी हे प्राॅडक्ट उत्तम आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे.
रेटिंग : 4 ****