Lokmat Sakhi >Shopping > उकडीच्या मोदकांसाठी आणा फक्त ४०० रुपयांचं भांडं, मोदक होतील पांढरेशुभ्र-मऊसुत आणि झटपट

उकडीच्या मोदकांसाठी आणा फक्त ४०० रुपयांचं भांडं, मोदक होतील पांढरेशुभ्र-मऊसुत आणि झटपट

product review: Ukdiche modak steamer: Ganesh Chaturthi cooking appliance: मोदकच नाही तर आपण मोमोज किंवा वाफेवरचे इतर पदार्थ करण्यासाठी खास भांडं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 12:54 IST2025-08-05T12:53:24+5:302025-08-05T12:54:16+5:30

product review: Ukdiche modak steamer: Ganesh Chaturthi cooking appliance: मोदकच नाही तर आपण मोमोज किंवा वाफेवरचे इतर पदार्थ करण्यासाठी खास भांडं..

prodcut review Lifelong 2-Tier Steamer Momo Modak Maker how to cook ukdiche modak in ganesh festival | उकडीच्या मोदकांसाठी आणा फक्त ४०० रुपयांचं भांडं, मोदक होतील पांढरेशुभ्र-मऊसुत आणि झटपट

उकडीच्या मोदकांसाठी आणा फक्त ४०० रुपयांचं भांडं, मोदक होतील पांढरेशुभ्र-मऊसुत आणि झटपट

अवघ्या काही दिवसांत बाप्पाचे आगमन होणार आहे. बाजारपेठ फुलांनी सजलेल्या पाहायला मिळत आहे.(Modak maker steamer) इतकेच नाही तर गणपतीच्या पूजेपासून ते डेकोरेशनचे सामान देखील विविध स्वरुपात उपलब्ध आहे. पण सगळ्यात खास म्हणजे बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य.(Lifelong 2-tier steamer review) गणेशोत्सवात उकडीचे मोदक फार आवडीने खाल्ले जातात. उकडीचा मोदक हा असा पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो.(Ganpati special modak recipe) श्रीगणेशाला उकडीचे मोदक फार आवडतात असं म्हटलं जातं. म्हणून या काळात भक्तगण अगदी आवडीने मोदक बनवतात.(Steamer for Indian festivals) हल्ली बाजारात मोदक बनवण्यासाठी विविध स्वरुपाचे भांडे आणि साचे पाहायला मिळतात. 
तळणीच्या, माव्याच्या मोदकापेक्षा उकडीचे मोदक बनवण्यासाठी फार मेहनत आणि वेळ लागतो. उकडीचे मोदक बनवण्याची कृती देखील फार वेगळी असते. त्याचे पीठ उकडताना, सारण बनवताना आणि मोदकाला कळ्या पाडताना फार बारकाईने लक्ष द्यावं लागतं. पण मोदक बनवून झाल्यानंतर वाफवताना अनेकदा ते फुटतात किंवा कच्चे राहतात. अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही. 

कढई-झाऱ्याची कटकट नको, तळण्यासाठी आणा फक्त २०० रुपयांचं भांडं! सणासुदीला कमी तेलात तळण


कित्येकदा मोदक वाफवून झाल्यानंतर ताटात काढताना नेमका फुटतो किंवा ताटाला चिकटून राहतो. अनेकदा तर पीठही व्यवस्थित शिजत नाही. मोदकांशिवाय गणेश चतुर्थीचा सण अपूर्णच. पण हे मोदक करणं देखील फार सोपं काम नाही. उकडीचे वाफवताना फुटतात किंवा पारी फाटते. अशा सगळ्या समस्या दूर करुन आपण झटपट मोदक वाफवू शकतो तेही अगदी बिनधास्त. इतकेच नाही तर मोदक वाफवल्यानंतक तो पांढराशुभ्र आणि मऊसुत राहिल. यासाठी बाजारात आणि ऑनलाईन शॉपिंग साईटवर खास भांडं मिळतं आहे. मोदकच नाही तर आपण मोमोज किंवा वाफेवरचे इतर पदार्थ देखील यावर करु शकतो. 

मोदक मेकर 


1. वाफवण्याचे भांडं स्टिलचे आहे. त्यामुळे याला लवकर गंज लागणार नाही. तसेच पकडायला मजबूत असल्यामुळे खाली पडण्याची भीती देखील नसेल, 

2. या मेकरच्या मदतीने आपण मोमोज, मोदक, भाज्या आणि अजून काही पदार्थ एकाच वेळी वाफवू शकतो. 

3. यावर असणारे झाकण हे डबल लेयर ग्लासचे असल्यामुळे चटका बसण्याची किंवा भाजण्याची शक्यता नसेल. तसेच ते जाड आणि मजबूत आहे. 

4. याचा आकार साधारणत: २० सेंटीमीटर इतका आहे. त्यामुळे एकावेळी साधारणत: ६ ते ७ मोदक वाफवून निघतील. 

5. इतकेच नाही तर यात दोन भांडी आहेत. एकात आपण पाणी घालून ठेवू शकतो आणि वरच्या भांड्यात पदार्थ वाफवू शकतो. 

6. हे भांड हेल्दी कुकिंग, झिरो केमिकल कोटिंग आणि वापरण्यासाठी योग्य आहे. हे आपण गॅस स्टोव्ह किंवा इंडक्शनवर देखील वापरु शकतो. 

किंमत आणि रेटिंग 

Lifelong 2-Tier Steamer/Momo/Modak Maker हा ३९९ रुपयांना ऑनलाईन साइटवर उपलब्ध आहे. ग्राहकांकडून याला चांगली पसंती देखील मिळते आहे. तसेच ग्राहकांना खरेदीवर ६९ टक्के सूट देण्यात आली आहे. याची खरी किंमत ही १,२९९ रुपये इतकी आहे. स्टीमर, मोदक मेकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/3IYJqQn

Web Title: prodcut review Lifelong 2-Tier Steamer Momo Modak Maker how to cook ukdiche modak in ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.