Join us

मकर संक्रांत स्पेशल : छोट्या मुलांसाठी पाहा काळ्या सलवार-कुर्त्याचे सुंदर पर्याय, मुलं दिसतील गोडगोंडस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 15:23 IST

Makar Sankranti Salwar kurta baby boy set shopping : लहान मुलांसाठी काळ्या रंगाचे पारंपरिक सेट पाहत असाल पाहा हे एक से एक पर्याय

मकर संक्रांत म्हणजे काळे कपडे हे ठरलेलेच आहे. थंडीपासून शरीराचे रक्षण होण्यासाठी गडद रंगाचे कपडे घालणे हा त्यामागील मुख्य हेतू असतो. लहान मुलं तर कोणत्याही कपड्यात गोडच दिसतात. पण काळा रंग हा कोणावरही खुलून दिसतो. एरवी सणावाराला किंवा चांगल्या गोष्टींसाठी आपल्याकडे काळा रंग वापरला जात नाही. पण संक्रांतीसाठी मात्र आवर्जून काळे कपडे खरेदी केले जातात (Makar Sankranti Salwar kurta baby boy set shopping). 

लहान मुलांची वजन आणि उंची सतत वाढत असल्याने त्यांना लगेचच आधीचे कपडे लहान व्हायला लागतात. त्यामुळे सणावाराला त्यांना कपडे घेण्याशिवाय पर्यायच नसतो. मूल ५ वर्षाच्या आतले असेल तर बोरन्हाणासाठी कपडे घ्यावेच लागतात. अगदी घरात हळदी कुंकवाला महिला येतात म्हणून आपण छान आवरतो त्याचप्रमाणे मुलंही छान दिसायला हवीत असं आपल्याला वाटत असतं. म्हणूनच आपल्या लहान मुलांसाठी काळ्या रंगाचे पारंपरिक सेट पाहत असाल पाहा हे एक से एक पर्याय...  

(Image : Amazon)

१. लहान मुलांचे पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी आणि पुढील ५ वर्ष बोरन्हाण करण्याची पद्धत आहे. या काळात येणारा रानमेवा म्हणजेच बोरं, मटार, हरभरा आणि चॉकलेट-गोळ्या यांनी हे बोरन्हाण केले जाते. यावेळी मुलांना हलव्याचे दागिने घालवून सजवण्याची पद्धत आहे. कुर्ता प्लेन काळा असेल तर  पांढऱ्या हलव्याचे हे दागिने कपड्यांवर मस्त उठून दिसतात. यावर कॉन्ट्रास्ट धोती मस्त उठून दिसू शकते. 

https://bit.ly/48GpvNw

२. लहान मुलांसाठी कॉटन कधीही जास्त कम्फर्टेबल असते. धुतल्यावर हे कापड भरत असल्याने आणि अंगाला अजिबात टोचत नसल्याने लहान मुलांचे कपडे घेताना सुती कपडे घेण्याला प्राधान्य दिले जाते.  अगदी प्लेन कुर्ता नको असेल अशाप्रकारची नाजूक डिझाईन असलेला काळा कुर्ता आणि पांढरी सलवार हा सेट अगदीच चांगला पर्याय आहे. याची किंमतही रिझनेबल असल्याने यंदाच्या संक्रांतीसाठी तुम्ही हा सेट विकत घेण्याचा नक्की विचार करु शकता.

https://bit.ly/4aP3oGr

(Image : Amazon)

३. झोडा डिझायनर आणि हटके असा काळा ड्रेस आपल्या चिमुकल्यासाठी पाहत असाल तर बांधणीच्या डिझाईनचा हा ड्रेस अतिशय छान उठून दिसतो. कॉटनच्या या ड्रेसला बाजुने असलेली किनार या ड्रेसची शोभा खुलवण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्याकडे हळदीकुंकू असेल किंवा तुम्हाला मुलांना घेऊन हळदी कुंकवासाठी जायचे असेल तर मुलं यामध्ये अगदीच गोड दिसतात. 

https://bit.ly/48s2Dlb

टॅग्स :खरेदीमकर संक्रांती