Join us

काजळ-आयलायनर लावता येत नाही, हात थरथरतो? ही भन्नाट गोष्ट वापरा, काजळ, आयलायनर लावा परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 16:25 IST

Viral Eyeliner Hack : Try this Silicone Eyeliner Tool : If you struggle with eyeliner or kajal, this is the hack you NEED : Eyeliner for SHAKY Hands, this tool gives crisp lines : डोळ्यांवर काजळ, आयलायनर लावताना आता बिघडणार नाही, वापरुन बघा ही खास वस्तू....

आयलायनर आणि काजळ वापरुन आपण डोळ्यांचा आय मेकअप करतो. डोळे आखीव - रेखीव, काळेभोर आणि उठून दिसावेत म्हणून हमखास आपण आयलायनर आणि काजळ वापरतो. आयलायनर, काजळ तुमच्या डोळ्यांना उठावदार करुन त्यांना अधिक चांगला लूक येण्यास मदत करतात. परंतु डोळ्यांचा मेकअप करायचा म्हटलं (Try this Silicone Eyeliner Tool) की अनेकींना टेंन्शन येतं. डोळ्यांवर काजळ, आयलायनर लावणे जितके (If you struggle with eyeliner or kajal, this is the hack you NEED) सोपे वाटते तितके सोपे ते नाही. डोळ्यांना काजळ, आयलायनर लावताना अनेकींचा हात थरथरतो, किंवा ते डोळ्यांवर व्यवस्थित लागत नाही, लावताना पसरते अशा एक ना अनेक समस्या असतातच(Eyeliner for SHAKY Hands, this tool gives crisp lines).

आयलायनर, काजळ लावताना जरा जरी बिघडले तरी संपूर्ण डोळ्यांचा मेकअप खराब होतो. यामुळे जर का डोळ्यांचा आय मेकअप फसला तर आपला संपूर्ण लूकच बिघडतो. असे होऊ नये यासाठी सध्या बाजारांत, आयलायनर आणि काजळ लावण्यासाठी एक खास सिलिकॉन आयलायनर टूल विकत मिळते. आपण या खास टूलचा वापर करुन डोळ्यांवर अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट पद्धतीने आयलायनर व काजळ लावू शकतो. 

सिलिकॉन आयलायनर टूल... 

सिलिकॉन आयलायनर टूल हे एक प्रकारचे पेनासारखे दिसणारे आयमेकअप टूल आहे. या पेनासारख्या दिसणाऱ्या टूलचा वापर करून आपण आपण अगदी काही सेकंदातच आयलायनर व काजळ अगदी परफेक्ट पद्धतीने डोळ्यांवर लावू शकतो. या पेनासारख्या टूलच्या सुरुवातीला पेनाच्या निब सारखे सिलिकॉनचे पसरट असे टोक असते, याच्या मदतीने आपण डोळ्यांवर आयलायनर, काजळ लावू शकतो. यासाठी, सर्वातआधी या सिलिकॉन आयलायनर टूलच्या टोकावर काजळ किंवा आयलायनर लावून घ्यावे. त्यानंतर या आयलायनर टूलच्या मदतीने डोळ्यांवर आयलायनर, काजळ लावून घ्यावे.  

लग्नाचे मोठमोठे घागरे-वर्कच्या साड्या ठेवायला जास्त जागा लागते? पाहा ‘ही’ भन्नाट वस्तू, काम सोपं...

या प्रॉडक्ट्ची इतर वैशिष्ट्ये :-

१. हे टूल रियुजेबल असल्याने आपण याचा वापर वर्षानुवर्षे करु शकतो. आयलायनर काजळ लावण्याच्या ब्रशप्रमाणे ते खराब देखील होत नाही. 

२. हे सिलिकॉन आयलायनर टूल वापरणे सगळ्यांनाचं सोपे आहे. 

न कापता, चाकू-सुरी न वापरता खरबूज-टरबूज चिरा, पाहा ‘हे’ भन्नाट फ्रुट कटर...

३. याची स्वच्छता करणे देखील अतिशय सोपे आहे. 

४. डोळ्यांना काजळ, आयलायनर लावताना अनेकींचा हात थरथरतो, किंवा ते डोळ्यांवर व्यवस्थित लागत नाही, लावताना पसरते अशा एक ना अनेक समस्या  असतील तर आपण या टूलचा वापर करून डोळ्यांवर अगदी परफेक्ट पद्धतीने आयलायनर आणि काजळ लावू शकता. 

किंमत आणि रेटींग... 

हे सिलिकॉन आयलायनर टूल आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'सिलिकॉन आयलायनर टूलला' ३.४ इतके स्टार रेटिंग देण्यांत आले आहे, तर आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक लोकांनी हे 'सिलिकॉन आयलायनर टूल' विकत घेतले आहे. सिलिकॉन आयलायनर टूलची किंमत ३०० रुपये इतकी आहे. असे हे 'सिलिकॉन आयलायनर टूल' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/42Ci48D

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्समेकअप टिप्स