Join us
Daily Top 2Weekly Top 5

Paithani Shopping: येवल्याची पैठणी आणि कलांजली पैठणी यांच्यात मुख्य फरक काय, दोन्हीपैकी कोणती चांगली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2025 16:46 IST

Paithani Shopping: लग्नसराईनिमित्त पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर पैठणीबाबतच्या या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत..(what is the difference between kalanjali paithani and yeola paithani?)

ठळक मुद्देजेव्हा कधीही दुकानात तुम्ही पैठणी पाहायला जाल तेव्हा दुकानदार हमखास कलांजली पैठणी हवी का? असं विचारतो.

पैठणी हे महाराष्ट्रातलं एक मानाचं वस्त्र. त्यामुळे आपल्याकडे लग्नप्रसंगात हमखास पैठणी खरेदी केलीच जाते. काही काही जणींना तर पैठणीची एवढी हौस असते की त्यांच्याकडे ३ ते ४ पैठणी असतात. कारण पैठणीचा थाटच वेगळा.. आता जर प्युअर सिल्क पैठणी घ्यायला गेलं तर ती १० हजारच्या पुढेच मिळते. त्यातही कलांजली पैठणीसारखे कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात आले आहेेत आणि त्यांच्या किमतीही साधारण याच दरम्यान आहेत. आता एवढी महागडी साडी आपण घेणार म्हटल्यावर तिच्या बाबतीतल्या काही गोष्टी आपल्याला माहिती हव्यातच. म्हणूनच सध्या गाजत असणारा कलांजली पैठणी हा काय प्रकार आहे आणि इतर पैठणीपेक्षा तो का वेगळा आहे, हे जाणून घेऊया..(what is the difference between kalanjali paithani and yeola paithani?)

 

कलांजली पैठणी म्हणजे काय?

जेव्हा कधीही दुकानात तुम्ही पैठणी पाहायला जाल तेव्हा दुकानदार हमखास कलांजली पैठणी हवी का असं विचारतो. याच पैठणीला धर्मावरम पैठणी असं म्हणूनही ओळखलं जातं. त्याउलट आपल्याकडच्या पारंपरिक पैठणी या येवला पैठणी किंवा मग पैठणची पैठणी असं म्हणून ओळखल्या जातात.

मुगाच्या डाळीचा पिझ्झा, सुपरटेस्टी आणि प्रोटीनही भरपूर! चव अशी भारी की मैद्याचा पिझ्झा कायमचा विसर

तर या दोन पैठण्यांमधला मुख्य फरक म्हणजे कलांजली पैठणी ही दक्षिण भारतात तयार होते. तर आपल्याकडच्या पैठण्या या पैठण, येवला या भागात तयार होतात. याशिवाय या दोन पैठण्यांमध्ये आणखी एक प्रमुख फरक असतो आणि तो म्हणजे त्यांच्या विणकामाच्या पद्धतीत..

 

त्यामुळे जर तुम्हाला आपल्या प्रांतात तयार झालेली अस्सल पैठणी घ्यायची असेल तर येवला किंवा पैठणची पैठणी घेण्यास प्राधान्य द्या. पण जर तुमच्याकडे अशी पैठणी असेल आणि तुमच्या कलेक्शनमध्ये काही नवा प्रकार हवा असेल तर कलांजली पैठणी घ्या.

फक्त १० रुपयांचा सोपा उपाय- चेहऱ्यावरचे काळपट डाग, ॲक्ने जाऊन त्वचा होईल स्वच्छ, नितळ

शिवाय आपल्या भागात तयार झालेल्या ज्या पारंपरिक पैठणी आहेत त्यांची चमक त्या कितीही जुन्या झाल्या तरी कमी होत नाही, त्यावरची बुटी खराब होत नाही, असं म्हटलं जातं आणि आजवर कित्येक जणींचा तोच अनुभव आहे. तर कलांजली पैठणी हा त्यामानाने खूपच नवा प्रकार आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Paithani Comparison: Yeola vs. Paithan vs. Kalanjali – Which is Better?

Web Summary : Kalanjali Paithanis, originating from South India, differ from traditional Yeola/Paithan Paithanis in weaving style. Choose local for authenticity or Kalanjali for variety. Traditional Paithanis retain their luster longer.
टॅग्स :शुभविवाहखरेदीसाडी नेसणे